‘पोलिसांनी नाही पाहिले!’ ही बातमी (२० ऑगस्ट) वाचली. मुंबई-ठाण्यातील सर्वच दहीहंडी आयोजकांनी उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून जल्लोष केला. गृहमंत्री ज्या पक्षाचे त्याच पक्षाचे वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड! कसे काय पकडायचे? आदेश त्यांनीच द्यायचे आणि कायद्याचे उल्लंघनही त्यांनीच करायचे.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार त्यावर काहीही भाष्य करीत नाही. हे सर्व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांवर डोळा ठेवून चालले आहे. एका वृत्तवाहिनीने तर बातम्यांमध्ये आव्हाड थरावर चढत असल्याचे दाखवले, तर दुसरीकडे तिसरीत शिकणाऱ्या लहान मुलीची मुलाखतही दाखवली गेली. हे सर्व पुरावे असतानाही पोलिसांना अजून काय पाहिजे? आता याची दखल घेऊन संबंधितांवर न्यायालयाची बेअदबी केल्याचे खटले भरावेत व त्यांना जबर दंड करावा, जेणेकरून असा गुन्हा पुन्हा करण्याची हिंमत कोणीही करणार नाही.
सुधीर सुदाम चोपडेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा