‘उद्दिष्ट-निश्चिती’ हा लोकसत्ता अर्थ-वृत्तांतमधील लेख (२४ नोव्हेंबर) वाचला. उद्दिष्टे, इच्छा आणि अपेक्षा यांचे योग्य भान ठेवणे कसे आवश्यक आहे, ते या लेखात नेमके सांगितले आहे; पण मासिक उत्पन्न आणि मासिक कर्ज-हप्ते तसेच मासिक उत्पन्न आणि तरल गुंतवणूक (लिक्विड कॅश) यांची जी गुणोत्तरे लेखात दिली आहेत, ती जरा अव्यवहार्य वाटतात. मासिक कर्ज हप्ता हा मासिक उत्पन्नाच्या एकतृतीयांशापेक्षा जास्त असू नये आणि तरल गुंतवणूक ही मासिक उत्पन्नाच्या किमान सहापट असावी, असे लेखकाचे म्हणणे आहे. या दोन्ही गुणोत्तरांचा एकत्रित विचार केला तर, तरल गुंतवणूक ही मासिक कर्ज-हप्त्याच्या १८ पट असावी, असा निष्कर्ष निघतो! केवळ गृह-कर्ज (बाकी वाहन वा अन्य छानछोकीसाठीची कर्जे सोडूनच देऊ!) डोक्यावर असलेले तरुण जोडपेदेखील इतकी तरल गुंतवणूक ठेवू शकत असेल का, हा प्रश्नच आहे. सर्वसाधारणपणे, बँका / वित्तीय संस्थांकडून दिले जाणारे गृहकर्ज हे मासिक उत्पन्नाच्या ५० ते ६० पट रकमेपेक्षा अधिक नसते. शिवाय, हे कर्ज सामान्यत: घराच्या किमतीच्या ८५ टक्के ते ९० टक्के असते, म्हणजेच घरखरेदीसाठी अगोदरच १०% ते १५% स्व-अर्जति गंगाजळी वापरली गेलेली असते. हे सर्व लक्षात घेतले, तर ‘क्ष’ मासिक उत्पन्न असताना ५०क्ष ते ६०क्ष दरम्यान कर्ज घेतलेले किती लोक १८क्ष इतकी रक्कम बचत खात्यात, मुदत ठेवीत वा अन्य तरल गुंतवणुकीत ठेवू शकतील, हा अभ्यासाचा विषय ठरावा.
‘मराठी माणूस डोक्यावरचे कर्ज लवकरात लवकर फेडून टाकण्याच्या मागे लागलेला असतो आणि म्हणून बचत खात्यात काहीही न ठेवता दरमहा जास्त रक्कम फेडून टाकण्याच्या मागे असतो’ हे लेखकाचे विधान थोडे अधिक स्पष्ट करून सांगितले असते, तर त्यातून प्रकट होणारा आणि सामान्य मराठी मनोवृत्तीला नाके मुरडणारा भाव जरा कमी झाला असता. आजघडीला १०% – १०.१५% दराने गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा गृहकर्जाशी संबंधित सर्व आयकर सवलतींचा लाभ घेऊन झाल्यावर प्रभावी व्याजदर (इफेक्टिव्ह इंटरेस्ट रेट) हा सात-आठ टक्क्यांच्या आसपास येतो. याचाच अर्थ, जोपर्यंत करपश्चात आठ टक्क्यांच्या वर व्याजदर देणारे गुंतवणुकीचे मार्ग उपलब्ध आहेत (उदा. पीएफ, पीपीएफ), तोपर्यंत गृहकर्ज लवकर फेडण्याची घाई करण्याची गरज नाही, तर असे अधिकचे पसे अशा ठिकाणी गुंतवावेत. मात्र, असे गुंतवणुकीचे मार्ग उपलब्ध नसतील किंवा वर नमूद केलेल्या पीपीएफसारख्या गुंतवणुकीची कमाल मर्यादा गाठलेली असेल, तर मात्र गृहकर्ज लवकर फेडणे हे श्रेयस्कर ठरते, विशेषत: जेव्हा व्याजदर निश्चित (फिक्स्ड) नसून चल (फ्लोटिंग) असतात तेव्हा (जी आजची परिस्थिती आहे).
कर्जे लवकर फेडून नव्या गुंतवणुकीकरता (मग ती दुसऱ्या घरासाठीही असू शकते) स्वत:ची ‘पत’ (क्रेडिटवर्दीनेस) वाढवणे, हे आíथक प्रौढत्वाचेच लक्षण आहे, त्याला कमी लेखण्याची आवश्यकता नाही.
परेश वसंत वैद्य, गिरगाव (मुंबई)
कर्जफेडीच्या मागे लागणारा की स्वतची पत वाढवणारा ?
‘उद्दिष्ट-निश्चिती’ हा लोकसत्ता अर्थ-वृत्तांतमधील लेख (२४ नोव्हेंबर) वाचला. उद्दिष्टे, इच्छा आणि अपेक्षा यांचे योग्य भान ठेवणे कसे आवश्यक आहे, ते या लेखात नेमके सांगितले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-11-2014 at 01:19 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers response on loksatta news