प्रचाराच्या शेवटच्या काही दिवसांत ‘आप’ला मिळालेल्या देणग्या आणि त्याचे स्रोत यावरून पक्षाला घेरण्याचा केलेला प्रयत्न संबंधितांच्याच अंगाशी आला, असे दिसते. वर्षांनुवष्रे कोटय़वधी रुपयांचे ‘लक्ष्मीदर्शन’ निवडणुकीमध्ये करताना कोणी ‘स्रोता’बद्दल बोलत नव्हते; पण त्या तुलनेत फुटकळच म्हणावी अशी रक्कम धनादेशाने घेऊन व तीही जाहीर करून, पारदर्शकतेचा चांगला पायंडा पाडणाऱ्या पक्षावर केलेली चिखलफेक मतदारांना अजिबात भावलेली नाही. देणगीदार कंपनी नोंदणीकृत आहे, त्यांचा आयकर खात्याकडे ‘पॅन’ क्रमांक आहे, यापलीकडे जाऊन प्रवर्तकांची पूर्वपीठिका सत्तेत नसलेल्या ‘आप’ने तपासायला हवी होती, असे प्रस्थापित पक्षांनी म्हणणे हा मतदारांना हुच्चपणाचा कळस वाटला असणार.
या पक्षांचे सत्ताधारी मंत्री फरार गुन्हेगारांसोबत एकाच व्यासपीठावर फोटोत दिसतात तेव्हा मात्र ‘व्यासपीठावर किती तरी लोक आम्हाला भेटायला येतात, त्याला आम्ही जबाबदार कसे?’ असले खुलासे अनेकदा मानभावीपणे दिले जातात. या दुटप्पीपणाची जनतेला शिसारी आली असल्यास नवल नाही. ‘आप’च्या विजयाचा हाही अन्वयार्थ इतर सर्व पक्षांनी नीट लक्षात घ्यावा आणि दुसऱ्याच्या डोळ्यातली कुसळे शोधणे आता तरी थांबवावे. अगोदर स्वत:ची बरीच मुसळे हाताळण्याची नितांत गरज आहे.
विनीता दीक्षित, ठाणे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा