भाजप या कळसूत्री बाहुलीचा सूत्रधार रा. स्व. संघ आहे, हे सर्वविदितच आहे. संघाने ‘हरी झंडी’ दाखवली म्हणून किरण बेदी यांचे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी नामांकन केले गेले. त्यामुळेच त्या आता रा. स्व. संघाचे गोडवे गाऊ लागल्या आहेत. हे वरील म्हणीस अनुसरून आहे. बेदी या म्हणीला अपवाद ठरल्या नाहीत, ही खेदाची गोष्ट आहे. किरण बेदींसारख्या मेगसेसे अॅवॉर्ड विभूषित व कथित सडेतोड, स्वाभिमानी, निर्भीड आणि ‘स्वच्छ’ वगैरे वगैरे असलेल्या व्यक्तीला अकस्मात झालेल्या रा. स्व. संघाविषयीच्या साक्षात्काराविषयी थोडेसे..
‘संघाने देश एक ठेवला म्हणजे नेमके काय केले? देशाची फाळणी तर झालीच. ती थांबवण्यासाठी संघाने कोणते निषेध अभियान, जन आंदोलन केले? उलट त्यानंतरही केवळ हिंदू संघटनावर भर देत राहून देश, समाज दुभंगलेलाच राहणे हे पाहिले. कोशीस केली.. देशाचे ऐक्य ते हेच काय?’
१९२५ साली संघ स्थापन झाला, त्या वेळी फाळणीचा धोका उघड दिसत नव्हता. मग संघाने ऐक्य दाखवले म्हणजे काय? चारित्र्य, अनुशासन, देशभक्ती, समाजसेवा वगैरेंची मक्तेदारी संघाकडेच नाही. ते करणाऱ्या हजारो भारतीय संस्था आहेत. एकटय़ा संघाला त्याचे क्रेडिट देणे म्हणजे त्या सर्वाचा अवमान तर आहेच पण आपल्या बालिश, कोत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन करणे आहे. किरण बेदी यांची एक प्रतिमा जनमानसात आहे. त्यांच्याकडून अशा इतिहासाच्या अज्ञात तोंडपूजेपणाची अपेक्षा नव्हती.
-श्रीधर शुक्ल, ठाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा