फिक्शन
१) द फॉल्ट इन अवर स्टार्स : जॉन ग्रीन, पाने : ३३६३९९ रुपये.
कॅन्सरमुळे नैराश्याने ग्रासलेल्या किशोरवयीन मुला-मुलीची ही रुढार्थापेक्षा वेगळी प्रेमकथा आहे. हे पुस्तक मुलांसाठी आहे असे त्यात म्हटले असले तरी ते मोठय़ांसाठीही तितकेच वाचनीय आहे.
२) नो टाइम फॉर गुडबाय : अंदालिब वाजिद, पाने : २१२२५० रुपये.
फ्लशबॅक पद्धतीने उलगडणाऱ्या या कादंबरीची नायिका स्वत:ची पाळेमुळे शोधत शोधत मागे मागे जाते आणि त्यातीलच एक पात्र होते.
३) राइट हेअर राइट नाऊ : निकिता सिंग, पाने : २३२१७५ रुपये.
या कादंबरीची नायिका पण एक तरुणीच आहे. पण तिला स्मृतिभ्रंश झालेला असतो. तरीही ती त्यावर मात करून स्वत:चा शोध घेण्याचा प्रयत्न करते, स्वत:चा भूतकाळ उल्लंघू पाहते.
नॉन-फिक्शन
१) कॅपिटल इन द ट्वेंटी-फर्स्ट सेंच्युरी : थॉमस पिकेटी, पाने : ६९६१४९५ रुपये.
फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेटी यांच्या या पुस्तकाने सध्या युरोप-अमेरिकेत मोठी घमासान चर्चा सुरू केली आहे. एकाच वेळी कौतुक आणि तितकीच कठोर टीका या नवे अर्थसिद्धांत मांडणाऱ्या पुस्तकावर होते आहे. आणि अर्थात त्याची विक्रीही.
२) सहारा-द अनटोल्ड स्टोरी : तमल बंदोपाध्याय, पाने : ३८८४५० रुपये.
सहारा आणि सुब्रतो राय यांच्या कारनाम्यांचा पंचनामा करणारे हे पुस्तक मर्मभेदी आहे. आणि ते सहारा ग्रुपच्या ‘सावधान सूचने’सह प्रकाशित झाले आहे.
३) द सबस्टन्स अँड द शॅडो- अ‍ॅन अ‍ॅटोबायोग्रफी : दिलीपकुमार, पाने : ४५०६९९ रुपये.
अभिनयाचा बेताज बादशहा मानल्या जाणाऱ्या दिलीपकुमार यांचं हे आत्मचरित्र प्रांजळ या विशेषणाला उतरणारं आहे.

Story img Loader