आजच्या व्यंगचित्रकारांमध्ये प्रखर सामाजिक जाणिवांचे भान असलेले व्यंगचित्रकार म्हणून प्रशांत कुलकर्णी ओळखले जातात. त्यांच्या व्यंगचित्रांतून समाजातील आíथक विषमतेवर भेदक टिप्पणी झाल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. लोकसत्ता (३१ डिसेंबर) मधील ‘काय चाललंय काय!’ सदरातील व्यंगचित्रातून त्याचा पुन:प्रत्यय येतो.
उच्चभ्रूंच्या सोसायटीची कम्पाऊंड वॉल. त्या भिंतीपलीकडे श्रीमंतवर्गाकडून साजरा होत असलेला वर्षअखेरीचा सोहळा. कंपाऊंडच्या बाहेर भिकारी. त्याच्या खांद्यावर उभे राहून हा धमाका बघण्याचा प्रयत्न करणारा त्या भिकाऱ्याचा मुलगा. भविष्यात तूही या धमक्यात सामील होशील अशी (भाबडी) आशा मुलाला दाखवणारा भिकारी. चित्र तसे साधेच, पण अनेक प्रतीकांनी भरलेले.
सोसायटीच्या भिंतीची कड म्हणजे दारिद्रय़रेषा. भिंतीवरून कोणी प्रवेश करू नये म्हणून त्यावर लावलेल्या काचा म्हणजे दारिद्रय़रेषेच्या वर जाण्याच्या मार्गातले काटेच. पुढच्या पिढीची प्रगती ही आधीच्या पिढीच्या मदतीवर होते हे सूचित करणारा भिकाऱ्याच्या खांद्यावर उभा राहिलेला मुलगा. परंतु फुटपाथवरच राहणाऱ्या भिकाऱ्याने आपल्या मुलाचं स्वत:चं घर असण्याची आशा बाळगणं म्हणजे मृगजळच. ते सूचित होतंय भिंतीच्या उंचीने!
इतक्या हृदयस्पर्शी व्यंगचित्राने वर्षअखेर केल्याबद्दल प्रशांत कुलकर्णी यांचे अभिनंदन!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा