दिल्लीचा विश्व पुस्तक मेळा- म्हणजे वर्ल्ड बुक फेअर दर दोन वर्षांनी भरायचा. २०१२ ची सुरुवात याच ग्रंथजत्रेनं दिल्लीत झाली होती, तिचं उद्घाटन करताना मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी आश्वासन देऊन टाकलं की, यापुढे दरवर्षी हा पुस्तकमेळा भरवला जाईल. एरवी मंत्र्यांची आश्वासनं खरी होतील असं मानलं जात नाही. त्यातच, दिल्लीच्या सांस्कृतिक उपक्रमांचं जे काही मिलंजुलं खासगीकरण ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’च्या नावाखाली चालू आहे, त्याचा वेग पाहता सिब्बल नेहमीप्रमाणे आज बोललेलं उद्या विसरतील, अशीच अपेक्षा होती. पण चक्रं फिरली आणि नॅशनल बुक ट्रस्ट या आपल्या राष्ट्रीय अधिकृत ग्रंथप्रकाशन न्यासाच्या वतीनं भरवला जाणारा हा पुस्तकमेळा आता २०१३ मध्येही भरणार आहे. वाईट गोष्ट एकच आहे की, दिल्लीखेरीज अन्य मोठय़ा शहरांतही हा मेळा भरवायचा आणि दिल्लीत दर चौथ्या वर्षी पुस्तकमेळय़ानं परतायचं, हा १९८० च्या दशकातला शिरस्ता आता मागे पडतो आहे.. आता दरवर्षी पुस्तकमेळा भरणार असला, तरी गेल्या वर्षी दिल्ली आणि यंदाही दिल्लीच, स्थळ प्रगती मैदान, हे ठरलेलं आहे. यंदाच्या तारखा आहेत ४ ते १० फेब्रुवारी, आणि गेल्या वर्षी ३० देशांतील १३०० प्रकाशकांचा सहभाग होता, त्यापेक्षा अधिक सहभाग यंदा आहे. यंदाचा पाहुणा देश आहे फ्रान्स आणि भारतीय पुस्तकांपैकी लोककला आणि आदिवासी यांविषयीच्या पुस्तकांवर विशेष भर देण्याचा आयोजकांचा मानस आहे.
वार्ता ग्रंथांची.. खरंच, दरवर्षी मेळा..
दिल्लीचा विश्व पुस्तक मेळा- म्हणजे वर्ल्ड बुक फेअर दर दोन वर्षांनी भरायचा. २०१२ ची सुरुवात याच ग्रंथजत्रेनं दिल्लीत झाली होती, तिचं उद्घाटन करताना मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी आश्वासन देऊन टाकलं की, यापुढे दरवर्षी हा पुस्तकमेळा भरवला जाईल.
आणखी वाचा
First published on: 29-12-2012 at 12:02 IST
मराठीतील सर्व वार्ता ग्रंथांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Really every year gadring