‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या लिखाणाचा मी चाहता आहे. पण ‘बळीराजाची बोगस बोंब’ हा त्यांचा अग्रलेख अत्यंत एकांगी आणि अन्यायकारक असल्याचे नमूद करावे वाटते.
शेती उत्पन्नाचा हिशेब कराच..
शेतीला उद्योगाचा दर्जा देणे परवडणारे नाही
शेतकऱ्याला त्याचा माल विशिष्ट बाजारात (कृ.उ.बा.स.) विकण्याचे बंधन आहे. त्या बाजारातले घटक संगनमताने शेतकऱ्याची पिळवणूक करत असतात. हेच घटक शेतकऱ्याकडून कर वसूल करून सरकारकडे तो जमा न करता स्वत:ची धन करत असतात. यात सगळे सत्ताकारणीही आले. विविध कृषी उत्पन्न बाजार समित्या कुणाच्या ताब्यात आहेत आणि त्यांच्या निवडणुका जिंकण्यासाठी कशी चुरस आहे याचा विचार करता या आरोपाला बळच मिळते. ज्याच्या मालाला बंदिस्त बाजारपेठेत विकण्याचे बंधन घालून त्याची लूट करण्याचे काम जी शासन व्यवस्था करते त्याच व्यवस्थेने शेतकऱ्याचे झालेले नुकसान भरून देणे हे त्या व्यवस्थेचेच कर्तव्य आहे. त्यामुळे नुकसानभरपाईची शेतकऱ्यांनी केलेली मागणी पूर्णपणे न्याय्य आहे. तिची हेटाळणी करणे अमानुष आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा