‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालिचे’, ‘आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे, ‘गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी’ यांसारखी मराठी मनात रुंजी घालणारी अवीट गोडीची गाणी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोमरे ऊर्फ बालकवींची मराठीजनांना देणगी आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ‘हे अमरविहंगम गगनाचा रहिवासी तो नीलसागरावरचा चतुर खलाशी’ असे बालकवींचे काव्यात्मक वर्णन केले आहे. अशा या थोर निसर्गकवीची १२५ वी जयंती येत्या १३ ऑगस्टला आहे. त्याची आठवण ठेवून राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करावे, एवढीच माफक अपेक्षा आहे.
जयश्री कारखानीस, मुंबई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा