‘सोशल मीडिया’ हे तंत्र अस्तित्वात येऊन आणि त्याविषयीचं महाभारत रचायला सुरुवात होऊन फार काही काळ लोटलेला नाही. जेमतेम दहा-बारा र्वष झाली असतील. सध्याचा मध्यमवर्ग, विशेषत: मोठय़ा शहरांमधील (त्यात तरुणही आले), या सोशल मीडियाने धुंदावला आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभर हीच परिस्थिती आहे. अशा वेळी ‘इकॉनॉमिस्ट’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित साप्ताहिकाच्या वेबआवृत्तीचे प्रमुख संपादक टॉम स्टँडेज यांनी मोठा बॉम्बगोळा टाकला आहे. त्यांनी ‘रायटिंग ऑन द वॉल- सोशल मीडिया -द फर्स्ट २,००० इयर्स’ हे पुस्तक लिहून आम्हीच या संकल्पनेचे जनक आहोत, असा टेंभा मिरवणाऱ्यांना चांगलीच चपराक लगावली आहे. रोमन रिपब्लिककडे सोशल मीडियाचे श्रेय जाते, हे टॉम यांनी दाखवून दिले आहे. गेली दोन महिने ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या बेस्टसेलर यादीत हे पुस्तक आघाडीवर आहे. जगभर त्यावर मोठमोठी परीक्षणे लिहिली जात आहेत.  
फ्रंट शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
द दलाई लामाज कॅट अँड द आर्ट ऑफ प्युरिंग : डेव्हिड मिची, पाने : २५६३९९ रुपये.
रोमिओ, ज्युलिएट अँड हिटलर : रोहन गौतम, पाने : २१२१०० रुपये.
वन पार्ट वुमन : पेरुमल मुरुगन, पाने : २४८३९९ रुपये.
द स्कॅटर हेअर इज टू ग्रेट : बिलाल तन्वीर, पाने : २१४३५० रुपये.
लँड व्हेअर आय फ्ली : प्रज्वल पराजुली, पाने : ४००४९९ रुपये.
टॉप  ५ नॉन-फिक्शन
अनब्रेकेबल : मेरी कोम, पाने : १८०/१९९ रुपये.
सेव्हन्टी सेव्हन-माय रोड टू विम्बल्डन ग्लोरी : अँडी मूर, पाने : २८८२९९ रुपये.
पंजाबी पार्मेसान : पल्लवी अय्यर, पाने : ३४४५९९ रुपये.
मंडेला-द लाइफ ऑफ नेल्सन मंडेला : रॉड ग्रीन, पाने : १९२९९९ रुपये.
इफ इट्स मंडे इट मस्ट बी मदुराई : श्रीनाथ पेरूर, पाने : २९६४९९ रुपये.
सौजन्य -फ्लिपकार्ट.कॉम

Story img Loader