सतीश कामत यांच्या ‘आज.. कालच्या नजरेतून’ या सदरातील ‘ ‘साहेब’ ते ‘बाबा’’ (२९ मार्च) या  लेखात त्यांनी म्हटले आहे की, अलीकडे राजकारणात ‘साहेब’ हा शब्द तालुका किंवा जिल्हा पातळीवरील नेते, आमदार, खासदारांपासून कोणालाही उद्देशून वापरला जातो. त्याचबरोबर तो सर्वपक्षीयही झाला आहे. १९७० च्या दशकातील महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस पक्षाचा दबदबा होता. या पक्षात वसंतरावदादा पाटील, वसंतराव नाईक, नाशिकराव तिरपुडे, बॅ. शेषराव वानखेडे, मधुकरराव चौधरी यांसारखी मातबर मंडळी होती. त्याचप्रमाणे विखे-पाटील, मोहिते पाटील सारखी तालेवार घराणीही होती. सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आश्वासक युवा नेत्याच्या टप्प्यावर होते, पण या साऱ्यांसाठी एकच ‘साहेब’ होते – यशवंतराव चव्हाण!
या संदर्भात मला ज्ञात असलेली माहिती येथे देत आहे. वाईचे क्रांतिवीर दे. भ. किसन वीर (आबासाहेब) यांच्या चरित्रग्रंथाची तयारी सुरू होती. त्या वेळी आबासाहेबांच्या चळवळीतील त्यांचे निकटचे सहकारी जमले होते. कासेगावकर वैद्य, घोरपडे,  देशपांडे इ. त्यात होते. आठवणी सांगताना घोरपडे गुरुजी यांनी सांगितल्याप्रमाणे चळवळीतील प्रमुख व्यक्तींची नावे शासनाला कळू नयेत. यासाठी काही टोपण नावे ठेवण्यात आली. यात यशवंतराव चव्हाण यांना ‘साहेब’, श्री. किसन वीर यांना ‘आबासाहेब’, ‘घोरपडे गुरुजी यांचा ‘रावसाहेब’, तर कासेगावकर वैद्य यांना ‘धन्वंतरी’ अशी नावे ठेवण्यात आली. चळवळीच्या काळात त्याचा उपयोग होई. समकालीन नेते मा. यशवंतरावजींना ‘साहेब’ नाही तर ‘यशवंतराव’ असेच संबोधत. त्यानंतरच्या काळात हा शब्द ‘वरिष्ठ नेत्यां’साठी वापरला जाऊ लागला, असे दिसते.
– डॉ. वसंत स. जोशी

व्हायरस एमपीएससीच्या सव्‍‌र्हरमध्ये आणि कार्यप्रणालीतही!
कोणतीही पूर्वसूचना न देता अभ्यासक्रमापासून परीक्षेच्या तारखेपर्यंत अनाकलनीय असे बदल करून विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणे हा एमपीएससीचा आता स्थायीभावच बनत चालला आहे. एक वर्षांपूर्वी अचानक उठून मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात केलेला बदल असो, सहा महिन्यांपूर्वी पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमातील बदल असो, दोन महिन्यांपूर्वी पूर्वपरीक्षेच्या नियोजित तारखेतील बदल असो.. या सगळ्या बदलांशी विद्यार्थी जुळवून घेतो ना घेतो तोच आता सव्‍‌र्हरच्या समस्येमुळे पुन्हा एकदा परीक्षेच्या तारखेत बदल होण्याची शक्यता दिसत आहे. किती हे बदल? आणि किती हा मनस्ताप? आयोग बदल करतेय की आयोगाचा फॉर्म भरल्याचा बदला घेतेय? नुकताच यूपीएससीने एक गोंधळ घातला होता आणि त्या पाश्र्वभूमीवर एमपीएससीच्या सव्‍‌र्हरचा गोंधळ, म्हणजे गोंधळात गोंधळ घालण्यात एमपीएससी काही कमी नाही हेच आयोगाने दाखवून दिले आहे, आणि याहून िनदनीय बाब म्हणजे या गोंधळासंदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनाची भाषा पाहिली तर आयोग आवाहन करत आहे की धमकी देत आहे तेच कळत नाही. ‘४८ तासांच्या आत माहिती अद्ययावत केली नाही तर परीक्षा प्रवेशपत्र (हॉल तिकीट) मिळणार नाही’ याला सूचना समजायचे की धमकी? इथे ग्रामीण भागात माहिती पोहोचायची बोंबाबोंब आहे आणि इतक्या कमी वेळात माहिती अद्ययावत कशी करायची?
 म्हणे यांच्या सव्‍‌र्हरमध्ये व्हायरस घुसला आणि सगळी माहिती उडून गेली, व्हायरस सव्‍‌र्हरमध्ये नव्हे तर यांच्या कार्यप्रणालीमध्ये घुसलेला आहे, तो आधी बाहेर काढा. स्पर्धा परीक्षा आयोग ही संस्था घटनादत्त आहे पण लाखो विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळण्याचा आयोगाचा अधिकार घटनादत्त नाही, पण मागील काही वर्षांपासून त्यांचे वर्तन तसेच चालू आहे. परीक्षेत एका चुकीच्या उत्तरासाठी विद्यार्थ्यांचे १/३ गुण कापले जातात मग अशा अक्षम्य आणि असंख्य चुकांसाठी आयोगाचे किती गुण कापायचे? स्पर्धा परीक्षा म्हणजे स्वत:ला वारंवार सिद्ध करण्याची स्पर्धा असते आणि ती विद्यार्थ्यांबरोबर आयोगाला ही लागू असते कदाचित एमपीएससीला याच गोष्टीचा विसर पडला असेल म्हणून हा गोंधळाचा दिवस पाहायला मिळतोय.
‘ऐन परीक्षेच्या तोंडावर आयोग तोंडघशी पडते’ जमल्यास आयोगाने या साध्या वर्तमानकाळाचे रूपांतर पूर्ण भूतकाळात करून दाखवावे, लवकरात लवकर.. हीच एक धडधाकट सव्‍‌र्हरचरणी प्रार्थना!
-उमेश स्वामी, माटुंगा, मुंबई.

Nagpur 3 idiot latest news in marathi,
नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis should become heir of pm Narendra Modi and lead country says vijay wadettiwar
मोदींचे वारसदार होऊन देशाचे नेतृत्व करा… वडेट्टीवारांच्या फडणवीसांवरील स्तुतीसुमनांमुळे…
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
Suresh Dhas Statement About Pankaja Munde and Dhananjay Munde
Suresh Dhas : “लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळेच झाला, कारण..”; सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
ajit pawar group on suresh dhas
Suraj Chavan: “..तेव्हा गृहखातं झोपा काढत होतं काय?”, सुरेश धसांच्या विधानानंतर अजित पवार गटाच्या नेत्याची टीका
Santosh Deshmukh murder case, Devendra Fadnavis ,
“आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला तरी…”, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
Attempt to spread poison in the name of caste PM Modi criticizes opponents
जातीच्या नावावर विष पसरवण्याचा प्रयत्न; पंतप्रधान मोदी यांची विरोधकांवर टीका

विकृतीला वाचा फोडण्याचे काम
‘मीडिया अ‍ॅक्टिव्हिझम’मध्ये तुम्ही सुद्धा? हे हर्षल लोहकरे यांचे पत्र (लोकमानस, ३ एप्रिल ) वाचले. कोणताही जातीय अभिविनेश न करता आणि सत्ताधारी, अध्र्या हळकुंडाने पिवळे झालेले पुरोगामी यांचा मुलाहिजा न ठेवता ‘लोकसत्ता’ने ज्या धाडसाने समाजातील विकृतीला वाचा फोडली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे.
पण लोहकरे यांना मात्र या अग्रलेखात परंपरावादाचा वास यावा हे दुर्दैवी आहे. कोणतीही प्रागतिक चळवळ, विचारसरणी ही त्या त्या पातळीवर अभंग आणि अभेद्य असतेच. मानेंसारख्या एखाद्यामुळे ती लोप पावत नाही हे बरोबर आहेच, पण ज्यांना आपण चळवळीचे पुढारी मानले, ज्यांच्या मागून अनेक तरुण विश्वासाने चालले, शिक्षणाची व माणुसकीची पहाट होईल असा आशावाद ज्यांनी त्यांच्या मनात जागवला त्या विभूतीने पाच महिलांवर अत्याचार केला आहे अशी तक्रार जेव्हा होते आणि पोलीस कारवाईपासून ती व्यक्ती पळ काढते तेव्हा चळवळीबद्दल मनात शंका येणे साहजिकच नाही का?
 हे काही एक उदाहरण नाही. आंबेडकरी चळवळ काय हेतूने सुरू झाली आणि आजची तिची अवस्था काय झाली आहे हे आपण प्रामाणिकपणे पाहिले तर लोकसत्ताच्या अग्रलेखाचा योग्य अन्वयार्थ सर्वानाच लागेल.
 – अनघा गोखले, मुंबई

साईभक्तांचे डोळे कधी उघडणार?
‘नियम डावलून ११० किलो सोने वितळवले’ हे शिर्डी देवस्थानाच्या कारभाराविषयीचे वृत्त (लोकसत्ता, ३० मार्च) वाचले आणि आपल्या लाखो अंधश्रद्धाळू भाविकांच्या दातृत्व भावनेची कीव वाटली. शिर्डी संस्थानच्या कारभारातील अनियमितता आणि भ्रष्टाचार या काही आता नवीन बाबी राहिलेल्या नाहीत. तेथील भक्त निवासांची उभारणी, महाप्रसादाचा ठेका, प्रसादाच्या लाडूंमध्ये वापरले जाणारे भेसळयुक्त तूप, संस्थानचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन आणि भत्त्यांवर केली जाणारी नियमबाह्य़ उधळपट्टी या आणि अशा अनेक बाबी यापूर्वी अनेकदा समोर आल्या आहेत. देशातील तिरुपतीनंतर शिर्डी हे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान असल्याचे म्हटले जाते. रोज लक्षावधी रुपये व दागदागिने इथे साईचरणी अर्पण होत असतात. वार्षकि करोडो रुपयांची उलाढाल इथे होत असते. साहजिकच त्यातून मिळणारा प्रसादही मोठा असतो आणि तो प्राप्त करण्यासाठीच या संस्थानचे कारभारी व्हायला राजकारण्यांची कशी स्पर्धा लागलेली असते, हेही यापूर्वी अनेकदा दिसले आहे.
आपल्या हयातभर साईबाबा जाणीवपूर्वक कफल्लक राहिले. आíथक मदत करू पाहणाऱ्या दांभिकांना त्यांनी झिडकारले. गोरगरिबांची सेवा आणि उद्धार हे त्यांचे व्रत राहिले. त्याच साईबाबांना आता सोने आणि हिरे-माणकांनी मढवून त्यांच्या सच्च्या गोरगरीब भाविकांपासून दूर करण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी ‘लोकप्रभा’ साप्ताहिकात ‘साईबाबांनी शिर्डी सोडली.’ या नावाने कव्हरस्टोरी प्रकाशित झाली होती. त्यात शिर्डीतील सर्व अनागोंदी, भ्रष्टाचार यांची परखड चिरफाड करण्यात आली होती आणि साई तिथे अजूनही असते तर हे सर्व प्रकार घडलेच नसते, असे मत शेवटी व्यक्त करण्यात आले होते. मात्र अंधश्रद्धाळू भाविक या कशाचाही विचार करताना दिसत नाहीत आणि त्यामुळेच साईबाबांच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्यांचे फावते!
    – रविन्द्र पोखरकर, कळवा-ठाणे

Story img Loader