गौरव सोमवंशी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अशी कल्पना करा की, काम मिळविण्यासाठी आफ्रिकेतील एक व्यक्ती दुसऱ्या देशात गेली आहे. त्या व्यक्तीस काम मिळतेही; परंतु घरी पैसे पाठवायचे तर घरच्या कोणाकडेही बँकेत खाते उघडण्याकरिता आवश्यक कागदपत्रे नाहीत. त्यामुळे अनेक मध्यस्थांमार्फत पाठवलेले पैसे हातोहाती फिरत मूळ रकमेतील काहीच भाग घरी पोहोचतो. कधी कधी तर पूर्ण रक्कम मध्येच गुडुप होते. बरे, जरी घरच्यांनी बँकेचे खाते उघडले तरी आंतरराष्ट्रीय रक्कम हस्तांतरणाच्या व्यवहारामुळे मूळ रकमेच्या आठ ते ३० टक्के रक्कम शुल्क वा विनिमय दरापोटी वजा होऊ शकते.
खरे तर ही अशी परिस्थिती वास्तवाला धरून आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, २०१६ साली जगभरच्या २३ कोटी स्थलांतरित कामगारांनी आपापल्या घरी पाठवलेली रक्कम एकत्रितपणे सुमारे ४० लाख कोटी रुपये इतकी होती. आंतरराष्ट्रीय बँकांकडून या व्यवहारांत आकारल्या जाणाऱ्या शुल्काची रक्कम जगभर देण्यात येणाऱ्या परदेशी मदतीहून अधिक आहे. म्हणजे श्रीमंत देश या बँकांद्वारे जितके शुल्क आकारतात, त्यापेक्षा कमी रक्कम परदेशी आर्थिक मदत म्हणून विकसनशील वा गरीब देशांना देण्यात येते.
इथे ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान वा ‘बिटकॉइन’सदृश चलन काय बदल घडवू शकते?
प्रख्यात उद्योगपती व फोर्ड कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड हे एकदा म्हणाले होते की, ‘हे बरेच म्हणायचे की, अनेक देशवासीयांना आपली बँकिंग वा आर्थिक प्रणाली नीट समजत नाही; कारण जर ती पूर्णपणे समजली असती तर सगळ्यांनी रस्त्यावर उतरून क्रांतीची हाक दिली असती.’ या वाक्यात तर्क किती आणि मार्मिक अतिशयोक्ती किती, हा प्रश्न अलाहिदा. पण वरील उदाहरण पाहिले तर ध्यानात येईल की, मुद्दा फक्त आंतरराष्ट्रीय व्यवहारांपुरता सीमित नाही. जगात जवळपास १७० कोटी प्रौढ लोकांचे बँकेत खाते नाही आणि यापैकी अर्धे लोक हे केवळ सात देशांत आहेत. दुसरे म्हणजे, बँकेचे खाते आहे- पण त्यातून कधीच कोणताही व्यवहार करण्यात आलेला नाही किंवा ज्या खात्यांमधून काहीच आर्थिक सुविधा प्राप्त करता येत नाहीत, अशांना ‘अंडर-बँक्ड’ म्हटले जाते; त्यांचीदेखील तशीच समस्या असते.
हे असे का होते? याचे कारण बँकेची प्रणाली शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी आणि फक्त निवडक लोकांकडे सीमित नसावी, हे समीकरण अनेक बँकांना परवडणारे नाही. त्यामुळेच जागतिक पातळीवर या दृष्टीने कोणतीही तसदी घेतली जात नाही. आपली आर्थिक समृद्धी आणि विकासाची प्रक्रिया सुकर करण्यात बँकेतील खाते आणि त्याद्वारे मिळणाऱ्या सुविधा कळीची भूमिका बजावतात. त्यामुळे भौगोलिक स्थानामुळे वा आर्थिक परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी जर कोणी आर्थिक सुविधा आणि संधींना मुकणार असेल, तर याबाबतीत ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान काय करू शकते?
या प्रश्नाचे उत्तर म्हणून अनेक नवउद्यमी ‘बिटकॉइन’ वा तत्सम चलनांवर आधारित उपाय समोर आणत आहेत. ज्याप्रमाणे सातोशी नाकामोटोचे नाव हे ब्लॉकचेन वा बिटकॉइनशी जोडले जाते किंवा व्हिटालिक ब्युटेरिनचे नाव ‘ब्लॉकचेन’मध्ये ‘ईथिरियम’द्वारे व्यापकता आणण्यासाठी घेतले जाते, त्याप्रमाणे अॅण्ड्रीज अॅण्टोनोपोलस यांचे नाव ‘बिटकॉइन’ची पूर्ण शक्ती गरजू वा दुर्बलांसाठी कशी वापरता येईल हे मांडण्यासाठी घेतले जाते. जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय बँका या तेल बाजारातील व्यापार संघाप्रमाणेच काम करतात आणि त्यांची ही मक्तेदारी मोडण्यासाठी ‘बिटकॉइन’ कसे महत्त्वाचे ठरू शकते, हे सांगणारी अॅण्टोनोपोलस यांची पुस्तके (विशेषत:, ‘द इंटरनेट ऑफ मनी’चे तीन खंड) आणि यूटय़ूबवरील भाषणे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मते, ज्या सुरक्षा, सुविधा आणि वापरण्याची सोपी सोय स्विस बँकेचे खाते देऊ शकते, त्याहून बरेच काही ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान हे ‘बिटकॉइन’द्वारे उपलब्ध करू शकते. मुख्य म्हणजे, ‘बिटकॉइन’ कधीही ‘तुम्ही कोण आहात’ वा ‘तुम्ही किती गरीब/श्रीमंत आहात’ असे विचारणार नाही अथवा भरमसाट शुल्कसुद्धा आकारणार नाही. अॅण्टोनोपोलस जे म्हणताहेत तसे खरेच होऊ शकते का? काही उदाहरणे पाहू..
पॉल व्हिग्ना आणि मायकल केसी यांनी त्यांच्या ‘द एज ऑफ क्रिप्टोकरन्सी’ या पुस्तकात ‘३७ कॉइन्स’ या स्टार्टअपचा उल्लेख केला आहे. ‘३७ कॉइन्स’च्या संस्थापिका साँगी ली या पश्चिम आफ्रिकेतील माली या देशात गेल्या होत्या. तिथे लोकांकडे बँकेचे खाते नाही. जवळपास प्रत्येक घरातील काही मंडळी बाहेरील देशांत काम करून घरी पैसे पाठवतात, ज्यात अनेक अडचणी येतात. परंतु ली यांच्या हेही लक्षात आले की, तिथे जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन असला-नसला तरी एक साधा फोन तरी आहेच, ज्याद्वारे एसएमएस पाठवला जाऊ शकतो. मग यास इंटरनेट नसले तरी ‘बिटकॉइन’च्या यंत्रणेशी जोडता येईल का, असा प्रश्न ली यांना पडला आणि ‘३७ कॉइन्स’चा जन्म झाला. फक्त एका एसएमएसद्वारे तुम्ही वैयक्तिक खाते उघडू शकता, विनाशुल्क जगभर कुठेही क्षणार्धात पैसे म्हणजेच ‘बिटकॉइन’ पाठवू शकता किंवा इतर वापरकर्त्यांकडे कर्जासाठी अर्ज करू शकता, आपले कोणतेही बिल भरू शकता; म्हणजे थोडक्यात तुमचा साधा फोन एका बँकेचे काम करू शकतो. हे एसएमएस कोणत्याही जवळच्या स्मार्टफोनधारकाकडे जातील, जो ‘३७ कॉइन्स’चा भाग असेल व त्या स्मार्टफोनचे इंटरनेट वापरून ‘ब्लॉकचेन नेटवर्क’ला संबंधित माहिती पुरवली जाईल.. अन् हे सारे काही मिनिटांतच होईल.
‘३७ कॉइन्स’ला केनियामध्ये आधीच अस्तित्वात असलेल्या एका प्रकल्पातून प्रेरणा मिळाली होती. केनियामध्ये व्होडाफोन आणि सफारीकॉम या दोन बलाढय़ कंपन्यांनी मिळून ‘एम-पेसा’ (‘एम’ हे मोबाइलसाठी आणि स्वाहिली भाषेत ‘पेसा’ म्हणजे पैसे) ही पैसे हस्तांतरण सेवा सुरू केली होती. ज्यामुळे तिथे एसएमएसद्वारे पैसे पाठवणे किंवा काही छोटी कर्जे उचलणे शक्य झाले. निवडक ठिकाणी जाऊन लोक आपले मोबाइल खाते ‘रिचार्ज’ करीत आणि पासवर्डद्वारे संरक्षित केलेले एसएमएस हे व्यवहारांचे माध्यम असते. हा प्रकल्प अत्यंत लोकप्रिय ठरला. इतका की, एके वर्षी केनियाचा २५ टक्के जीडीपी हा ‘एम-पेसा’मार्फतच फिरत होता. या मूलभूत ‘बँक-विरहित’ बँकिंग सुविधेमुळे लोकांच्या आयुष्यात खूप फरक पडला. एका अभ्यासानुसार, यामुळे १,९४,०० कुटुंबे (म्हणजे केनियाची दोन टक्के लोकसंख्या) ही गरिबीतून बाहेर आली. पण हे काही ‘ब्लॉकचेन’ किंवा ‘बिटकॉइन’सदृश चलनावर आधारित नव्हते. राष्ट्रीय चलन वापरून या मोठय़ा कंपन्या केवळ बँकिंग सुविधा सोप्या पद्धतीने गरिबांपर्यंत पोहोचवत होत्या; पण त्यामुळे या कंपन्यांची मक्तेदारीसुद्धा आलीच. बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांनी तर ‘एम-पेसा’वर अत्यंत जास्त शुल्क आकारल्याचे आक्षेप घेतले. त्यांच्या मते, केनियामध्ये ‘एम-पेसा’ हे दीड रुपयामागे ३० पैसे शुल्क आकारात होते, पण दुसऱ्या देशात फक्त १० पैसे घेत होती. कारण तिथे अन्य कंपन्यांशी स्पर्धा होती. त्यामुळे याच प्रक्रियेला राष्ट्रीय चलन वगळून ‘बिटकॉइन’शी जोडले आणि मोठय़ा कंपन्या बाजूला सारून विकेंद्रित (डिसेंट्रलाइज्ड्) आणि वितरित (डिस्ट्रिब्युटेड) ‘ब्लॉकचेन’ यंत्रणा आणली, तर या प्रकल्पाचा आवाका कित्येक पटींनी वाढू शकतो, अशी आशा ‘बिटकॉइन’च्या समर्थकांना वाटते आहे.
आणखी एक उदाहरण पाहू. अफगाणिस्तानातील रोया महबूब यांचे. त्यांना ‘टाइम’ साप्ताहिकाने २०१३ साली जगातील १०० सर्वात जास्त प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समाविष्ट केले होते. महबूब यांनी स्वत:ची कंपनी स्थापन करून त्यामध्ये अफगाणी महिलांना नोकऱ्या दिल्या. अनेक महिलांचे तेव्हा बँकेत खाते नव्हते आणि अनेकींना ते उघडण्याची मुभा नव्हती. मग या महिलांना मोबदला द्यायचा तरी कसा? रोया महबूब यांना ‘बिटकॉइन’मध्ये त्याचे उत्तर सापडले. त्यांनी आपल्या महिला कर्मचाऱ्यांना ‘बिटकॉइन’मध्ये पगार देण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितलेला एक अनुभव असा : अफगाणिस्तानमध्ये एका महिला कर्मचाऱ्याला तिचा नवरा मारहाण करायचा आणि अनेक बंधने लादायचा. त्याच महिलेने रोया महबूब यांच्या कंपनीसाठी काम करून ‘बिटकॉइन’ कमावले आणि तेच ‘बिटकॉइन’ एका वकिलाला देऊन आपला घटस्फोट घडवून आणला!
नेमके इथेच अॅण्ड्रीज अॅण्टोनोपोलस यांचे ‘बिटकॉइन’संदर्भातील स्वप्न समजून घेणे गरजेचे आहे. कारण ते ‘मी आज बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली तर किती फायदा होईल’ या विचारापलीकडे आहे. गुंतवणूकदारांना ‘बिटकॉइन’ हे सोन्यासारखे वापरायचे असून, अॅण्टोनोपोलस यांना ते एक चलन म्हणून वापरायचे आहे, ज्यामध्ये सरकार आणि बँकांचा हस्तक्षेप नसेल. त्यापासून प्रेरणा घेऊन, ‘बँकिंग नसलेल्यांना बँकिंग सुविधा देऊ’ या उद्देशाने अनेक स्टार्टअप ‘ब्लॉकचेन’ विश्वात पाऊल ठेवत आहेत. पण ‘द इंटरनेट ऑफ मनी’ या पुस्तकाच्या दुसऱ्या खंडात अॅण्टोनोपोलस आपले स्वप्न स्पष्टपणे मांडतात : ‘सर्वाना बँकेपासून मुक्त करणे, म्हणजे सर्व बँकिंग सुविधा त्याच्या/तिच्या आर्थिक, सामाजिक किंवा भौगिलिक परिस्थितीच्या निरपेक्ष ‘बिटकॉइन’द्वारे प्रदान करणे.’
हे स्वप्न कितपत सत्यात उतरते, ते येत्या वर्षभरात दिसेलच.
लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io