हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गौरव सोमवंशी
‘बिटकॉइन’ या कुटचलनावर किंवा संकल्पनेवर कोणाचीही मक्तेदारी नाही. त्यामुळेच सुरुवातीपासूनच बिटकॉइनला समांतरपणे इतर कुटचलने बाजारात आली. या पर्यायी कुटचलनांच्या घडण्यामागील प्रक्रिया कोणती?
अमुकतमुक अॅप अपडेट करण्याचे संदेश तुमच्या मोबाइलमध्ये येत असतीलच. याचे दोन प्रकार असतात. बऱ्याच वेळा अॅप अपडेट केलेले नसले तरी तुम्ही ते वापरू शकता आणि तुमच्या सोयीने त्यास अपडेट करू शकता. पण कधी कधी असेही होते की, अॅप अपडेट केल्याशिवाय तुम्हाला ते वापरताच येत नाही. याचा अर्थ असा की, तुमच्याकडे असलेल्या अॅपचे ‘व्हर्जन’ हे जोपर्यंत ते नव्या बदलांना स्वीकारत नाही, तोवर वापरले जाऊच शकत नाही. याच संदर्भात आपण ‘बिटकॉइन’ व अनुषंगाने ‘ब्लॉकचेन’मधील ‘हार्ड फोर्क’ आणि ‘सॉफ्ट फोर्क’ समजून घेऊ या..
‘ब्लॉकचेन’ हे एका अविरत धावत्या रेल्वेप्रमाणे असते, ज्यात एकापाठोपाठ एक असे नवीन ‘ब्लॉक’ जोडले जातात. मात्र या धावत्या रेल्वेमध्ये पुढे येणाऱ्या बदलांनुसार आपल्याला सुधारणा करता येतात. बदल करण्याची प्रक्रिया अर्थात ‘बिटकॉइन इम्प्रुव्हमेन्ट प्रपोजल (बीआयपी)’बद्दल आपण ‘बिरबल, बदल आणि बिटकॉइन’ (९ जुलै) या लेखात पाहिलेच आहे. जर सुचवलेल्या बदलांमुळे आपल्या नियमावलीत काही मूलगामी बदल होणार नसतील आणि स्वत:कडे असलेले सॉफ्टवेअर अपडेट नाही केले तरी चालणार असेल, तर अशा बदलांना आपण ‘सॉफ्ट फोर्क’ म्हणतो. ‘सॉफ्ट फोर्क’मध्ये दोन भिन्न ‘ब्लॉकचेन’चा उगम होत नाही; तर आहे त्याच ‘ब्लॉकचेन’मध्ये मूलगामी सुधारणा न करणारे बदल होतात. मग बाकीच्या बदलांचे काय? जर त्यांचे अवलंबन केल्यास दोन भिन्न मार्ग- म्हणजे ब्लॉकचेन बनतीलच. एक मार्ग हा जुन्या पद्धतीने पुढे सरकेल आणि नवीन मार्ग हा नव्या नियमांनुसार काम करेल. आपण पाहिलेल्या बिरबलच्याच कथेनुसार सगळे बिटकॉइन वापरणारे लोकच यातील कोणाला पाठिंबा द्यावा/ न द्यावा, हे ठरवतील. मागील लेखात (‘‘बिटकॉइन कॅश’ आणि ‘सेगविट’’, १६ जुलै) आपण ‘बिटकॉइन कॅश’चा उगम कसा झाला, हे पाहिले. इथे एक प्रश्न पडेल की, समजा ज्यांच्याकडे आधी उदाहरणार्थ १० बिटकॉइन होते, त्यांनी ‘बिटकॉइन कॅश’ अवलंबण्याचा मार्ग निवडला, तर त्यांच्याकडे १० ‘बिटकॉइन कॅश’ असतील की ० ‘बिटकॉइन कॅश’?
तर.. जेव्हा ‘हार्ड फोर्क’ घडतो तेव्हा तुम्ही दोन्हीही कॉइनचे मालक बनता.. तुम्हाला एकाच वेळी दोन्हीही वापरता येतात! याचा अर्थ आपण आधीपेक्षा दुप्पट श्रीमंत झालो का? याचे उत्तर शोधताना, ‘संख्या आणि मूल्य’ (२ जुलै) हा लेख आठवा. त्यात आपण पाहिले की, ‘ब्लॉक’ बनवण्यासाठी मायनिंग केल्याबद्दल मिळणारी बक्षिसी ही दर वर्षी अर्धी होत गेली, तरीसुद्धा त्यांचे मूल्य हे कालांतराने वाढत गेले. कारण बिटकॉइनचा प्रचार आणि वापर वाढत गेला. ‘फोर्क’बाबतही असेच काहीसे होतेय. पण उलट दिशेने. इथे संख्या दुप्पट झाली, पण मूल्य दुप्पट झालेले नाही. कारण मूल्य हे त्या एकूण कॉइनच्या वापरावर अवलंबून असते. जेव्हा काही जण एक मार्ग निवडतात आणि काही जण दुसरा, तर एकूण मूल्य कालांतराने जवळपास सारखेच होते. इतकेच नाही, तर अनेक वेळा दुसरा मार्ग हा वापराअभावी लुप्तसुद्धा होतो. जसे की, सर्वात पहिला हार्ड फोर्क ज्याला म्हणता येईल तो माइक हर्न्स यांनी सुचवला होता. माइक हर्न्सबद्दल आपण ‘संख्या आणि मूल्य’ या लेखात जाणून घेतले होतेच. हर्न्स यांच्याबरोबरच सातोशी नाकामोटोने शेवटचा ज्ञात संवाद साधला होता. हर्न्स यांनी २०१४ मध्ये ‘बिटकॉइन एक्सटी’ नामक चलन आणि मूळ बिटकॉइनपेक्षा सरस प्रणाली शोधल्याचा दावादेखील केला होता. पण हे चलन काही केल्या चालू शकले नाही, याचे कारण त्यास वापरकर्त्यांनी नाकारले. ज्यांच्याकडे तेव्हापासूनचे ‘बिटकॉइन एक्सटी’ असतील त्यांचे मूल्य नाहीसे झाले असेल. म्हणजेच, संख्या वाढली म्हणून मूल्य वाढेल असे नाही.
आणखी काही ठळक ‘हार्ड फोर्क’ आपण पाहूयात. माइक हर्न्स यांनी ‘ब्लॉक’ची क्षमता आठ मेगाबाइट इतकी करून ‘बिटकॉइन एक्सटी’ सुरू केले होते. नंतर २०१६ मध्ये डेव्हलपर्सच्या एका समूहाला वाटले की, ही क्षमता दोन मेगाबाइट इतकीच ठेवावी आणि त्यातून व्यवहारांची होणारी कोंडी थांबवावी. त्या समूहाने २०१६ मध्ये ‘हार्ड फोर्क’ केले आणि ‘बिटकॉइन क्लासिक’ सुरू केले; मात्र त्यास साधारण प्रतिसाद मिळाला. ‘बिटकॉइन अनलिमिटेड’ हा ‘हार्ड फोर्क’ आपल्या नावाप्रमाणे ‘ब्लॉक’ची क्षमता ही मायनर मंडळी हवी तेवढी ठेवतील असा प्रस्ताव आहे.
असाच आणखी एक चित्तवेधक ‘हार्ड फोर्क’ हा ‘बिटकॉइन गोल्ड’ म्हणून ओळखला जातो. ‘नॉन्स नंबर’ शोधून काढायला शक्तिशाली संगणक लागतात हे आपण पाहिले आहे. सध्या ‘मायनिंग पूल’ आणि ‘मायनिंग फार्म’ हेसुद्धा बरेच प्रचलित झाले आहेत. यात अनेक शक्तिशाली संगणक एकत्र काम करतात. चीन याबाबतीत बराच आक्रमक आहे आणि स्वत:चे अनेक ‘मायनिंग फाम्र्स’ बनवून अधिकाधिक बिटकॉइन स्वत:कडे राहावे म्हणून प्रयत्नशील आहे. या सदरातील तिसऱ्याच लेखात (‘एकाच वेळी सगळीकडे आणि सर्वाचे..’, १६ जानेवारी) आपण पाहिले होते की, बिटकॉइनची व्याख्या ही ‘डिस्ट्रिब्युटेड डिसेन्ट्रलाइज्ड लेजर (वितरित विकेंद्रित नोंदवही)’ अशी आहे. परंतु जर मायनिंग म्हणजेच ‘नॉन्स नंबर’ शोधण्याची प्रक्रिया ही फक्त मोठी गुंतवणूक करून बलाढय़ संगणक विकत घेऊ शकणाऱ्या लोकांकडेच राहिली, तर आपण भविष्यात त्या व्याख्येतील ‘विकेंद्रित’ शब्द गमावून बसू. असे काही होऊ नये म्हणून मायनिंगच्या ‘प्रूफ ऑफ वर्क’ नियमावलीतच मूलभूत बदल घडवून सर्वाना ‘नॉन्स नंबर’ मिळण्याची जवळपास समान संधी मिळावी यासाठी ‘बिटकॉइन गोल्ड’ हा ‘हार्ड फोर्क’ केला गेला. ‘बिटकॉइन गोल्ड’च्या संकेतस्थळावर ‘चला, बिटकॉइनला पुन्हा विकेंद्रित करू या’ हे त्यांचे ध्येयवाक्य दिले आहे. लेख लिहीत असताना एका ‘बिटकॉइन गोल्ड’ची किंमत ७०० रुपये असून, मूळ बिटकॉइनची किंमत सात लाख रुपये इतकी आहे.
आतापर्यंत आपल्याला हे समजले असेल की, सातोशी नाकामोटोपासून बिटकॉइनची सुरुवात झाली. मात्र कुटचलन (क्रिप्टोकरन्सी) या संकल्पनेवर आपलीच मक्तेदारी असेल, अशी सातोशी नाकामोटोची इच्छा किंवा हेतूदेखील नव्हता. काहींनी सुरुवातीपासून बिटकॉइनप्रमाणे स्वत:चे कुटचलन (क्रिप्टोकरन्सी) बाजारात आणले. यांना ‘अल्टकॉइन’देखील म्हटले जाते. ‘अल्टरनेटिव्ह’ आणि ‘बिटकॉइन’ या दोन शब्दांपासून बनलेला हा शब्द ‘बिटकॉइनला असलेला पर्याय’ या अर्थाने तयार करण्यात आला आहे. आजघडीला जवळपास पाच हजारांहून अधिक ‘अल्टकॉइन’ बाजारात आहेत. अब्जावधी रुपयांच्या या बाजारात, आजही बिटकॉइनचा हिस्सा हा एकूण बाजाराच्या ६० टक्क्यांहून जास्त आहे.
‘अल्टकॉइन’चेही विविध प्रकार असतात. जर एखाद्या ‘अल्टकॉइन’चे मूल्य हे एखाद्या राष्ट्रीय चलनाबरोबर ‘जोडले’ गेले असेल, तर त्यास ‘स्टेबल कॉइन’ असे म्हणतात. फेसबुकने मागे स्वत:चे ‘लिब्रा’ नावाचे कुटचलन सुरू करणार असल्याचे जाहीर केले; तेदेखील ‘स्टेबल कॉइन’चेच उदाहरण. या ‘लिब्रा’ प्रकल्पात अनेक बलाढय़ कंपन्यांनी पैसा गुंतवला आहे; पण या प्रकल्पास अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.
लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत.
ईमेल : gaurav@emertech.io