या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गौरव सोमवंशी

‘बिटकॉइन’ अवतरल्यानंतर काही वर्षांतच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक अजब धडपड सुरू झाली. काहींनी बिटकॉइनच्याच मूळ प्रणालीत बदल घडवून हवे तसे चलन बनवले, तर काहींना बिटकॉइनमधील मर्यादा आड येऊ लागल्या तेव्हा स्वत:चीच ‘ब्लॉकचेन’ उभारावी असे वाटू लागले. व्हिटालिक ब्युटेरिन हा तरुणही या स्थितीस सामोरा गेला.. आणि अधिक व्यापक, स्वायत्त, पूर्वग्रहविरहित तंत्रव्यासपीठाचा उदय झाला..

आतापर्यंत हे स्पष्ट झाले आहे की, ‘बिटकॉइन’चा उद्देश जगातील कोणत्याही बँकेशिवाय किंवा सरकारशिवाय दोन व्यक्तींमध्ये विश्वासपूर्ण आर्थिक व्यवहार घडवून आणण्याचा होता. मग आला व्हिटालिक ब्युटेरिन. त्याने पाहिलेल्या ‘ईथिरियम’च्या स्वप्नात ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाच्या जोरावर कोणी कुठलाही संगणकीय प्रोग्राम वा अ‍ॅप्लिकेशन बनवू शकेल आणि हे करण्याचे अधिकार व स्वातंत्र्य प्रत्येकास असेल, हे अपेक्षित आहे. असा एक सार्वत्रिक ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म बनवताना कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते, हे पाहू..

‘बिटकॉइन’ आल्यानंतर काही वर्षांतच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक अजब धडपड सुरू झाली. काहींनी बिटकॉइनच्याच मूळ प्रणालीमध्ये काही बदल घडवून त्यांना हवे तसे टोकन किंवा चलन बनवले. काहींना बिटकॉइनच्याच मर्यादा आड येऊ लागल्या तेव्हा स्वत:चीच ‘ब्लॉकचेन’ उभारावी असे त्यांना वाटू लागले. अशाच एका ‘मास्टरकॉइन’ नावाच्या नव्या चलनावर २०१३ मध्ये व्हिटालिक ब्युटेरिन काम करत होता. त्याने ‘मास्टरकॉइन’च्या प्रोग्रामर्सना सुचवले की, त्याच्या संगणकीय प्रणालीत काही बदल घडवून ते ‘मास्टरकॉइन’कडून इतर काही कामे करवून घेऊ शकतात. त्या प्रोग्रामर्सना ही युक्ती आवडली; पण सुरुवातीपासून केलेले काम खोडून नवीन काही बनवावे अशी त्यांची इच्छा नव्हती. पण ब्युटेरिन ती युक्ती विसरून न जाता त्यावरच अधिक विचार करत राहिला. त्याच वर्षी अमेरिकेत परतल्यावर सॅन फ्रॅन्सिस्कोला रोज संध्याकाळी बागेत फेरफटका मारण्याच्या वेळात तो याबद्दलच विचार करत असे. ब्युटेरिनला कल्पना सुचली की, एकच सार्वत्रिक ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म बनवू, ज्यावर कोणासही, कोणताही प्रोग्राम बनवता येईल. ब्युटेरिनने या प्लॅटफॉर्मच्या काही गुणधर्माचाही विचार केला, जे त्याने २०१३ सालीच जगासमोर मांडले :

(१) समजण्यास साधेसोपे : ब्युटेरिनच्या मते, हे सार्वत्रिक प्लॅटफॉर्म एक वेळ कार्यक्षमतेबाबत थोडे मागे पडले तरी चालेल, पण ते समजायला किंवा वापरण्यास क्लिष्ट असू नये. कारण त्याला हे ठाऊक होते की, असे केल्याशिवाय ‘ईथिरियम’ हे लोकशाही मार्गाने प्रचलित होणार नाही.

(२) व्यापकता : ‘ईथिरियम’ हे एखाद्याच वैशिष्टय़ावर आधारित नसावे; पण कोणाच्याही मनात आलेल्या, कोणत्याही क्षेत्रातील कोणतीही विशिष्ट कल्पना ‘ईथिरियम’वर साकारू शकेल. असे करताना ‘टय़ुरिंग कम्प्लिट’ भाषेचा उपयोग कसा केला जाऊ शकतो, हे आपण मागील लेखात पाहिलेच आहे.

(३) अंतर्गत स्वायत्तता : समजा, एका प्रणालीतील एक भाग बाजूला केला, तर इतर स्वतंत्र भागांवर त्याचे पडसाद उमटू नयेत. यासाठी आधीपासूनच अशी तरतूद असावी की, स्वतंत्र तुकडय़ांचे एक जुळून येणारे यंत्र असावे.

(४) लवचीकता वा चिकाटीतील समतोलपणा : ‘बिटकॉइन’मध्ये कोणीही स्वमताने तंत्रज्ञानात काहीही बदल करू शकत नाही, पण लोकशाही मार्गाने गेल्यास आणि आपले सगळे विचार वा कृती पारदर्शक केल्यास जनमताने बदल घडवता येतात. हे होताना मतभेदांना कसे सामोरे जायचे, याची चर्चा आपण ‘बिरबल, बदल आणि बिटकॉइन’ (८ जुलै) या लेखात केली आहे. तेच ‘ईथिरियम’मध्ये अवलंबले जाते.

(५) भेदभावविरोधी आणि पूर्वग्रहविरहित : ब्युटेरिनला वाटले होते की, एक सार्वत्रिक ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म कोणत्याही कल्पनेविरुद्ध नसावे आणि सर्वसमावेशक असणे हे त्याचे धोरण असायला हवे.

वरील पाच गुणधर्म मांडल्यावर ब्युटेरिनबरोबर अनेक लोक जोडले गेले.

आता आपण थोडक्यात ‘बिटकॉइन’ आणि ‘ईथिरियम’ यांतील इतर महत्त्वाचे फरक पाहू या.

(अ) नोंदवहीच्या दोन पद्धती :

‘बिटकॉइन’ ही एक जागतिक नोंदवही कशी आहे, याची चर्चा या लेखमालेत याआधी केली आहेच. पण कोणतीही नोंदवही ही दोन प्रकारची असते. नक्की व्यवहार घडतात कसे आणि नेमके कोणत्या गोष्टींना प्राधान्य देऊन अंतर्गत प्रणाली काम करते, यावरून हे प्रकार ठरतात :

(१) अन्स्पेंट ट्रँजॅक्शन आऊटपुट : ‘बिटकॉइन’मधील प्रणाली कोणाकडे किती बिटकॉइन आहेत याची नोंद ठेवते अथवा व्यवहार घडवून आणते. ती प्रणाली प्रस्थापित बँकिंग प्रणालीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. इथे आपण ‘व्यवहारां’ना प्राधान्य देतो आणि त्याभोवती सगळी प्रणाली रचली जाते. उदाहरण पाहू.. समजा, बॉबकडे १०० बिटकॉइन आहेत आणि त्याला चार्लीला १० बिटकॉइन द्यायचे आहेत. पण इथे बॉबकडे असलेले ‘१०० बिटकॉइन’ हा काही एकसुरी आकडा नसून प्रत्येक बिटकॉइन व्यवहारावर लक्ष दिलेले असते. म्हणजे बॉबकडे १०० बिटकॉइन यामुळे आहेत, कारण त्याला दोन जणांनी दोन स्वतंत्र व्यवहारांत प्रत्येकी ७० आणि ३० बिटकॉइन दिले होते. समजा, बॉबला आता चार्लीला ५० बिटकॉइन द्यायचे आहेत. तर सर्वात आधी त्या ७० बिटकॉइनचा तुकडा वापरून चार्लीला त्याचे ५० बिटकॉइन दिले जातात आणि उरलेल्या २० बिटकॉइनची मालकी बॉबकडे दर्शवली जाते. ७० मधील हे २० बिटकॉइन खर्चिले गेले नाहीत, म्हणून ते ‘अन्स्पेंट’. बिटकॉइनमध्ये प्रामुख्याने याच ‘अन्स्पेंट’ म्हणजे खर्च न केल्या गेलेल्या बिटकॉइनवर आणि त्यांच्या मालकीवर लक्ष वेधले जाते.

(२) खात्यांवर आधारित पद्धत : ही पद्धत समजून घेण्यास सोपी आहे; कारण ‘ईथिरियम’ जसे काम करते तसेच प्रस्थापित बँकिंग प्रणाली वा कोणतीही नोंदवहीची पद्धत काम करेल. इथे लक्ष पूर्णपणे खात्यांवर असून व्यवहार नंतर येतात. ‘ईथिरियम’मध्ये हे करणे गरजेचे होते, कारण इथे इतक्या अनेक प्रकारचे प्रोग्राम बनू शकतात, की ‘ईथर’चे मुख्य काम हे ‘गॅस’ म्हणून अधिक आहे आणि ‘ट्रॅकर’ म्हणून कमी.

(ब) एक ब्लॉक बनवण्यासाठी ‘बिटकॉइन’मध्ये १० मिनिटे लागतात आणि तशी तरतूद का गेली आहे हेही आपण ‘चार शून्य.. बिटकॉइन!’ (११ जून) या लेखात पाहिले आहे. त्यासाठी ‘ईथिरियम’मध्ये केवळ १३ सेकंद लागतात.

(क) बिटकॉइन जसे ‘अन्स्पेंट’ व्यवहारांवर लक्ष देते, तसे ‘ईथिरियम’ स्वत:ला ‘वेई’ या एककात मोजते.

(ड) बिटकॉइनबाबत ‘प्रूफ ऑफ वर्क’ ही बहुमत सिद्ध करून सत्याकडे घेऊन जाणारी कार्यप्रणाली आपण याआधी पाहिलीच आहे, ती ‘ईथिरियम’मध्ये वेगळ्या रूपात वापरली जाते. या प्रणालीचे नाव ‘ईथॅश’ असे आहे. बिटकॉइनमध्ये जसे महागडे संगणक वापरून बिटकॉइन जिंकण्याची शक्यता वाढू शकते, तसे होण्याची क्षमता ‘ईथिरियम’मध्ये फार कमी आहे.

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत.

ईमेल : gaurav@emertech.io