समाजोपयोगी कामाचा वसा घेऊन त्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या स्वार्थनिरपेक्ष कामाची समाजाला ओळख व्हावी आणि त्यांच्या कामात समाजाचाही सहभाग वाढावा या उद्देशाने ‘लोकसत्ता’ने राबविलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमास या वर्षीदेखील लाखो वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रासह आंध्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, चेन्नई तसेच परदेशातील वाचकांनी या संस्थांच्या कामाला आर्थिक हातभार लावून रचनात्मक कामांशी असलेल्या बांधीलकीच्या स्तुत्य मानसिकतेचा प्रत्यय दिला. या वर्षी विज्ञान, संगीत, इतिहास संशोधन, ग्रंथालय, रुग्णसेवा, वृद्धाश्रम आणि उपेक्षितांना स्वावलंबी बनवण्यासाठी दुर्गम भागात काम करणारे अशा दहा निवडक संस्थांचा परिचय या उपक्रमातून ‘लोकसत्ता’ने करून दिला आणि समाजातील या आधारस्तंभांकडून संस्थांच्या मदतीसाठी ‘लोकसत्ता’कडे तसेच संस्थांकडे धनादेशांचा अक्षरश: महापूर लोटला. सामाजिक बांधीलकीसाठी, सामाजिक कृतज्ञता निधीसाठी परिचित असलेले विख्यात अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या हस्ते शनिवारी मुंबईतील ‘एक्स्प्रेस टॉवर्स’मधील ‘लोकसत्ता’ कार्यालयाच्या सभागृहात या धनादेशांचे वितरण करण्यात आले. या पाश्र्वभूमीवर संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना..
१९ ऑक्टोबर २०११ रोजी ‘सर्वकार्येषु सर्वदा’ चा पहिला दानयज्ञ झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व रविवार विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarvakaryeshu sarvada loksatta upakram