या प्रश्नाच्या उत्तरात सरसंघचालक म्हणाले की, ‘‘इंडियात ज्या घटना घडत आहेत, त्या अतिशय गंभीर आणि अश्लाघ्य आहेत. पण, असे भारतात मात्र होत नाही. जेथे इंडिया नाही, केवळ भारत आहे, तेथे अशा घटना होत नाहीत. ज्याने भारताशी नाते तोडले, तेथे अशा घटना होतात. असे होण्याला अनेक कारणे आहेत. त्यातील प्रमुख कारण सांगायचे तर आम्ही मानवता विसरलो आहोत. संस्कार विसरलो आहोत. मानवता आणि संस्कार हे पुस्तकातून शिकता येत नाहीत. ते परंपरेतून शिकावे लागतात. पालनपोषणातून ते आपोआप शिकता येतात. ते कुटुंबातून मिळतात. आम्ही कुटुंबात काय शिकतो हे महत्त्वाचे आहे.’’
शिक्षणात मानवतेचे संस्कार हवेत, हा मुद्दा सरसंघचालकांनी विशद करून सांगितला आणि तो ठसवताना ते म्हणाले, ‘‘कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत चालायची असेल तर माणूस पापभीरू असावा लागतो. त्यासाठी संस्कार आवश्यक असतात. आमच्या संस्कृतीतून आलेल्या संस्काराला आम्हाला शक्य तितक्या लवकर जागे करावे लागेल. याचा समावेश शिक्षणात करता आला तर परिस्थिती बदलणे शक्य होईल. तोवर कठोर कायदे आणि कठोर शिक्षेची तरतूद आवश्यक आहे. शासनाच्या हाती दंडाचे अधिकार असायलाच हवेत. त्याचा वापरही नीट व्हायला हवा. पण, विरोध करणाऱ्यांवर केवळ कायद्याचा बडगा उगारून चालणार नाही. संस्कार म्हणूनच आवश्यक आहेत. ते वातावरणातून मिळतात. ते वातावरण आज दुर्दैवाने नाही. आम्ही प्रयत्न केले, तर या समस्येवर तोडगा निश्चितपणे शोधता येऊ शकतो.’’
सरसंघचालकांचे मूळ वक्तव्य वाचल्यानंतर त्यांनी कोणत्या दृष्टिकोनातून इंडिया आणि भारत या शब्दांचा उच्चार केला, हे स्वयंस्पष्ट आहे. पण, वाहिन्यांनी दिवसभर अकारणच गरळ ओकण्याचा प्रयत्न केला. त्यांचा विरोध कदाचित या वक्तव्याला कमी आणि संघावर टीका करण्याच्या हेतूने अधिक होता, असे दिसले. पत्रकारितेत स्वत:ला पुरोगामी भासविण्याचा अनाठायी आणि ओंगळवाणा प्रयत्न त्यातून दिसून येत होता. ज्या सुजाण नागरिकांना सरसंघचालकांचे मूळ भाषण ऐकायचे आहे, ते ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट न्यूजभारती डॉट कॉम’ या संकेतस्थळावर जाऊन ऐकू शकतात. हे संपूर्ण भाषण तेथे व्हिडीओ रूपाने उपलब्ध आहे.
किरण दामले, कुर्ला (प.)
सरसंघचालकांचे मूळ भाषण पाहा, ऐका!
रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या एका विधानावरून प्रसारमाध्यमांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला गेला. ज्या मूळ वक्तव्यामुळे हा गदारोळ झाला, तो एक वार्तालापाचा कार्यक्रम होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-01-2013 at 10:35 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: See real speech of rss chief and listen it