मोदी मंत्रिमंडळात फक्त एकच, तेही ‘अवजड’ खाते मिळाल्यामुळे शिवसेना नाराज आहे. त्यांच्या नाराजीचे कारण रास्त असले तरी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आता हे हट्ट सोडले पाहिजेत! बाळासाहेबांचा मान ठेवून नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला एक तरी मंत्रिपद दिले आहे! काहीच नसते दिले तर काय केले असते? ज्या राज्याचे नरेंद्र मोदी प्रतिनिधित्व करतात त्या राज्यालाही नरेंद्र मोदींनी जास्त मंत्रिपदे दिली आहेत असेही नाही. त्यामुळे हा आमच्यावर अन्याय आहे असे गुजरातने आणि शिवसेनेनेही मानण्याचे कारण नाही, कारण नरेंद्र मोदींचा भर हा आत्ता तरी छोटय़ा मंत्रिमंडळावर आहे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. हेही लक्ष्य साध्य करायचे असेल तर शिवसेनेला भाजपशिवाय तरणोपाय नाही. स्वत: एकटे उद्धव ठाकरे स्वबळावर महाराष्ट्रातील सत्ता मिळवू शकत नाहीत.
लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला महाराष्ट्रात जे यश मिळाले आहे ते मोदी लाटेमुळे आणि आधीच्या सरकारच्या अंदाधुंद कारभारामुळे! मिळालेली सत्ता ही अशा प्रकारे आपापसात भांडणे करून घालवण्यापेक्षा केंद्राला बळ कसे मिळेल, ही सत्ता अबाधित कशी राहील अशा प्रयत्नात राहिले पाहिजे. मंत्रिपद नाही तर नाही. त्यामुळे शिवसेनेने केंद्राच्या सत्तेच्या दुधात साखर होण्याचे नाही तर नाही, पण मिठाचा खडा होण्याचे तरी काम करू नये!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा