सध्या ५० रुपयांत पुस्तक या योजनेचा मोठा बोलबाला चालू असतानाच लोकसत्तेत (८ फेब्रु.) पायरसीची बातमी छापून आली आहे. मला तरी या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात. जी पुस्तकं लोकप्रिय आहेत, चांगली चाललेली आहेत त्यांच्या स्वस्त आवृत्त्या काढण्याचे प्रयोग प्रकाशकांनी केले नाहीत म्हणून ही वेळ आली आहे. आणि मग यावरची प्रतिक्रिया म्हणून कुठे पायरसी कर किंवा मग ५० रुपयांत पुस्तक विकून मोकळं हो असं चालू आहे. राजहंस प्रकाशनाने काही पुस्तकांच्या स्वस्त आवृत्त्या काढलेल्या आहेत.
िहदीमध्ये पॉकेटबुक्स नियमित प्रकाशित होतात. तिथे असल्या वाईट प्रवृत्ती बळावलेल्या नाहीत. आपणही पु.ल.देशपांडे, रणजित देसाई, शिवाजी सावंत, वि.स.खांडेकर यांच्या पुस्तकांच्या पॉकेट बुक्स आवृत्त्या काढायला पाहिजेत. मराठी प्रकाशक याबाबत फारच संकुचित वृत्तीचे आहेत. मृत्युंजयसारख्या पुस्तकाची स्वस्त आवृत्ती आजपर्यंत का प्रसिद्ध झाली नाही? (अचानक पायरेटेड आवृत्तीच मुंबईच्या फुटपाथवर कशी दिसू लागली?) हे पुस्तक तर चांगले चालेलेले आहे. मग या पुस्तकावर प्रयोग न करून प्रकाशकाने काय मिळवले? याच पुस्तकाची डिलक्स आवृत्ती, लहान मुलांसाठी संक्षिप्त आवृत्ती, रंगीत मोठी आवृत्ती असं का नाही केलं गेलं? न चालणाऱ्या पुस्तकांबाबत आपण समजू शकतो की तिथे अर्थकारण आडवं येतं. पण जी पुस्तकं अतिशय लोकप्रिय आहेत, त्यांना मराठी वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे त्या पुस्तकाबाबतही असं का व्हावं? एक सामान्य वाचक आणि साहित्यप्रेमी म्हणून मला तरी असं वाटतं. यामुळे प्रकाशकाला फटके बसत असतील तर चांगलंच आहे. काहीच न करण्याची त्यांची उदासीनता तरी यामुळे संपेल अशी एक आशा वाटते.
– अॅड. मिलिंद महाजन,
उंडणगांव (ता. सिल्लोड, औरंगाबाद)
पायरसी आणि मृत्यूंजय ५० रुपये! एकाच नाण्याच्या बाजू
सध्या ५० रुपयांत पुस्तक या योजनेचा मोठा बोलबाला चालू असतानाच लोकसत्तेत (८ फेब्रु.) पायरसीची बातमी छापून आली आहे. मला तरी या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात. जी पुस्तकं लोकप्रिय आहेत, चांगली चाललेली आहेत त्यांच्या स्वस्त आवृत्त्या काढण्याचे प्रयोग प्रकाशकांनी केले नाहीत म्हणून ही वेळ आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-02-2013 at 12:47 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two sides of a coin piracy and mrutunjay