खरे तर हा विषय किमान शंभर वर्षे जुना. शब्दप्रभू राम गणेश गडकरी यांचा मृत्यू २३ जानेवारी १९१९ रोजी झाला, त्याहीआधी गडकरींनी ‘नाटक कसे पाहावे’ या शीर्षकाचे स्फुटलेखन केले आणि त्यांच्या ‘संपूर्ण बाळकराम’ या पुस्तकात ते वाचताही येते. त्याची आत्ताच आठवण यावयाचे कारण असे की, एकापाठोपाठ तिघा मराठी नाटय़कलावंतांनी एकाच विषयाला वाचा फोडली आहे. मोबाइलची घंटा वाजत असल्यास एक तर प्रेक्षकांनी नाटक पाहू नये किंवा आम्ही नाटय़प्रयोग करू नये, असे या तिघांचे म्हणणे. हे तिघेही केवळ मराठी रंगकर्मीच नसून चित्रवाणी मालिका, चित्रपट यांमध्येही या तिघांचा संचार असल्याने, शिवाय हे तिघे हल्लीच्या मनोरंजन-उद्योगातील एकाच मातबर संस्थेशी संबंधित असल्याने त्यांच्या म्हणण्याची चर्चा अधिक. अभिनेता भरत जाधव यांनी याआधी याच विषयाला वाचा फोडली होती; पण त्या तुलनेत सुमित राघवन, चिन्मय मांडलेकर आणि सुबोध भावे यांनी फोडलेल्या वाचेची चर्चा अधिक. चर्चा तर होणारच म्हटले, तरी ती साधकबाधक असावी, म्हणून दोन्ही बाजूंचे लोक सरसावणारच. तेव्हा ‘नाटक कसे पाहावे’ याचे राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज ऊर्फ बाळकराम यांच्यानंतर या चर्चेच्या एका बाजूस शतकभराने सापडलेले उत्तर असे की, मोबाइलचा आवाज न करता नाटक पाहावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा