ही खरे तर एक सहज स्वाभाविक परिणती आहे. पण आमच्यासारख्या मूढमती मंडळींना तिच्या या अगाध रूपाबद्दल भलताच अचंबा आणि काहीशी मौजही वाटत आहे. केंद्रात पुन्हा तेच सरकार मे महिन्यात सत्तेचा सोपान चढले. पूर्वीपेक्षा अधिक संख्याबळ आणि दमदारपणे हा विजयपथ साकारला गेला. ही गोष्ट सांगण्यासारखी नाही तर अनुभवण्यासारखी आहे. इतका तिचा दरवळ आणि गुंजारव आसपास सुरू आहे. नव्या भारतविश्वाचे रानवारे सर्वत्र वाहत आहेत, नव्या उगवणाऱ्या सायंताऱ्यांनी आसमंत व्यापले आहे. साऱ्या जगाला भुरळ पाडणाऱ्या या प्रतापाच्या मोहिनीने ज्याला भुलविले नाही तो या ग्रहाचाच नाही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेच पाहा ना, शेअर निर्देशांकांनी उत्तरोत्तर उसळीचा क्रम सुरू ठेवला आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या पराक्रमी विजयाची बरोबरी ही दलाल स्ट्रीटच्या निर्देशांकांनी विक्रमी शिखर गाठून केली आहे. ताजे, सोमवारचे उदाहरण घ्या. ख्यातनाम सेन्सेक्स पाच शतकी उसळी घेत नवीन सार्वकालिक उच्चांकाला चढला. अर्थातच बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये आनंदोत्सवाचा क्षण. शेअर्स आणि सोने यांचे खरे तर विळा-भोपळ्याचे नाते. तरी सोमवारी सोन्याच्या किमतींनीही मोठी उसळी घेतली. सोन्यातील गुंतवणूकदारही मग खूश. शेअर्स आणि सोन्यात पैसा जोखमीचा म्हणून रोखे गुंतवणुकीचा सावध मार्ग स्वीकारलेलेही आनंदी. दहा वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांचा परतावा दर सात टक्क्यांखाली घसरणे हे या गुंतवणूकदारांसाठी लाभकारकच! एकाच दिवसात शेकडा ४२ पैसे लाभाचे माप पदरी पडणे हे या गुंतवणूकदारांनी गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच अनुभवले. हे सारे कमी म्हणून काय, अमेरिकी डॉलरपुढे रुपयाने सोमवारच्या दिवसात ४४ पैशांची कमाई करण्याचा प्रसंगही विरळाच. एकुणात वित्त बाजारात सारे काही अभूतपूर्वच सुरू आहे. बाजाराची अवस्था ‘क्षितिजा आले भरते गं, हवेत अत्तर तरते गं’ अशी झाली आहे.

पण ही भोवताली दाटलेली किमया जाणण्याची समज व दृष्टी काही केल्या आम्हास साधलेली नाही. बाजाराला सट्टा म्हणावा इतकी आमची अनभिज्ञता नक्कीच नाही. त्यामुळेच एकंदर अर्थपरिमाणे विपरीत असताना, भोवताली सुरू असलेल्या उत्साही उसळ्या आणखीच बेचैन करतात. उभ्या देशाला दुष्काळ वणव्याने ग्रासले आहे. यंदाच्या वर्षीही पाऊसपाणी पुरेसे होईल याची खात्री नाही. अन्नधान्य महागाईची चढती कमान चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. मागणीअभावी औद्योगिक उत्पादकतेला उतरती कळा लागली आहे. मागणीच नाही तर गुंतवणूक तरी कशाला असे हे दुष्टचक्र अर्थव्यवस्थेच्या गतीला बाधित करीत आहे. बुडीत कर्जाच्या डोंगराने ताळेबंदाचा बोजवारा उडालेल्या बँकांची अवस्था पैसा आहे पण कर्जाऊ  घेणारे नाहीत अशी आहे. परिणामी अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर सरलेल्या तिमाहीत पंचवार्षिक नीचांकी पातळीवर रोडावला आहे..

..या निराशाजनक चित्राचा लवलेशही न दिसावा असे उत्साही वातावरण गुंतवणूक विश्वात आहे. बाजाराला जे भरते आले आहे ते नेमके कशाने? भांडवली बाजार हा वास्तविकतेपेक्षा नेहमी अपेक्षांवरच तीव्रतम प्रतिक्रिया देत असतो. या समयी अपेक्षा या रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदरात कपातीच्या आहेत. या अपेक्षांचे काय होईल हे उद्या-परवापर्यंत स्पष्ट होईल. तोवर आशेच्या पंखांवरील मृगजळ काहींना हर्षांवत असेल तर त्याचे दु:ख का करावे?