मराठी भाषा दिन साजरा होता होता एरवी आपल्या भाषाभगिनींची आठवण कुणाला होण्याचे कारण नाही. परंतु हल्ली आपण कोणत्याही एका भाषेचे राहिलेलो नाही, हेच खरे. वृत्तपत्रे भाषेची बंधने सहसा पाळतात, पण समाजमाध्यमांमध्ये कोणत्याही भाषेतील नोंदी खपून जातात. बरे, नोंद मराठी आणि त्यासोबतची लघु-चित्रफीत अथवा ‘क्लिप’ भलत्याच भाषेतील, असेही समाजमाध्यमांत चालून जाते. हे ‘खपून जाणे’, ‘चालणे’ ही बदलत्या काळानुसार झालेली प्रक्रिया होय. आपल्या अनेक भाषाभगिनींपैकी एक जी कन्नड, त्या भाषेतील एक क्लिप नेमकी मराठी भाषा दिनी ‘व्हायरल’ झाली. इतकी की, वृत्तपत्रांनाही या कन्नड क्लिपमधील घडामोडीची दखल घ्यावी लागली. कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद तीनदा भूषविलेले आणि रा. स्व. संघाच्या संस्कारांत वाढलेले कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी केलेल्या विधानाची ती क्लिप होती. ‘आदल्या ४० वर्षांत जे झाले नाही, ते पंतप्रधान मोदी यांनी करून दाखविले. आता कर्नाटकात लोकसभेच्या २२ जागा भाजपला मिळू शकतात’ अशी वाक्ये येडियुरप्पा कन्नडमध्ये उच्चारत असल्याची ही चित्रफीत. त्यातील ‘नालवत्तु’ म्हणजे कन्नडमध्ये ४० आणि ‘इप्पतयेरडु’ म्हणजे २२.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा