‘‘माझ्या प्रिय देशवासीयांनो,
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सर्वप्रथम तुम्हाला शत शत नमन. आम्ही कुणाहीपुढे झुकणार नाही, हे आपण आज दाखवून दिले आहे. आमची ताकद राष्ट्रावरील आणि राष्ट्रधुरीणांवरील आमच्या विश्वासात आहे, हे सांगण्यासाठी कुणा परक्याची गरज नाही. आम्हाला कुणीच परके नाही. अमेरिकेच्या अध्यक्षांशी आमचे नेते वारंवार बोलणी करतात. या चर्चेत अमेरिकेसारख्या महासत्तेने आमच्यावर कितीही बंधने लादू पाहिली, तरी वीरांना बंधनांचे भय कुणी दाखवू नये हेच खरे! आम्ही अण्वस्त्रसज्ज आहोत. आमची अण्वस्त्रसज्जता आम्ही अमेरिकेला धूप घालून काय म्हणून सोडावी? सामर्थ्यवानांचे सामर्थ्य जगाने जाणले पाहिजे. आमचे प्रिय नेते आमचे सामर्थ्य जगाला दाखवून देण्यास सक्षम आहेत, किंबहुना म्हणून तर ते आमचे प्रिय नेते आहेत. ते शांतताप्रिय आहेत. पण ‘अरे’ ला ‘कारे’ करण्याची हिंमत आम्हाला आमच्या नेतृत्वाने दिली आहे. त्यामुळेच तर, आमचे शेजारी- जे आमची जगभर बदनामी करण्यातच धन्यता मानतात असे आमच्या जन्माचे दावेदार- आम्हाला वचकून असतात. अन्याय करणाऱ्याला जेथल्या तेथे धडा शिकवणाऱ्यांची जात आहे आमची. तरीदेखील बराच अन्याय सहन केला आहे आम्ही. कुणी वाळीत टाकले, कुणी व्यापारी संबंध तोडले, आम्ही गेल्या कित्येक वर्षांत स्वत:हून युद्ध केलेले नसूनही आमची युद्धखोर म्हणून संभावना झाली. आता बस्स झाले हे तथाकथित पुरोगाम्यांचे टोमणे. आम्ही त्यांनाही जशास तसे उत्तर दिले आहे. आमच्या नेत्यांना लोकशाही पसंत नाही म्हणता काय? ही घ्या- ही घ्या लोकशाही! लोकशाही वसंतोत्सव नव्हे, हा पाहा जाज्ज्वल्य लोकशाहीचा उत्फुल्ल खदिरांगार! किती? ९९.९९ टक्के! २०१४ सालीदेखील लोकशाहीचाच विजय झाला होता. तेव्हाही मतदानाची टक्केवारी ९९.९७ टक्के होती. तरीही टीकाकार सरसावतीलच. ते म्हणतील, ‘गेल्या वेळेपेक्षा फक्त ०.०२ टक्के सुधारणा?’ पण असल्या टीकेला आम्ही भीक घालत नसतो. मात्र टीकाकार आमच्या राष्ट्राला नावे ठेवत असतील तर आम्ही कदापि खपवून घेणार नाही. पण आज आम्ही विजय साजरा करणार आहोत. हा विजय आहे आमच्या लोकशाहीचा. अमेरिकेचेही न ऐकता आमच्या नेत्यांनी परवाच अण्वस्त्रसज्जता वाढविली. परंतु हा मतदानाआधी लोकांवर दडपण आणण्याचा डाव असल्याची शंका एकाही देशवासीयाने घेतली नाही, इतके आमच्या लोकशाहीचे यश. असे चिरस्थायी यशच ९९.९९ टक्क्यांत प्रतिबिंबित होऊ शकते. धन्यवाद देशवासीयांनो, धन्यवाद! मतदानाचे पवित्र राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल धन्यवाद. चला, आता उरलेल्या ०.०१ टक्के अपवित्र आणि अराष्ट्रीय लोकांना घरात घुसून मारू या! ’’
– ईमेलद्वारे परभाषीय मजकूर पोहोचला. त्या ईमेलमधील भाषा परकी, लिपीही परकी. परंतु त्यातील आकडे इंग्रजी असल्याने लक्षात आले की, ही तर कोरियन लिपी असणार. कोरियन भाषेतील मजकुराचे थेट मराठीत भाषांतर करणारे सॉफ्टवेअर येईल तेव्हा येवो. मानवी मन हे संगणकापेक्षा कार्यक्षम नाही का? मग त्या मनाचे खेळ म्हणून झालेला हा ‘दुजेविण अनुवादु’देखील ९९.९९ टक्के बिनचूकच असायला काय हरकत आहे?