प्रसंग एक – म्हणे, मातीचे संस्कार! अरे, मला शिकवता काय? कधी कोकणच्या मातीवर चालले तरी आहात का तुम्ही? अख्खे आयुष्य तर हवाई फोटोग्राफीत गेले, असे पुटपुटत त्यांनी अंगातला कोट काढून सोफ्यावर भिरकावला व थेट शयनकक्षात गेले. तिथेही ते थरथरतच होते. मी कोकणच्या विकासाचा डाटा तयार केला. तुम्ही तर वसुलीच्या वाटा शोधल्या. श्रद्धेय बाळासाहेबांना माझ्याविषयी खोटेनाटे सांगून कान भरवणारे तुम्हीच. अन् मलाच खोटे ठरवता? मी तुमच्यासारखा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो नाय. सामान्य माणूस आहे मी. कोकणच्या विकासात काटे पेरणारे तुम्ही आणि मला बाभळीची उपमा देता? काय गरज होती त्या महाविद्यालयाच्या रस्त्यासाठी मी फोन केला म्हणून सांगण्याची. कोकणी माणसात भ्रम पसरवणारे तुमचे प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाहीत. मलाही तुमची अंडीपिल्ली ठाऊक आहेत. पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितले थोडे सबुरीने घ्या, म्हणून गौप्यस्फोट टाळले. म्हणून काय मी शांत झालो असे समजायचे काही कारण नाही. पक्ष सोडावा लागल्याची जखम अजून ताजी आहे माझी. रक्ताचे पाणी करून कोकणात पक्ष वाढवला. आज फितूर झालेले सगळे मी गोळा केलेले लोक आहेत. त्यांचा खांदा माझ्याविरुद्ध वापरता? या साऱ्यांच्या वसुलीची चौकशी करा म्हटले तर त्यावर गप्प. म्हणतात, लोकांनी त्यांना निवडून दिले. म्हणून काय विकासाच्या वाटा अडवायचा हक्क त्यांना मिळाला काय? आणि तो पेढय़ाचा गुणधर्म तर मला अजिबात सांगू नका. गोड बोलून वार करण्यातला मी नाही. नसेल बांधला मी सिंधुदुर्ग पण किल्ला माझ्या मातीत वसला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा