आजोबा गेल्यावर दुसऱ्या पिढीच्या चौघांसह आजी एकटीच उरली, म्हणून आता पंचकोनी परिवार! आई, बाबा, ताई, भाऊ आणि आजी असे या परिवारातले सारेच व्यक्तिस्वातंत्र्यवाले. मध्यवर्ती ठिकाणच्या बंगल्याचं आता अपार्टमेंट झाल्यावरही मोठय़ाच घरात राहणारे. आजींना घरची चारही माणसं घरात दिसण्याचा योग अखेर करोनानं आणला. पाचही जणांना डायनिंग टेबल पुरत नाही असाही शोध याच आठवडय़ात लागला. पण दोनतीन दिवसांतच, जेवायला पुन्हा आई बाबा आणि आजी एवढेच बसू लागले. नातू- म्हणजे पंचकोनी परिवारातला ‘भाऊ’ आतूनच ओरडायचा ‘थांब गं.. मी घेईन हातानं..’ आणि त्याचं ते नेटफ्लिक्स का काय सुरू असायचं. काय पाहातो नेटफ्लिक्सवर? आजींनी विचारलं तर म्हणतो, ‘अख्खा सीझन एका दिवसात उडवतोय’! कसले सीझन? तर ते सिनेमेच म्हणे, पण अनेक भागांचे. आपल्या मालिका असतात तसे. ते पाहायला एवढे मोठ्ठाले हेडफोन लावावे लागतात? भाऊनं हेडफोन आजीच्या कानाला लावला.. आजी दचकल्याच. ही गोष्ट कालची. ताई सारखी मोबाइलवर चॅट करते, फेसबुकवर मतं मांडते, ट्विटर पाहाते, इन्स्टाग्रामवर फोटो टाकते.. ‘इतक्या दिवसांनी सगळे भेटतायत’ असं मध्येच व्हीडिओकॉलवर म्हणते.. भेटतायत म्हणजे, घराबाहेरचे हो!
पंचकोनी परिवारातले पडदे..
आई, बाबा, ताई, भाऊ आणि आजी असे या परिवारातले सारेच व्यक्तिस्वातंत्र्यवाले
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-03-2020 at 00:03 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chasma article abn 97