या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ही बातमी तुमच्या हातात पडेल, तोवर चीनमधील काही डॉक्टरांनी करोनाविरोधी लस आपणच तयार केल्याचा दावाही केलेला असेल. कुणी सांगावे? कदाचित जागतिक आरोग्य संघटनेनेही त्या चिनी लशीलाच मान्यताही दिलेली असेल. त्याआधी अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प हे जर्मनीमधील कुठल्याशा औषध-कंपनीला एक अब्ज डॉलरची ‘देणगी’ देऊन, ‘करोनाविरोधी लस शोधून अमेरिकेतील कंपन्यांनाच विका’ अशी अट घालू पाहात होते, तो बेत जर्मनीतील एका मंत्र्यांच्या सावधगिरीमुळे बारगळला. मग चीन सरसावला. पण लस शोधल्याचा दावा चीनने कितीही केला, तरी तो खरा नव्हेच, हे जागतिक आरोग्य संघटनेला कसे आणि कोण सांगणार?  ते काही नाही.. करोनाविरोधातील पहिली लस खरे तर भारतात तयार झाली, हे आज तरी सांगितलेच पाहिजे. तुम्हा-आम्हा सर्वाचाच ज्या व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठावर नितांत विश्वास आहे, त्याच्या भारतीय शाखेतील काही स्वयंसेवकांनी ही लस शोधून काढली. मात्र त्या विद्यापीठाची मूळ मालकी परकीय असल्यामुळे विद्यापीठमालकांनी ती आपल्या मर्जीतील काही पाश्चात्त्य प्रयोगशाळांकडे दिली, अशीही धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

ही लस अगदी साधी, सरळ, सोपी. तिच्या चाचण्या अमेरिकेत, ऑस्ट्रेलियात तसेच अन्य काही ठिकाणी झालेल्या आहेत. कमी खर्चाची लस असल्यामुळेच तेथील प्रयोगशाळांनी या लशीची माहिती लोकांपर्यंत पोहोचू दिलेली नसावी, असाही संशय आहे. या पाश्चात्त्य प्रयोगशाळा अनेकदा, अतिमहाकाय रकमा घेऊन बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांना संशोधन ‘विकतात’, हे आता गुपित राहिलेले नाही. करोनाविरोधी आणि मूळच्या भारतीय लशीचेही असेच होणार, अशी भीती आता भारतवासींमध्ये बळावते आहे.

साधेपणा आणि सरळपणा हे गुण कुणालाच आवडत नाहीत. स्वत:ला विद्वान समजणाऱ्यांना तर नाहीच नाही. त्यामुळेच करोनाविरोधातील या भारतीय लशीचे संशोधन जगापुढे येऊ शकले नसावे, अशी एक शक्यता आहे. मात्र ही शक्यता लक्षात येताच चित्रविचित्र समीकरणे मांडून या लशीबाबत एखादा जीवरसायनशास्त्रीय शोधनिबंध लिहिता येईल काय, याचीही चाचपणी युद्धपातळीवर सुरू झाली आहे.

लस शोधून काढण्यापासून ते शोधनिबंध तयार करण्यापर्यंतचे सारे काम ‘वर्क फ्रॉम होम’ या पद्धतीने होत असल्यामुळे तेही सध्या व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठाच्या आधारेच सुरू आहे. मात्र हा निबंध गोपनीय ठेवण्यासाठी ‘किम्भो’ हे व्हॉट्सअ‍ॅपसारखेच पूर्णत: भारतीय अ‍ॅप १ एप्रिल रोजी, भारतीय परंपरेनुसार सूर्योदयापासून या निवडक भारतीय तज्ज्ञांच्या हाती येईल.

भारतीय औषधनिर्मितीतील एका अग्रगण्य योगतज्ज्ञांनीच ‘किम्भो’ अ‍ॅप बनविले असल्यामुळे, गोपनीयता नक्कीच राहील तेथून हा निबंध जगभरच्या वैद्यकीय संशोधनपत्रिकांकडे जाईल आणि संध्याकाळपर्यंत हे संशोधन जाहीरदेखील होईल!

लशीचे हे शास्त्रीय संशोधन जाहीर होईल, तेव्हा अमेरिकेसह अनेक पाश्चात्त्य देश नुकते कुठे डोळे चोळत अंथरुणावरून उठले असतील. त्यांची ‘१ एप्रिल’ ही तारीखसुद्धा उशिराच उजाडेल आणि भारत त्यांच्यापुढेच असल्याचे पुन्हा एकवार सिद्ध होईल!