काम करायचे, तर घराबाहेर पडावे लागते. काम करायचे, तर इथून तिथे जावे लागते. असे फिरण्यासाठी खर्च येतो. म्हणजे काम करायचे तर खर्चही करावा लागतो. हे सारे अगदी कालपर्यंत खरे होते. ‘कोविड-१९’ ऊर्फ करोना विषाणूचा फेरा आला आणि साऱ्यांना घरात बसावे लागले, तेव्हा मात्र हे सारेच तर्क पार उद्ध्वस्त झाले. एका जागी बसूनही माणसे काम करू शकतात, हे सिद्ध होऊ लागले. पाठोपाठ लगेच, प्रदूषण कसे घटले आहे आणि पक्षी कसे किलबिलाट करीत आहेत किंवा आकाशही कसे निळेभोर दिसते आहे याची चर्चा होऊ लागली; पण मुख्य मुद्दा बाजूला ठेवून भलत्याच गोष्टींची चर्चा करायची, हे अलीकडल्या काळात फारच अंगवळणी पडल्यामुळे आर्थिक मुद्दे बाजूला पडले. आर्थिक मुद्दे चर्चेत आले, पण ते कुणाचे किती नुकसान होणार वगैरे रडगाण्यांच्या स्वरूपात. अशी रडगाणी खासगी कंपन्यांनी गायलेली असोत, छोटय़ा उद्योगधंद्यांनी आळवलेली असोत वा तमाम राज्य सरकारांनी एका सुरात म्हटलेली असोत.. ती काही सकारात्मक चर्चा ठरत नाही. यावर कुणी म्हणेल की, जगाचेच सारे नकारात्मक चालले आहे तर आपण काय सकारात्मक बोलणार; पण आपण टाळय़ा वाजवल्या, मेणबत्त्या लावल्या तेव्हाही जगाचे काही तरी नकारात्मक चाललेच होते की नाही? तेव्हा आपण सकारात्मक आर्थिक मुद्दय़ांचा शोध सुरूच ठेवायला हवा. शोधा म्हणजे सापडेल.
घरून काम.. हीच मोठी बचत!
‘कोविड-१९’ ऊर्फ करोना विषाणूचा फेरा आला आणि साऱ्यांना घरात बसावे लागले, तेव्हा मात्र हे सारेच तर्क पार उद्ध्वस्त झाले
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-04-2020 at 00:00 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chasma article on work from home abn