खूप दिवसांनंतर गाढ झोपेत असलेल्या साहेबांच्या स्वप्नात त्यांचाच पुतळा येतो. दिवसभर तसाही तुम्हाला वेळ मिळत नाही, तेव्हा तुमच्याशी संवाद साधण्याची हीच योग्यवेळ असे म्हणत तो एकेक प्रश्न विचारू लागतो. मग साहेबही दिलखुलासपणे त्याच्या प्रश्नांना उत्तरे देऊ लागतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुतळा – तुमची महत्त्वाकांक्षा अजून पूर्ण झाली नाही तरीही मला उभारण्याची घाई का केली?
साहेब- तुझी उभारणी करण्यासाठी मी कुणालाही सांगितले नाही. तसाही मी पुतळा संस्कृतीच्या विरोधात आहे. हा उपद्व्याप कुणी केला त्याचा शोध मी लवकरच घेणार आहे.
पुतळा – तुम्हाला सर्व ठाऊक असते पण तुम्ही कायम ठाऊक नाही असे दाखवत, सांगत राहता. तुमचा विरोध होता तर मग सुप्रियाताई मला बघायला लगबगीने कशा आल्या?
साहेब- तिचे राजकारण वेगळे, माझे वेगळे. तुझ्या उभारणीत माझा हात नाही हे पुन्हा सांगतो.
पुतळा – बरं ते जाऊ द्या. पण उभारणारा तुमचाच कार्यकर्ता आहे, तेव्हा एकदा मला बघायला या. तुम्ही पाहिल्याशिवाय मला पूर्णत्व येणार नाही.
साहेब – हे बघ. माझ्याजवळ सध्या अजिबात वेळ नाही. तीन पक्षाचे सरकार चालवताना, त्यात पुन्हा विरोधकांची छापेमारी सहन करता करताच वेळ जातो. वयपरत्वे विश्रांतीही घ्यावी लागते!
पुतळा – मला सांगा, तुमच्याच पक्षाच्या अनेकांनी त्याच पुण्यात मंदिरात बसवलेल्या मोदींच्या पुतळ्याला जोरदार विरोध केला, काहीजण तर नैवेद्य घेऊन आले होते. आता तेच माझे कौतुक करत आहेत. हे कसे?
साहेब – आम्ही पुरोगामी विचाराचे लोक. कार्यकर्त्यांचा विरोध मंदिराला होता पुतळ्याला नाही अशी माझी माहिती आहे. तरीही तू म्हणतोच तर मी एकदा त्यांची भूमिका तपासून घेतो.
पुतळा – ताईसोबत आलेले काही कार्यकर्ते माझ्यावर छत्री हवी असे म्हणत होते..
साहेब- (हसत) अरे, सातारला पाऊस होता म्हणून छत्री वापरली. जिथे ज्याची गरज आहे त्याचा वापर करत पुढे जाणे महत्त्वाचे
पुतळा – परवा पुण्यातले काही हौशी कवी आले होते. माझ्यासमोर उभे राहून मोठय़ाने कुसुमाग्रजांची पुतळ्यावरची कविता ऐकवत होते. यात तुम्ही कुठे असे खवचटपणे विचारत होते.
साहेब – पुणेकर फार उद्योगी आहेत. त्यांचे फार मनावर घेऊ नको. माझे म्हणशील तर आम्ही रयतेचा विचार करून राज्य चालवणारे लोक. शिवाजी महाराजांची परंपरा पुढे नेणारे.
पुतळा – बरं, एक सांगा तुमचा राजकीय वारसदार कोण? दादा की ताई? तुम्ही जे नाव घ्याल त्यांच्याकडे मला आशेने बघता येईल. मग स्थापना व अनावरणात अडचण येणार नाही.
साहेब- सध्यातरी सारी माझीच माणसे. त्यामुळे तू दोघांकडेही आशेने बघायला हरकत नाही. माझे राजकारण एवढय़ात संपणारे नाही.
पुतळा – तुम्ही किमान स्वत:च्या प्रतिरूपाशी तरी मनातले बोलाल असे वाटले होते.
साहेब – राजकारणात मी पुतळ्यावर सुद्धा विश्वास ठेवत नाही.
पुतळा – बरं, जाऊ द्या ते सारे. माझ्यात काही कमी आहे का ते तरी सांगा.
साहेब – हो. अजूनही तुला माझ्यासारखा विचार करता येत नाही.
हे ऐकताच पुतळा अंतर्धान पावतो. स्वप्न भंगते. जागे झाल्यावर सारे आठवून, स्वप्नातही आपण योग्य उत्तरे दिली या समाधानात साहेब आन्हिकासाठी उठतात.