आजमितीला जगातील सर्व देश इसिसचा केवळ निषेध करताना दिसतात. परंतु या नरभक्षकांना आवरण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. समर्थाची ही निष्क्रियता इसिसचे महत्त्व वाढवणारी आहे आणि अमेरिकेकडे तर या पापाचे पालकत्वच जाते. इसिसला आता रोखायचे असेल तर तिच्या विरोधात एकाच वेळी इराक आणि सीरिया अशा दोन्ही आघाडय़ांवर कारवाई हाती घेतल्याखेरीज पर्याय नाही..
ओसामा बिन लादेन याच्या हत्येनंतर अल कायदाचे भूत बाटलीबंद झाले असे वाटत असतानाच इसिसच्या रूपाने धर्माधिष्ठित दहशतवादाची नवी आवृत्ती समोर आली असून ती पहिलीपेक्षा किती कराल आहे ते अलीकडे अनेकदा समोर आले. यातील ताजे उदाहरण म्हणजे जॉर्डनच्या वैमानिकाची हत्या. सीरियाच्या हवाई क्षेत्रात हा वैमानिक चालवत असलेले एफ१६ हे विमान कोसळल्यामुळे तो इसिसच्या तावडीत सापडला. त्याची सुटका व्हावी म्हणून जॉर्डन आणि अनेक देशांचे प्रयत्न सुरू होते. अलीकडे जॉर्डनमध्ये आत्मघाती दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्या मागे एक महिला दहशतवादी होती आणि हा कट वेळीच लक्षात आल्याने ती पकडली गेली. तेव्हा या वैमानिकाच्या सुटकेच्या बदल्यात तिची सुटका करावी ही इसिसची मागणी होती. परंतु या संदर्भात बोलणी सुरू असतानाच इसिसच्या दहशतवाद्यांनी या वैमानिकाची भीषण पद्धतीने हत्या केली. त्याला ज्या पिंजऱ्यात डांबून ठेवण्यात आले होते, त्या पिंजऱ्याला या दहशतवाद्यांनी आग लावली. यामुळे तो आधी भाजला गेला आणि मग होरपळून मेला. हे ज्वालाग्राही पदार्थ अंगावर टाकून मारण्यापेक्षाही भयंकर. हे इसिसचे क्रौर्य अंगावर शहारा आणणारे आहे. या हत्येस प्रत्युत्तर म्हणून जॉर्डन सरकारने लगेच त्या दहशतवादी महिलेस ठार केले. त्याच्या आधीच काही दिवस इसिसच्या दहशतवाद्यांनी जपानी पत्रकार आणि त्याआधी स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांची गळा चिरून हत्या केली. त्याही आधी ब्रिटिश आणि अन्य काही कैदी त्यांनी अशाच पद्धतीने मारले. यावरून या इस्लामी दहशतवादाचा भयानक चेहरा वारंवार जगासमोर येताना दिसतो. त्याहीपेक्षा भयानक आणि काळजी वाटावी अशी बाब म्हणजे या इसिसला आवरण्याच्या प्रयत्नांचा अभाव. आजमितीला जगातील सर्व देश इसिसचा केवळ निषेध करताना दिसतात. परंतु या नरभक्षकांना आवरण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. एरवी ऊठसूट मानवी हक्कांच्या पायमल्ली आदी विषयांवर पोपटपंची करणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघटनेचीही या मुद्दय़ावर दातखीळ बसली असून ही समर्थाची निष्क्रियता अधिक काळजी वाढवणारी आहे.
याचे कारण इसिस ही संघटना या निष्क्रियतेचे अपत्य आहे. इराकचा पुरता बीमोड केल्यानंतर त्या देशातील परिस्थिती पाश्चात्त्य देशांनी, त्यातही विशेषत: अमेरिकेने, ज्या पद्धतीने हाताळली तीमधून इसिसचा हा राक्षस तयार झाला आहे, हे विसरता येणार नाही. इराक हा मूळचा शियापंथीय देश. परंतु सद्दाम हुसेन यांच्या काळात त्या देशाची प्रतिमा ही सुन्नीबहुल अशी झाली. सद्दाम हा सुन्नीपंथीय होता आणि हे शेजारील शियापंथीय अयातोल्ला रूहल्ला खोमेनी यांचा इराण आणि इराक यांतील संघर्षांचे एक कारण होते. सद्दामच्या उच्चाटनानंतर अमेरिकेने त्या देशात शियापंथीयांकडे सत्तासूत्रे राहावीत यासाठी सातत्याने प्रयत्न केले. अमेरिका इराकमधून काढता पाय घेत असताना पंतप्रधानपदी नूरी अल मलिकी यांची नेमणूक झाली ती यामुळे. हे मलिकी कडवे शियापंथीय. त्यांनी सर्वाना बरोबर घेऊन सहमतीने राज्य चालवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी सतत सुन्नींचा दुस्वास केला आणि कोणत्याही प्रकारे त्यांना सत्तेत वाटा मिळणार नाही, याची काळजी घेतली. सुन्नी नाराज व्हायला आणि सुडाची भाषा बोलायला लागले ते यामुळे. त्यांच्यानंतर पंतप्रधानपद सांभाळणारे हैदर अल अबादी यांच्या काळातही अद्याप काही वेगळे घडलेले नाही. हे अबादी तर शियापंथीयांमधल्या दवापंथीयांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे तर सुन्नींना त्यांचा आणखीनच राग. त्यामुळे त्यांच्या काळातही शियापंथीयांची मक्तेदारी कमी झालेली नाही. या सर्व काळात इराकी अल कायदा या संघटनेने आपला गाशा गुंडाळला आणि नव्या रूपात ती जन्माला आली. ती म्हणजे इसिस. ही सर्वार्थाने सुन्नी संघटना. इस्लामचा प्रेषित महंमद पगंबर यांचे खरे वारस नक्की कोण, हा शिया आणि सुन्नी यांच्यातील चिरंतन संघर्ष असून इसिस ही संघटनादेखील त्या संघर्षांचे प्रतिनिधित्व करते. शिया धर्मीयांच्या मुळावर उठलेल्या इसिसला सुन्नींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक सत्तांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असा पािठबा मिळत असून या अशा सत्तांत सौदी अरेबिया आदी देश नाहीत, असे छातीठोकपणे म्हणता येणार नाही. तेव्हा ही मदत आणि आपले नवे आíथक प्रारूप यांच्या आधारे इसिसने इराकमध्ये चांगलाच जम बसवला असून आपला स्वत:चा स्वतंत्र सार्वभौम देशच निर्माण केला आहे. इसिसच्या अमलाखालील सर्व प्रदेश हा इराकचा तेलसंपन्न भाग. त्यामुळे अनेक तेलविहिरींवर आज इसिसचे नियंत्रण आहे. इतकेच काय, पण ही संघटना आता इराक सरकारला तेल विकू लागली असून तीमधून मोठा निधी तिच्या पदरी जमा होतो. त्याचबरोबर स्थानिक रहिवाशांकडूनही तिला मोठा निधी प्राप्त होत असून या संघटनेच्या दहशतवाद्यांकडील शस्त्रास्त्रे पाहिल्यास तिच्या संपन्नतेचा अंदाज यावा. तेव्हा एका बाजूला ही संघटना आपले बस्तान बसवीत असताना अमेरिका, इराक या देशांच्या एका संयुक्त मूर्खपणामुळे तिला अधिकच बळ मिळाले. निवडणुकांच्या नंतर अमेरिका आपला पाय इराकमधून काढून घेत असताना इराकच्या तुरुंगात खितपत पडलेल्या अल कईदाच्या अनेक कार्यकर्त्यांना नव्या सरकारने सार्वत्रिक माफी देऊन सोडून दिले. त्यामुळे इसिसला हजारो नवे सदस्य आयतेच मिळाले. तेव्हा इसिस ही बघता बघता डोईजड झाली. तिच्या धोक्याकडे सुरुवातीला डोळेझाक केल्यामुळे सीरिया आणि इराक या दोन देशांतील मोक्याच्या भागांत तिचा जम बसून गेला आहे. त्यामुळे पंचाईत अशी की या संघटनेच्या विरोधात इराकमध्ये कारवाई सुरू झाल्यास तिचे कार्यकत्रे सीरियामध्ये आश्रय घेतात आणि सीरियाने हात उगारल्यास ते इराकमध्ये पळतात. याचा अर्थ इतकाच की इसिसला आता रोखायचे असेल तर तिच्या विरोधात एकाच वेळी दोन्ही आघाडय़ांवर कारवाई हाती घेतल्याखेरीज पर्याय नाही. त्यातही महत्त्वाची बाब ही की आता इसिसला रोखणे हे उद्दिष्ट ठेवण्याची वेळच निघून गेली आहे. आता लक्ष्य हवे ते म्हणजे या संघटनेला पूर्णपणे नेस्तनाबूत करणे.
त्याचसाठी अखेर अमेरिकेनेच जबाबदारी घेणे आवश्यक ठरणार आहे. किंबहुना ती घेण्यात आतापर्यंत त्या देशाकडून होत असलेली दिरंगाई ही इसिस या दैत्याचा आकार वाढण्यात झाली आहे. अमेरिका इराकमध्ये घुसली ती आपल्या तेल स्वार्थासाठी. ती त्या देशामधून बाहेर पडली ती स्वार्थपूर्ती झाल्यावर. परंतु त्यामधील प्रवासात हा इसिसचा दैत्य जन्माला आला असून आता अमेरिका काखा वर करून ही आपली जबाबदारी नाही असे म्हणूच शकत नाही. अमेरिकेने इतिहासात असे जेव्हा जेव्हा केले तेव्हा त्याची परिणती केवळ अशा दैत्यांची ताकद वाढण्यातच झाली. मुस्लीम ब्रदरहुड स्थापकाचा पन्नासच्या दशकात अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष आयसेनहॉवर यांनी थेट व्हाइट हाऊसमध्ये पाहुणचार केला होता. त्यानंतर तालिबानच्या प्रमुखास तर जॉर्ज बुश यांच्या खासगी घरी मुक्काम करण्याची संधी मिळाली होती. अल कायदाचेही तेच. या संघटनेचा संस्थापक ओसामा बिन लादेन हा एकेकाळी अमेरिकेचाच आश्रित होता, याकडे कशी डोळेझाक करणार? तेव्हा अमेरिकेस या पापाचे पालकत्व घ्यावेच लागेल. या पापाचे परिमार्जन करायचे असेल तर ते पाप समूळ नष्ट करणे हाच मार्ग आहे.