राहुल मोरे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सामान्यत: प्रेक्षकाला एखाद्या ‘कलाकृती’तली प्रतीकात्मकता जशी भिडते, तसाच त्यातला प्रचारसुद्धा लक्षात येतोच! तो कसा? आणि त्यानंतर काय करायचं? याची उत्तरं एका तरुण प्रेक्षकाच्या दृष्टिकोनातून..
भारतात सध्या दोन चित्रपट बघण्यासारखे आहेत. पहिला नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ आणि दुसरा विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’! दोन्ही चित्रपटांमध्ये आपल्याला प्रवास पाहायला मिळतो. ‘झुंड’मधला प्रवास आहे.. झोपडपट्टीतील वाया गेलेल्या, गुन्हेगार म्हणून ओळख असलेल्या तरुणांचा आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडूंपर्यंतचा! तर ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये आपल्याला ‘जेएनयू’सारख्या संस्थेत शिकणाऱ्या एका सुशिक्षित आणि प्रश्न पडणाऱ्या तरुणाचा- ‘कन्हय्या कुमार’चा- ‘नरेंद्र मोदी’ होण्यापर्यंतचा प्रवास बघायला मिळतो. चित्रपटात कन्हय्या कुमारचा नरेंद्र मोदी बनल्याक्षणीच त्याला संपूर्ण चित्रपटात पडलेल्या आणि न पडलेल्या असंख्य प्रश्नांची खोलवर उत्तरे मिळाल्याचं बघायला मिळतं. आणि मग त्याला प्रेक्षकांकडून ‘एक सच्चा देशभक्त’ असं प्रमाणपत्रही मिळतंच.
तीस वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये जे झालं ते सगळं अमानुष आहेच. हातात ताकद, सत्ता असूनदेखील पुढारी, नेते, राजकारणी काश्मिरी पंडितांच्या मदतीसाठी पुढे सरसावले नाहीत, ही वस्तुस्थिती सर्वज्ञात आहे. भारतीय न्यायव्यवस्था, पत्रकार, पोलीस यंत्रणा आणि खुद्द भारतीय जनतादेखील काश्मिरी पंडितांसाठी काहीच करू शकली नाही, हीदेखील िनदा व्हावी अशीच बाब आहे. कारण इथे प्रश्न येतो तो भारतीय सार्वभौमत्वाचा! त्याकाळी परिस्थिती बदलण्यासाठी ज्यांनी प्रयत्न न करून काणाडोळा केला, त्यांचा ३० वर्षांनी का असेना, जाहीरपणे धिक्कार होतोय हेदेखील मान्य करावेसे वाटते. कारण ते एक बोचरे सत्य आहे! पण या लेखाचा मुद्दा हा आहे की, या सगळ्यावर आत्ताच- ३० वर्षांनी अचानक कोण, का आणि कशासाठी भाष्य करतोय? यातही मेख अशी की, चित्रपट पाहून हे प्रश्न विचारले जाणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेण्यात आल्याचे ठळकपणे जाणवते. निर्मात्यांनी चित्रपटात अनेक मुद्दय़ांवर निश्चितच प्रश्न उपस्थित केलेत; पण त्या प्रश्नांची सोयीस्कर अशी उत्तरंही स्वत:च दिली आहेत! त्यामुळे उत्तम आभास निर्माण होतो चहुबाजूंनी विषय मांडल्याचा! याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे संपूर्ण चित्रपटात इस्लामी दहशतवाद्यांच्या विरोधात फक्त काश्मिरी पंडितच आवाज काढू पाहताहेत असं कुणालाही वाटू नये म्हणून इस्लामी दहशतवाद्यांचा धोका सबंध भारतालाच कसा आहे हे दर्शविण्यासाठी ‘भूतकाळातदेखील इस्लामधर्मीयांनी भारतातील इतर धर्मावर, त्यांच्या धर्मस्थानांवर कसे निर्घृण हल्ले करून ती उद्ध्वस्त करून टाकली..’ असं एक वाक्य चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये घुसडले आहे! मग इथे प्रश्न असा पडतो : एकाच वेळी आपण पंडित असल्याचा अभिमान बाळगणारा आणि त्याचवेळी एवढा पुळका येऊन इतरधर्मीयांबद्दल पोटतिडिकीने बोलणारा हा अभ्यासू ‘पंडित’ होता कुठे इतकी युगे? कारण या ‘अभ्यासू’ पंडिताला वरील उल्लेख करत असताना त्याच्याच जातबंधूंकडून (जे भारतात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पसरलेले आहेत.), कर्मठ पंडितांकडून इतर अपंडितांचा (बहुजनांचा) शतकानुशतके कसा छळ करण्यात आला त्याचा विसर कसा काय पडला, याचे आश्चर्य वाटते. ज्यांनी ही जातिव्यवस्था निर्माण केली, ती आजच्या टेक्नॉलॉजीच्या काळात तरी भारतातून पुरती पुसली गेली आहे का? उलट, ती पुन्हा डोकं वर काढू लागली आहे, हे ठसठशीतपणे अभ्यासाअंती दिसलं नाही का या ‘अभ्यासू’ला?
हे कबूल- की चित्रपट बनवताना काही तांत्रिक गोष्टींचा, चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या भावभावनांवर होणाऱ्या परिणामांचा विचार चित्रपटकारांकडून केला जातो. काही निकष आखले जातात. वास्तवात घडलेलं सगळंच्या सगळं जसंच्या तसं दाखवलंच गेलं पाहिजे हा हट्ट चित्रपटकार धरत नाहीत. ते अशा प्रसंगी त्यांच्या अभ्यासाचा कस लावून हवा तो परिणाम प्रतीकांमार्फत, कॅमेऱ्याचे कोन, पाश्र्वसंगीत यांसारख्या गोष्टींचा वापर करून साध्य करतात. म्हणून तर कलाकृतीच्या परिणामाबद्दल दोघांची दोन भिन्न मतं असू शकतात, किंवा शंभर जणांची शंभर मतंसुद्धा! पण हा चित्रपट ‘कलाकृती’च्या या पंथाऐवजी प्रस्थापित राजकारण्यांचा प्रचारकी पंथच मानणारा असावा अशी शंका येते. कारण या चित्रपटात तोच प्रचाराचा फॉम्र्युला वापरून असहाय करणारे, अंगावर येतील असे भडक प्रसंग उघडपणे दाखवले गेले आहेत. प्रेक्षकांच्या मनावर अपेक्षित असलेला ठरावीकच परिणाम कसा होईल याची खातरजमा करूनच ते प्रसंग दाखवले गेले आहेत. अर्थात चित्रपटात दाखवल्या गेलेल्या प्रसंगांपेक्षा भयंकर कृत्ये त्याकाळी वास्तवात घडली असतील, हेही मान्य करू. पण आपलं म्हणणं रेटता यावं यासाठी इतका अट्टहास का?
माझं म्हणणं नीट समजावं म्हणून इथे मी ‘सैराट’च्या शेवटच्या सीनचा आवर्जून उल्लेख करीन. आर्ची-परशाचा खून करून आर्चीचे नातेवाईक फरार होतात. त्याआधी हे नातेवाईक चहा कसा पितात वगैरे सारं दिसतं. पण पुढे आर्ची-परशाचे निपचित पडलेले देह आपल्याला दिसतात आणि त्यांना उठवण्यासाठी त्यांच्याजवळ गेलेल्या त्यांच्या मुलाचे पाय रक्तानं माखले आहेत हे दिसतं. एवढंच दाखवूनसुद्धा दिग्दर्शक त्याला हवा तो परिणाम साधतोच. थिएटरमध्ये भयाण शांतता पसरते! तो सीन बघितल्यावर थिएटरमधला प्रत्येक जातीचा संवेदनशील माणूस हळहळतोच. पण चित्रपट संपल्यावर तो तुमची जात, तुमचा धर्म जागवत नाही, तर तुमच्यातल्या ‘माणसा’ला जागे करतो. तुमच्यावर अन्याय झाला म्हणून आता तुम्ही सूड घेतला पाहिजे, हे ‘सैराट’सारखी कलाकृती कुठेही बिंबवत नाही. उलट, ‘या मुलाकडे पाहा. त्याचा काय दोष?’ एवढंच सांगते. तिथे ती ‘कलाकृती’ ठरते! याउलट, ‘द काश्मीर फाइल्स’ बघितल्यावर प्रत्येक इस्लामी हा दहशतवादीच वाटू लागेल आणि भारत देश फक्त हिंदूराष्ट्र आहे, हे ठसठशीतपणे प्रेक्षकांच्या मनावर बिंबवलं जातं!
आज देशातल्या युवकांना चांगल्या शिक्षणाची, रोजगाराची, आर्थिक शाश्वतीची गरज आहे. ती दुर्दैवाने ‘प्रस्थापितांना’ त्यांच्यातल्या असंख्य त्रुटींमुळे भागवता येत नाही. आणि म्हणून चित्रपटाचा पडदा स्वत:चं अपयश झाकण्यासाठी राजरोसपणे वापरला जातो. हे कितीही क्लेशदायी असलं तरी ‘झुंड’प्रमाणेच ‘काश्मीर फाइल्स’सुद्धा प्रत्येक भारतीयानं जरूर बघावा.. दोन्ही चित्रपट आठवणीत साठवून ठेवावेत. त्यामुळे प्रत्येकावर जो व्हायचा असेल तो परिणाम होईल. (किंबहुना, प्रस्थपितांना हवा असलेलाच परिणाम होईल!) तोसुद्धा होऊ दे. कारण हा परिणाम योग्य की अयोग्य, याचे उत्तर काळच देईल!
बाकी दोन्ही चित्रपटांत कलाकारांचा अभिनय, त्यांची मेहनत दिसून येते. प्रत्येक कलाकारानं (पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्याही!) जीव ओतून काम केलंय. एखादा चित्रपट प्रचारकी आहे म्हणून काही आकाश कोसळत नाही. भारत हा सर्वधर्मीयांचा देश होता, आहे आणि भविष्यातही राहील, हा विश्वास आहेच. आपण लोकशाही देशात राहतो. प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. ते कसं मांडायचं याचंसुद्धा स्वातंत्र्य आहे. याच लोकशाही वटवृक्षाच्या सावलीत बसून चित्रपट पाहिल्यानंतर आपला मेंदू आणि हृदय दोघं काय म्हणतात, हा प्रश्न एकदा तरी प्रत्येकानं स्वत:ला विचारावा, एवढीच अपेक्षा! कारण जसं चित्रपट बनवायला निर्मात्याला वेळ, पैसे कष्ट मोजावे लागतात, तसंच तो बघतानाही प्रेक्षक म्हणून आपण आपला वेळ, पैसा आणि बौद्धिक व मानसिक कष्ट मोजत असतोच.
rahulmoray72 @gmail. com