मे. पुं. रेगे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
(तत्कालीन कार्यकारी संपादक, ‘नवभारत’)
चर्चा दारूबंदीची असो की वाइन, बीअर आदींच्या विक्रीस वाढीव मुभा देण्याच्या निर्णयांनंतरची.. प्रत्येक वेळी ही चर्चा ठराविक मुद्दय़ांवर, ठराविक अभिनिवेशांतून आणि अनेकदा तर त्याच त्या लोकांकडून घडत असते. हे असेच का होते, याची चिकित्सा मराठीमध्ये १९६७ सालीच प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या ‘नवभारत’ या वैचारिक नियतकालिकाने ‘मद्य आणि मद्यनिवृत्ती’ विशेषांकात केली होती, ती मात्र कुणाला माहीत नसते. त्या चिकित्सेचे हे दोन पैलू.. पहिला उतारा त्या अंकाच्या संपादकीयातून, तत्कालीन कार्यकारी संपादक मे. पुं. रेगे यांनी केलेल्या मांडणीचा; तर दुसरा भाग प्राचीन भारतामध्ये मद्यनियमन कसे सुरू झाले, वेदकाळातील मद्यप्रतिष्ठेचे पुढे उपनिषदांमध्ये आणि पुढल्या काळात काय झाले, याची रूपरेषा मांडणारा..
इंग्लिशमध्ये ‘वाइन’ हा शब्द एका वस्तुप्रकारचा निर्देश करणारा शब्द आहे; पण त्याच्याभोवती एक रोमँटिक वलयही आहे. ‘वाइन अँड विमेन अँड साँग.’ बिअर हा शब्द भाकर, पाणी, विस्तव, निवारा, माणसांची संगत यांसारख्याच अतिशय साध्या, प्राथमिक, मानवी जीवनाच्या घडणीत खोल रुजलेल्या अशा एका वस्तूचा निर्देश करतो. मराठीतील ‘मद्य’ हा शब्द संस्कृतपासून उसना घेतलेला, वस्तूचा स्पष्ट निर्देश टाळणारा, अवघडलेला असा शब्द आहे. प्रा. ना. सी. फडके यांचे देखणे, खिलाडू, विलासी नायक हेच बहुधा हॉटेलात जाऊन उघडपणे ‘मद्य’ पिणारे पहिले महाराष्ट्रीय. मद्यासाठी व्यवहारात वापरण्यात येणारा शब्द म्हणजे ‘दारू.’ आणि दारू ही हीन, अशुद्ध, माणसाची अवनती करणारी वस्तू आहे.
तथापि गेल्या पन्नास वर्षांत- आणि विशेषत: गेल्या पंचवीस वर्षांत मध्यमवर्गापुरते पाहिले तर मद्यप्राशन अधिक मान्य झाले आहे यात शंका नाही. पाश्चात्य राहणीच्या संसर्गाने आणि पारंपरिक धार्मिक टॅबूंचा जनमनावरील पगडा कमी झाल्यामुळे हे स्थित्यंतर घडून आले आहे यात शंका नाही.
मद्यपानामुळे सामाजिक दुष्परिणाम घडून येतात हे जसे मद्यपानाला विरोध करण्याचे एक कारण होते, त्याप्रमाणे पारतंत्र्यामुळे स्वत्व गमावलेल्या हिंदूंनी जेत्यांकडून स्वीकारलेली एक भ्रष्ट प्रथा म्हणूनही मद्यपानाला विरोध करण्यात येत होता. पण या कारणासाठी ज्यांचा मद्यपानाला विरोध होता, त्यांच्यातील कडव्या मंडळीचा चहापानालाही विरोध होता, स्त्रीशिक्षणाला आणि विधवाविवाहालाही विरोध होता. राष्ट्रीय स्वाभिमान आणि आधुनिकीकरणाची अनिवार्यता यांच्या कात्रीत सर्वच विचारी व्यक्ती सापडल्या होत्या आणि वेगवेगळे मध्यममार्ग सुचवीत होत्या.
स्वातंत्र्यानंतर परिस्थिती पालटली. औद्योगीकरण झपाटय़ाने करण्याचे धोरण राष्ट्रीय सममताने स्वीकारले आणि याचा वाहक म्हणून एक नवीन मध्यमवर्ग उदयाला आला. आधुनिकीकरण म्हणजे पाश्चात्त्यीकरण हे समीकरण व्यवहारात तरी त्याने मान्य केले आहे.
परंपरा व्यवहाराला सुशोभित करण्यापुरती उपयुक्त असते, पण त्याच्या पलीकडे जाऊन ती प्रामाण्याचा दावा करू लागली तर अडगळ ठरते. या वृत्तीमुळे मद्यनिषेधासारखे पारंपरिक ‘टॅबू’ गळून पडले. शिवाय या दृष्टिकोनाशी सुसंगत असे एक नीतिशास्त्रही या वर्गाने स्वीकारले आहे. माणसाने चोखपणे, कार्यक्षमतेने सपाटून काम करावे आणि त्याचे फळ म्हणून जे उत्पादन होते त्याचा मनसोक्त उपभोग घ्यावा. कामातील ढिलाई, चुकारपणा ज्याप्रमाणे अनैतिक आहे, त्याप्रमाणे उपभोगात निष्कारण मानसिक अडथळे आणणे वेडगळपणाचे आहे. तुम्ही नीट काम करू शकला नाही किंवा उपभोग घेऊ शकला नाही, तर दोहोतूनही तुमची असमर्थता, तुमचा दुबळेपणाच प्रकट होतो.
पण ज्या समाजात हा वर्ग उदयाला आला आहे आणि ज्याचा तो घटक आहे तो समाज परंपरेने अतिशय सोवळा आहे. ‘शुचिता’ आणि त्याची छाया असलेला ‘भ्रष्टाचार’ या संकल्पनांनी त्याचा सर्व व्यवहार कुंठित झालेला होता. लैंगिक व्यवहाराभोवती जसे टॅबू असतात, जवळजवळ तितकेच प्रखर टॅबू या समाजात मद्यपानाभोवती होते आणि आहेत.
हिंदू समाजातील वरिष्ठ जातींचा व्यवहार शुचितेच्या संकल्पनेने संकुचित झाला आहे असे आपण म्हटले. पुरोहित वर्गावर- ब्राह्मण जातीवर- सोवळेपणाची बंधने असली तर ते समजू शकते. पण इतर वरिष्ठ जातींचे काय? क्षत्रियांचे आणि वैश्यांचे काय? पारंपरिक सोवळेपणाला दुबळेपणाची, निष्क्रियतेची एक बाजू आहे. अलीकडल्या इतिहासात हिंदू समाजाने जोमदार, संपन्न, आत्मविश्वासपूर्ण असे ऐहिक जीवन उभारलेच नाही. आम्ही मद्य प्यालो नाही; पण प्रशस्त नगरे उभारली नाहीत, आमच्या निसर्गाचे, वनस्पतींचे, पशुपक्ष्यांचे कोडकौतुक केले नाही, त्यांच्याशी जवळीक साधून आमच्या जीवनात त्यांना स्थान दिले नाही, देशाच्या सीमांचे रक्षण केले नाही, सागरापार गेलो नाही, देशात तीर्थयात्रा केल्या, पण प्रवास करून आमचा हा निसर्गसंपन्न देश पाहिलाही नाही. नागर जीवनात हरतऱ्हेच्या माणसांची संगत मिळण्याच्या ज्या संधी असतात त्यांचा लाभ घेतला नाही. ‘क्लब’, ‘गोष्ठी’ स्थापन केल्या नाहीत, प्रवाशांसाठी पथिकाश्रम उभारले नाहीत. सहजप्रेरणांवर आधारलेल्या व्यवहाराला उन्नत, प्रगल्भ, सुसंस्कृत स्वरूप देणाऱ्या प्रथा, संकेत, संस्था उभारल्या नाहीत. साहित्य निर्माण केले नाही. ही शुचिता नव्हती, वैराग्य नव्हते; ही असमर्थता होती.
पण नेहमी असे नव्हते. कालिदासाच्या काव्यात येथे बहरलेल्या बलिष्ठ, विजिगीषु, आत्म्निर्भर, जीवनाच्या सर्व अंगांना चैतन्यशीलतेने, गंभीर क्रीडामय वृत्तीने प्रतिसाद देणाऱ्या समाजजीवनाचा सुंदर आविष्कार आढळतो. आमच्या निसर्गाचा उत्सव त्याने साजरा केला आहे. प्रगल्भ, सुसंस्कृत, नागर जीवनातील अनेकविध आनंद त्याने व्यक्त केला आहे. आमच्या समाजाने कुठेतरी धसका घेतला. सोवळेपणाचे निमित्त करून त्याच्या कोशात स्वत:ला झाकून घेतले. निर्मितीचा आनंद आणि कष्ट यांच्याऐवजी चाकोरीतून, अलिप्ततेतून लाभणारी सुरक्षितता पत्करली.
मानवी जीवनात वैराग्याला, इंद्रियदमनाला महत्त्वाचे स्थान आहे. पण इंद्रियदमनाची उद्दिष्टे वेगवेगळी असू शकतात. जे सातत्याने दीर्घकाल प्रयत्न करूनच साधता येते, ते साधण्यासाठी आवश्यक असलेल्या मानसिक आणि शारीरिक शिस्तीचे इंद्रियदमन अधिष्ठान असते. उदा. सैनिकाला पराकोटीची शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमता कमवावी लागते. इंद्रियदमनाची सवय असल्याशिवाय हे शक्य होणार नाही. स्वत:चा स्वामी, प्रभू असावे, स्वत:हून इतर कशाच्या आधीन असू नये अशी स्वातंत्र्याची, स्वायत्ततेची प्रेरणा माणसाच्या ठिकाणी असते. ही स्वायत्तताही इंद्रियदमनावरच आधारता येते. ज्याची इंद्रिये सुखाला लालचावलेली आहेत, त्याला स्वाभिमानाने जगणे कठीण आहे. किंवा या ऐहिक जगापलीकडच्या आध्यात्मिक तत्त्वाची कल्पना माणसाला असेल, या तत्त्वाशी एकरूप होण्यात जीवनाचे सर्वोच्च सार्थक असते असे तो मानीत असेल, आणि ज्या जीवनमार्गाचा अवलंब करून हे श्रेय साधता येते, त्याचा ऐहिक विषयांशी स्वत:ला निगडित करणाऱ्या स्वाभाविक वासनांना त्यांच्यापासून निवृत्त करून त्यांना क्षीण करणे हा महत्त्वाचा घटक असेल. पारंपरिक आध्यात्मिक जीवनमार्गात या तिन्ही प्रेरणा संयुक्तपणे आढळतात. हे वैराग्य दुबळेपणातून उद्भवलेले नसते. त्याच्यामागे चैतन्याचा उत्कर्ष असतो. मानवी चैतन्याचा तो एका विशिष्ट दिशेने झालेला समृद्ध आविष्कार असतो.
पण सर्व स्वाभाविक प्रेरणांचा स्वीकार करून त्यांना प्रगल्भ, उन्नत स्वरूप देण्यासाठी त्यांच्यावर संस्कार करून, त्यांना मर्यादा घालून त्यांचा एका जीवनमार्गात सुंदर समतोल साधणारे ऐहिक जीवन- अॅरिस्टॉटिलियन संकल्पनेतले ‘चांगले जीवन’- हाही मानवी चैतन्याचा दुसऱ्या दिशेने झालेला तितकाच समृद्ध, तितकाच शिस्तबद्ध आविष्कार आहे.
गांधीजींचे जीवन हे पारंपरिक आध्यात्मिक जीवनाचे अलीकडच्या काळातील सर्वश्रेष्ठ उदाहरण होय. इंद्रियदमनामागच्या तिन्ही प्रेरणा या जीवनामागे होत्या. पण गांधीजींच्या इंद्रियदमनाला महत्त्वाचा सामाजिक संदर्भही होता. आपल्या देशबांधवांचे अमानुष दारिद्य्रा दूर करण्याची जबाबदारी ज्या भारतीय सुशिक्षित वर्गावर आहे त्यांनी हे नैतिक आव्हान पूर्णपणे स्वीकारण्याचे ठरविलेच, तर त्यांना ‘दरिद्रनारायणाशी’ एकरूप होण्याशिवाय गत्यंतर नाही अशी गांधीजींची शिकवण होती. ‘दरिद्रनारायणा’शी एकरूप होणे म्हणजे त्यांच्या आणि स्वत:च्या भौतिक राहणीतील अंतर शक्य तितके कमी करणे, शक्य तितक्या कमी गरजांना स्थान देणारी साधी राहणी पत्करणे. भारताच्या आजच्या परिस्थितीत ‘चोख काम आणि अनिर्बंध भोग’ या नैतिक सूत्राचा प्रथमार्ध स्वीकारणे जेवढे आवश्यक आहे, तितकेच त्याचा उत्तरार्ध नाकारणे आवश्यक असेल.
आज एक टॅबू म्हणून मद्यनिषेध टिकूच शकणार नाही. मद्यनिषेधाचा असा आग्रह कुणी धरला, तर तो हास्यास्पदच ठरेल. संयमाला मानवी जीवनात नेहमीच स्थान राहील; पण भारताच्या आजच्या परिस्थितीत संयमापलीकडे जाऊन उपभोगाला कठोर मर्यादा घालणारी जीवनवृत्ती सर्वानी पत्करणे नैतिकदृष्टय़ा अटळ आहे. पण या मर्यादा सर्वच भोगांना घातल्या जातील, केवळ मद्याला नव्हे. आणि या मर्यादांत ज्या उपभोगांना मोकळीक असेल त्यांच्यात जीवनाचा निरागस आनंद खुलविणाऱ्या मद्याला स्थान नाकारायचे काहीच नैतिक कारण नाही.