प्रदीप रावत pradiprawat55@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सुमारे साडेसात कोटी ते साडेचौदा कोटी वर्षांपूर्वीच्या जीवाश्मांमध्ये पंख दिसतात खरे, पण त्या पंखांमध्ये भरारीचे बळ नव्हते..
समजा एखाद्या सजीवाला पंख आहेत, पण त्याला उडता येत नाही! मग काय उपयोग त्या पंखांचा? पक्ष्यांचा उद्भव सरपटणाऱ्या प्राण्यांपासून झाला असा कयास जीवशास्त्रज्ञांनी केला होता. तो कयास शरीराची रचना आणि ठेवण पारखून बनविला होता. पण जमिनीवर वावरणारे भूचर प्राणी उडू कसे शकले? ही उडण्याची क्षमता त्यांच्यात कशी पैदा झाली? कशी विकसली? एखादा गुणात्मक बदल झाला तर तो कोणत्या तरी लाभाशिवाय सहसा तगत नाही. उत्क्रांतीमध्ये सहसा तगून राहणे आणि संख्येने थोडी बहुत फोफावणे घडते ते अनुकूल बदलाने होणाऱ्या लाभापोटी. याला अनुकूलन म्हणतात. ‘पंख नसणे’ ते ‘पंखवजा अवयव उपजणे’ हे स्थित्यंतर शक्य आहे. पण तो पंखसदृश अवयव उडायचे बळ देत नसेल तर? तर मग तो अवयव ‘गुणकारी लाभ’ नव्हे तर ‘नसते लोढणे’ ठरतो. अशा लोढण्याचे अस्तित्व उत्क्रांतीच्या अनुकूलन आणि तगण्याच्या तत्त्वाला छेद देतो. विविध टप्प्यांवरील असे ‘अर्धवट पंख’ हे लाभदायक नसून लोढणे आहेत असे वरपांगी भासत होते.
पण जरा नीट सबुरीने विचार केला तर ‘पंख नसणे’ ते ‘उडण्याची क्षमता असलेले पंख असणे’ यांच्या मधला टप्पा असण्याची कल्पना करता येते. उदाहरणार्थ उडण्याऐवजी काही काळ तरंगण्याची ऐपत असलेली अवस्था! उडणे निराळे आणि थोडासा काळ तरंगल्यागत उडी घेणे निराळे! काही शिशुधानी प्राण्यांमध्ये (म्हणजे गर्भात अर्भक धरण्याची रचना असलेल्या प्राण्यांमध्ये) अशी क्षमता आढळते. उदाहरणार्थ झेपावणारे सरडे, झेपावणाऱ्या खारी. शेंगा मिळवायला किंवा भक्षकांच्या तावडीतून निसटायला त्या एका झाडावरून दुसऱ्या झाडावर ‘उडतात’ ऊर्फ तरंगल्यागत झेपावतात! कशा? तर त्यांच्या अंगाच्या दोन्ही कडांना एक ताणून पसरण्याजोगती पातळसर त्वचा असते. त्याचा वापर करून त्या काही काळ छोटय़ा टप्प्यांत तरंगू शकतात. दक्षिणपूर्व (ईशान्य) आशियात एक उडता लेमूर ऊर्फ कॉलूगो नावाचा प्राणी आढळतो. तो याबाबतीत उडत्या खारीपेक्षा लक्षणीय आहे. कॉलुगोची झेप एकाने प्रत्यक्ष डोळय़ादेखत पाहिली. त्याचे वर्णन त्याने लिहून ठेवले आहे. तो म्हणतो, ‘‘तो एका झेपेच्या टप्प्यात ४५० फूट तरंगत गेला. ४५० फूट म्हणजे सहा टेनिस कोर्ट सलग एकापुढे एक ठेवल्यागत लांबी. आणि एवढी झेप घेताना त्याची झेपेदेरम्यानची उंची घसरली तीही फक्त ४० फुटांनी.’’ अशाच क्षमतेचा पुढचा नमुना किंवा अवतार आपल्याला पंख फडफडणाऱ्या वाघुळांमध्ये आढळतो. या दोन्हीवरून उडणारे पक्षी कसे उद्भवले असतील याचा अदमास करता येतो. पण त्या अदमासांचे िबब असणारे जीवाश्म मिळायला पाहिजेत.
बरीच वर्षे पुराजीवतज्ज्ञ पक्ष्याचे सांगाडे आणि काही डायनोसोअर यांच्यामधील साम्याचा वेध घेत राहिले. त्यांच्या असे ध्यानात आले की थेरोपोड प्रकाराचा डायनासोअर हा पक्षीजगताचा पूर्वज असणार. हा डायनासोअर दोन पायांवर वावरणारा, मांसाहारी आणि चपळ होता. सुमारे २० कोटी वर्षांपूर्वीच्या थरात या प्रकारचे मुबलक जीवाश्म सापडतात. आणि साधारण सात कोटी वर्षांपूर्वीच्या थरात आधुनिक पक्ष्यांसारखे असलेले जीवाश्म आढळतात. म्हणजे डायनासोअर ते पक्षी या स्थित्यंतराचे जीवाश्मी ठसे या दोन कालखंडांच्या थरांच्या मधोमध थरांमध्ये आढळतील असा त्याचा ठोकताळा होता.
१८६० साली जर्मनीमध्ये एका चुनखडीच्या खाणीमध्ये असा स्थित्यंतरी अवतार दाखविणारा जीवाश्म मिळाला. त्याला आर्किओप्टेरिक्स लिथोग्राफिका म्हणतात. आर्किओ म्हणजे प्राचीन, प्टेरिक म्हणजे पंख असणारा. लिथोग्राफिका म्हणजे पाषाणचित्र. चुनखडीच्या ठेवणीमुळे त्याचे बारीकसारीक नाजूक ठसेसुद्धा स्पष्ट उमटलेले होते. त्याचा काळ सुमारे साडेचौदा कोटी वर्षेपूर्व एवढा होता. त्यात पक्षीविशेष थोडे आणि डायनासोअरी लक्षणे चांगलीच वरचढ होती. उदा. दातांसहित जबडा, हाडे असलेले लांब शेपूट, नखे असलेले पंजे इ. इ. पक्षी वर्गी म्हणावे अशी दोनच लक्षणे होती- मोठी पिसे आणि मोठय़ा आकाराचा विलगलेला अंगठा! फांदी किंवा तत्सम जागांवर बसायला उपयोगी पडावा असा अंगठा. याची बरीच लक्षणे डायनासोअरशी मिळतीजुळती असल्याने नजरचुकीने त्याचे थिओडोर डायनासोअरमध्ये वर्गीकरण होऊन बसले होते.
त्यानंतर बऱ्याच काळाने म्हणजे १९९० साली पीसदार थेरोपॉड डायनासोअरचे संमेलन भरल्यागत जीवाश्म गवसले. सिनोर्निथोरस मिलेनी ऊर्फ चिनी सरडा या वर्गातले हे जीवाश्म आढळून आले. त्याचे संपूर्ण शरीर लांब तलम पिसांनी आच्छादले होते. त्यांच्या पिसांच्या ठेवणीवरून त्यांना उडता येत नसावे. आणखी दोन विशेष जीवाश्म सापडले. त्यापैकी एक आहे मेइलाँग. चिनी भाषेत मेइलाँग म्हणजे घोर निद्रेतला ड्रॅगन. पंखसदृश बाहूंमध्ये डोके दुमडून झोपलेला लहान पिसांचा डायनासोअर. तो बहुधा झोपेतच कालगत झाला असावा. दुसरा एक जीवाश्म आहे २२ अंडी उबवत बसलेल्या थेरॉपॉड मादीचा! असे अनेक जीवाश्म गवसले. स्थिर पाण्यातल्या गाळाच्या थरात आढळले तरच त्यांच्या पिसांचा ठसा मिळतो. तरुण खडकांचे थर धुंडाळू लागलो की आपल्याला लक्षणीय बदल दिसू लागतात. सरपटय़ांचे शेपूट आखूड होते. दात नाहीसे होतात, नखे एकत्र सांधलेली दिसतात. उडण्यासाठी आधार देणारे छातीचे हाड मोठे झालेले आढळते. उपलब्ध जीवाश्मांचा विचार केला तर उडण्यापूर्वी पिसे उत्क्रांत झाली. पिसे असलेले अनेक डायनासोअर होते. पण त्यांना उडता येण्याजोगी पिसे नव्हती. पिसांचे अनुकूलन कदाचित उडण्याऐवजी जलद गतीने चालणे हे असावे आणि जोडीदार मादीला आकर्षित करणे हेदेखील असावे. सरपटय़ांचे खवले ज्यामधून निर्माण झाले त्याच पेशींमधून पिसे उपजत गेली असाही एक कयास आहे. पण तो अजून तरी विवाद्य आहे. हे प्राणी अन्य सरपटय़ांप्रमाणे थंड रक्ताऐवजी गरम रक्ताचे असावेत. गरम नसले तरी शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी पिसांचा उपयोग होत असावा.
हे स्थित्यंतर कसे आणि का घडत गेले असेल? याबद्दल आपण तर्क करू शकतो. आरंभीच्या डायनासोअर्सना झडप घालण्यासाठी आणि सावज हाताळण्यासाठी जास्त लांबीचे पुढचे पाय (ऊर्फ हात!) उत्क्रांत झाले. झडप घालताना पुढचे पाय ताणणे आणि सावज आतल्या बाजूला ओढणे या दोन्ही क्रिया झपाटय़ाने कराव्या लागतात. उडणारे पक्षी पंखांना खालच्या बाजूला वल्हवितात. आतल्या बाजूला ओढणे आणि खालच्या बाजूला वल्हविणे या खरे पाहता एकाच प्रकारच्या क्रिया आहेत. फरक उद्दिष्टात आहे. पिसांचे वाढते किंवा बदलते आवरण हा उत्क्रांतीचा पुढचा टप्पा आहे. पिसांमुळे भोवतीचे वातावरण आणि शरीर यांची फारकत शाबूत ठेवणारे आवरण लाभते. या दोन अभिनव बदलांमुळे उडण्याची क्षमता उपजते. त्याचेही दोन संभाव्य मार्ग आहेत. एकाला म्हणतात ‘झाडावरून खाली’! थेरोपॉड दिवसांचा काही काळ झाडांवर व्यतीत करायचे याचा पुरावा आहे. पुढच्या पीसदार पायांमुळे त्यांना कोलुगासारखे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर तरंगत जाणे आणि जमिनीवर अलगद उतरणे, भक्षकांपासून सुटका मिळवणे, वरून अलगद उडी मारणे या खटपटी शक्य आणि सुलभ झाल्या.
दुसऱ्या प्रकाराला ‘जमिनीवरून वरती’ असे म्हणतात. सावज पकडायला पीसदार डायनासोअर दोन्ही भुजा पसरून उडय़ा मारत धावत असतील. त्यातूनच उडण्याची कुवत उत्क्रांत झाली असेल. याचे उदाहरण वर्तमान जीवसृष्टीत बघायला मिळते. चुकर नावाचे तितर पक्षी उडू शकत नाहीत. ते प्रामुख्याने चढावरती पळण्यासाठी पंखांची फडफड करतात. पंखांची उघडझाप करण्यामुळे पुढे जाण्याचा वेग बळावतो जमिनीविरुद्ध शरीर खेचण्याच्या शक्तीत वाढ होते. अगदी नवजात पिल्ले पंचेचाळीस अंशाच्या चढावर वेगाने चढू शकतात. केवळ धावणे आणि पंख फडफडविणे या बळावर जमिनीशी जवळपास काटकोन करणारा उभा चढ ते वेगाने चढतात. उभ्या चढावर सरपटत चढल्याने ते भक्षकांपासून सुटका करायला समर्थ होतात. लावा किंवा टर्की पक्षी संकटाची चाहूल लागली की दुडक्या चालीने पलायन करतात आणि वेग वाढवण्यापुरता पंखांचा वापर करतात.
अधलेमधले कित्येक दुवे हरवलेले असले तरी उपलब्ध जीवाश्मांच्या ठेवणीवरून आणि त्या स्थित्यंतराशी साधम्र्य असलेल्या वर्तमान जीवांच्या वागणुकीवरून काही भूचर सरपटय़ांनी आकाशात झेप कशी घेतली याचा उलगडा होतो.
लेखक माजी खासदार आणि ‘‘रावत’स नेचर अॅकॅडमीचे संस्थापक आहेत.