|| चिन्मय पाटणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे आणि परिसरातील मनोरंजन-सांस्कृतिक क्षेत्राचा आर्थिक दृष्टिकोनातून विचार केल्यास या क्षेत्राची उलाढाल एक हजार कोटींहून अधिक आहे. सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रात सर्वात जास्त उलाढाल स्वाभाविकपणे चित्रपटाची आहे.

पुण्यातील प्रेक्षकांची दाद मिळाली की झालं.. कला क्षेत्रातील प्रत्येकाची ही भावना असते. कारण पुणेकर प्रेक्षक चोखंदळ आहे. आवडतं त्याला भरभरून दाद दिली जाते. चित्रपट नाटक, गाण्यांचे कार्यक्रम, नृत्याचे कार्यक्रम, अभिवाचन, संगीत महोत्सव अशा सतत होणाऱ्या कार्यक्रमांची रेलचेल असल्यानंच सांस्कृतिक नगरी ही पुण्याची ओळख आहे. आपल्या आवडीची कलाकृती अनुभवण्यासाठी, आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षक आवर्जून खर्च करतात. म्हणूनच चित्रपटापासून संगीत महोत्सव आणि प्रायोगिक नाटकांपर्यंत प्रत्येक प्रकाराचं अर्थकारण आहे आणि त्यातूनच मनोरंजन क्षेत्राची अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. पुणे आणि परिसरातील मनोरंजन-सांस्कृतिक क्षेत्राचा आर्थिक दृष्टिकोनातून विचार केल्यास या क्षेत्राची उलाढाल एक हजार कोटींहून अधिक आहे. सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रात सर्वात जास्त उलाढाल स्वाभाविकपणे चित्रपटाची आहे. कारण चित्रपट निर्मितीची प्रक्रियाच खर्चिक आहे. चित्रपटाची निर्मितीपूर्व प्रक्रिया, चित्रीकरण, निर्मिती पश्चात आणि चित्रपट प्रदर्शित करणे या प्रत्येक टप्प्यावर खर्च करावा लागतो. पण संगीत महोत्सव, नाटय़ महोत्सव अशा विविध कार्यक्रमांतूनही अर्थकारणाला हातभार लागतो, त्यातून रोजगारनिर्मिती होते. म्हणून सांस्कृतिक नगरीतील उलाढालीचा आढावा घेणं आवश्यक ठरतं. 

चित्रीकरण

चित्रपट निर्मिती संस्था म्हणून प्रभात फिल्म कंपनीपासूनचा पुण्याला समृद्ध इतिहास आहे. प्रभातनं चित्रीकरणापासूनच्या अनेक सुसज्ज व्यवस्था निर्माण केल्या. प्रभातनंतर पुण्यात अनेक चित्रपट निर्मिती संस्था निर्माण झाल्या. एकेकाळी तर पुणे हे मराठी चित्रपटाच्या निर्मितीचं महत्त्वाचं केंद्र होतं. टीव्ही मालिका, चित्रपट, लघुपट, वेब मालिकांच्या प्रक्रियेत चित्रीकरण हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. कारण या प्रक्रियेत अनेक कलाकार, तंत्रज्ञांचा सहभाग असतो. म्हणूनच चित्रीकरण ही मोठी उलाढाल असते. संजय ठुबे गेली अनेक वर्षे चित्रपट क्षेत्रात कार्यकारी निर्माते म्हणून कार्यरत आहेत. चित्रीकरणाच्या माध्यमातून पुण्यात होणाऱ्या उलाढालीविषयी ते सांगतात, मराठी चित्रपटाचं पुणे हे महत्त्वाचं केंद्र आहे. अनेक चित्रपटांची चित्रीकरणं पुण्यात आणि पुण्याच्या आसपास सातत्यानं होत असतात. त्यातून किमान दोन-अडीच हजार लोकांना रोजगार मिळतो. तंत्रज्ञांना दररोज बाराशे रुपयांपासून पैसे मिळतात. वेब मालिका हे नवं माध्यम उपलब्ध होण्यापूर्वी टीव्ही मालिका, चित्रपट आणि लघुपटांचं चित्रीकरण होत आलं आहे. चित्रपट, टीव्ही मालिका, लघुपट, वेब मालिका अशा सर्व माध्यमांच्या चित्रीकरणातून होणारी उलाढाल शंभर कोटींहून अधिक आहे. चित्रीकरणासाठीच्या उलाढालीचा विचार केल्यास प्रकाशयोजना, वाहतूक, नेपथ्य, चित्रीकरण स्थळ, खाद्य व्यवस्था अशा सर्व तांत्रिक बाजूंवर खर्च होतो. मराठी, हिंदूी, दाक्षिणात्य चित्रपटांचं चित्रीकरण मोठय़ा प्रमाणात होतं. शिवकालीन, पेशवेकालीन, ब्रिटिश वास्तू, शिक्षण संस्था, निसर्ग आणि चित्रीकरणासाठीच्या उत्तम सुविधा असल्यानं पुण्याला चित्रीकरणासाठी प्राधान्य दिलं जातं.

ध्वनिमुद्रण स्टुडिओ

गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ ध्वनिमुद्रणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले मल्हार स्टुडिओचे संचालक महेश लिमये यांनी पुण्यातील ध्वनिमुद्रणाच्या स्टुडिओंबाबत माहिती दिली. पुण्यातील ध्वनिमुद्रण स्टुडिओजमध्ये चित्रपट, टीव्ही मालिका, अ‍ॅनिमेशनपट, लघुपट, पॉडकास्ट, श्राव्य पुस्तके अशा विविध माध्यमांसाठी ध्वनिमुद्रण, ध्वनि आरेखन, संगीत मुद्रण अशी विविध कामे केली जातात. लहान स्टुडिओपासून मोठय़ा स्टुडिओपर्यंत वेगवेगळे स्टुडिओज उपलब्ध आहेत. एका स्टुडिओसाठी सरासरी पाच लाख ते पाच कोटींपर्यंतची गुंतवणूक करावी लागते. उत्पन्नाचा विचार केल्यास एका तासाला चारशे रुपये ते दोन हजार रुपये या दराने स्टुडिओ भाडय़ाने दिला जातो. पुणे आणि परिसरात जवळपास चाळीस ते पन्नास स्टुडिओज आहेत. कामासाठीचे शुल्क स्टुडिओमध्ये काम करणारे तंत्रज्ञ, त्यांचा अनुभव आणि उपलब्ध होणारा निधी या नुसार ठरते. एका स्टुडिओमध्ये दर महिन्याला सरासरी पन्नास हजार ते पाच लाखांपर्यंतची उलाढाल होते. यात केवळ तांत्रिक कामांच्या शुल्काचा समावेश आहे. म्हणजे एखाद्या गाण्याचे ध्वनिमुद्रण असेल, तर संगीतकार, वादक, गीतकार यांच्या शुल्काचा त्यात समावेश नसतो. केवळ ध्वनिमुद्रण स्टुडिओच्या उलाढालीचा विचार केल्यास साधारणपणे पन्नास कोटींच्या आसपास उलाढाल होते. ध्वनिमुद्रण स्टुडिओतून पाचशे ते हजार लोकांना पूर्णवेळाचं काम आहे. दर महिना साधारणपणे एक हजार ते दोन लाखांपर्यंतचे उत्पन्न कलाकार, तंत्रज्ञांना मिळते. मनोरंजन क्षेत्राचा जसजसा विस्तार होत जाईल, नवनवीन माध्यमं येत राहतील, तसं ध्वनिमुद्रणाचं काम आणि पर्यायानं उलाढालही वाढत जाईल, असं महेश यांनी सांगितलं.

अ‍ॅनिमेशन, व्हीएफक्स आणि गेमिंग

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरने (एमसीसीआयए) २००७मध्ये कमोडोर आनंद खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली अ‍ॅनिमेशन, गेमिंग आणि व्हीएफक्ससाठीची स्वतंत्र समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून अ‍ॅनिमेशन आणि संबंधित कामांसाठी पूरक पर्यावरण निर्मिती निर्माण करण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यातून भारतातील काही कंपन्यांनी, काही परदेशी कंपन्यांनी पुण्यात कार्यालय सुरू केलं. आजघडीला साधारणपणे दीडशे कंपन्या अ‍ॅनिमेशन आणि व्हीएफएक्स क्षेत्रात काम करत आहेत. स्पायडरमॅन होमकिमग, स्पेस जॅम अशा हॉलिवूडपटांचं व्हीएफएक्सचं काम पुण्यात झालं, तर ‘बाहुबली’ या चित्रपटावर आधारित आगामी वेब मालिकेच्या व्हीएफक्सचं कामही पुण्यातच होत आहे. एमसीसीआयएच्या अ‍ॅनिमेशन, गेमिंग आणि व्हीएफएक्स समितीचे अध्यक्ष आणि अ‍ॅमेझॉन प्राइमच्या व्हीएफएक्स विभागाचे प्रमुख चेतन देशमुख सांगतात, अ‍ॅनिमेशन आणि व्हीएफएक्सची पुण्यात वेगळी इंडस्ट्री विकसित झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.  २००५ नंतर पुण्यात मोठय़ा प्रमाणात अ‍ॅनिमेशन आणि गेमिंगचं काम व्हायला सुरुवात झाली. गेल्या दहा वर्षांत तर अतिशय व्यवस्थिपणे हे क्षेत्र विकसित झाले आहे. देशाचा विचार केला, तर या क्षेत्रात स्पष्टपणे पुण्याची आघाडी आहे. पुणे हे शिक्षणाचं महत्त्वाचं केंद्र असल्यानं या क्षेत्रासाठी आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ पुण्यातील महाविद्यालयं, विद्यापीठांतून उपलब्ध होतं. सद्य:स्थितीत या क्षेत्रात वीस ते पंचवीस हजार लोकांना पूर्ण वेळाचं काम आहे. तर आणखी पंधरा टक्के लोक अर्धवेळाचं काम करतात. चित्रपट, जाहिराती, अ‍ॅनिमेशनपट, कॉर्पोरेट माहितीपट अशा विविध माध्यमांसाठीचं मोशन ग्राफिक्स, गेमिंग, चित्रपट, अ‍ॅनिमेशन, व्हीएफएक्स असं काम पुण्यात मोठय़ा प्रमाणात केलं जातं. अ‍ॅनिमेशन आणि व्हीएफएक्सची पुण्यातील उलाढाल तीनशे कोटींहून अधिक आहे. अ‍ॅनिमेशनमध्ये होणाऱ्या कामामध्ये संकल्पना ते निर्मितीचे काम साधारणपणे तीस टक्के, तर अ‍ॅनिमेशन करून देण्याच्या सेवेचे प्रमाण ७० टक्के आहे. देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुण्याचं जे महत्त्व आहे, तसंच मनोरंजन क्षेत्रातील अ‍ॅनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंगसंदर्भातही आहे. अ‍ॅनिमेशन आणि व्हीएफएक्सशिवाय गेमिंग हे स्वतंत्र क्षेत्र आहे. या क्षेत्रातही अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्प पुण्यातून झाले आहेत. अनेक मोठय़ा गेम्सच्या चाचण्या पुण्यात केल्या जातात. त्यामुळे अ‍ॅनिमेशन आणि व्हीएफएक्सच्या तुलनेत गेमिंगचा विचार केल्यास गेमिंग क्षेत्राची उलाढालही तीनशे कोटींच्या घरात आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्राचा एकूण विचार करता अ‍ॅनिमेशन, गेमिंग आणि व्हीएफएक्स क्षेत्राच्या उलाढालीचा वाटा मोठा आहे, असं चेतन यांनी सांगितलं. 

अ‍ॅनिमेशन, व्हीएफएक्स यांच्याबरोबरच चित्रपटाच्या निमित्योत्तर प्रक्रिया, म्हणजे डिजिटल इंटरमिजिएटर (डीआय), कलर करेक्शन अशा सुविधाही आता पुण्यात उपलब्ध झाल्या आहे. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत या कामांसाठी चित्रकर्त्यांना मुंबई गाठावी लागत होती. मात्र मुंबईमध्ये जाण्या-येण्यात जाणारा वेळ, त्यात होणारा खर्च, स्टुडिओचा खर्च या तुलनेत पुण्यात ही कामे करणे सोयीचे ठरते. मराठी चित्रपटांची निर्मिती वाढली असल्याने या प्रक्रिया पुण्यातील स्टुडिओमध्येच पूर्ण करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या सुविधा उपलब्ध करून देणारे स्टुडिओंही वाढले आहेत, त्याचीही उलाढाल स्वतंत्र आहे. 

चित्रपटगृह

चित्रपटांच्या प्रक्रियेत चित्रीकरणानंतर प्रदर्शन हा महत्त्वाचा टप्पा. सहा महिने, वर्षभर मेहनत केल्यानंतर साकारलेली कलाकृती प्रेक्षकांसमोर आणणं, प्रेक्षकांनी वडापाव, समोसा, कॉफी, चहा, थंड पेयाचा आस्वाद घेत तो चित्रपट मोठय़ा पडद्यावर पाहणं आणि चित्रपटाला दाद देणं.. या सगळय़ातही एक अर्थकारण असतं, त्यातही उलाढाल असते. कारण बहुपडदा चित्रपटगृह असो किंवा एकपडदा चित्रपटगृह असो, चित्रपटगृहात तिकिटखिडकीपासून स्वच्छतागृहापर्यंत मनुष्यबळ कार्यरत असतं. चित्रपटाच्या तिकिटांची खरेदी होत असते. पुण्यातील चित्रपटगृहांच्या उलाढालीविषयी सिटिप्राइड मल्टिप्लेक्सचे भागीदार पुष्कराज चाफळकर म्हणाले, पुणे आणि परिसरात मिळून जवळपास २५ बहुपडदा चित्रपटगृहं आहेत. तर १५ एकपडदा चित्रपटगृहं सुरू आहेत. बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये दोन ते पंधरा पडद्यांचा समावेश होतो. या चित्रपटगृहांद्वारे वर्षभरात साधारपणे पाचशे कोटींची उलाढाल होते. स्वाभाविकपणे हिंदूी चित्रपटाचा प्रेक्षक सर्वाधिक आहे. त्या खालोखाल इंग्रजी, मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांचा समावेश होतो. आता ओटीटी प्लॅटफॉम्र्सचा उदय झाला असला, तरी येत्या काळाच चित्रपटगृहांत जाऊन चित्रपट पाहण्यावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. उदाहरणच द्यायचं, तर २०१९मध्ये ओटीटी प्लॅटफॉम्र्स असूनही ते चित्रपटगृहांसाठी ते वर्ष सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्यांपैकी एक होतं. 

नाटक, महोत्सव, सांस्कृतिक उपक्रम..

नाटकाचा विचार केल्यास पुण्यात ज्या प्रमाणात नाटकं होतात, तेवढी देशात अन्यत्र कुठेच होत नाही. एकेकाळी पुण्यात संगीत नाटकांची, व्यावसायिक नाटकांची निर्मिती होत होती. काही मोजके अपवाद वगळता गेल्या काही वर्षांत पुण्यातील नव्या व्यावसायिक नाटकांची निर्मिती थांबली आहे. मात्र  प्रायोगिक, हौशी नाटकांची निर्मिती सातत्याने केली जाते. तरुणांच्या सळसळत्या उत्साहात या नाटकांचे प्रयोग होत असतात. त्याशिवाय सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा पुण्यात होणारा सर्वात मोठा आणि जगप्रसिद्ध संगीत महोत्सव. जवळपास पंचवीस हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा महोत्सव रंगतो. त्याशिवाय वसंतोत्सव, स्वरझंकार, तालचक्र असे संगीत महोत्सवही लोकप्रिय झाले आहेत. गणेशोत्सवादरम्यान होणारा पुणे फेस्टिव्हल हेही एक आकर्षण आहे. त्याशिवाय शास्त्रीय नृत्य, लावणी अशा नृत्यांचे कार्यक्रम, ऑर्केस्ट्रासारखे संगीत कार्यक्रम या सर्वातून प्रेक्षकांना आनंद मिळतानाच, त्यांचे मनोरंजन होतानाच आर्थिक उलाढालही मोठय़ा प्रमाणात होत असते. त्यामुळे सांस्कृतिक आणि मनोरंजनाची उलाढाल पाहिल्यास सांस्कृतिक नगरी ही बिरुदावली पुण्याला सार्थ का ठरते याचं उत्तर नक्कीच मिळतं.