|| प्रशांत गिरबने

भारताच्या एकूण अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यातीपैकी ६ ते ७ टक्के वाटा (७५० जिल्ह्यांपैकी) फक्त एका पुणे जिल्ह्याचा आहे. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यातीचा ३३ टक्के वाटा एकटय़ा पुण्याने उचलला आहे. या योगदानामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यातीत पुणे जिल्हा भारतात सर्वप्रथम आहे. ही बाब पुणे जिल्ह्यासाठी अभिमानाची आहे. पुण्याचे अभियांत्रिकी निर्यातीत वर्चस्व आहे.

Government initiatives like PMAY aim to address housing issues by offering financial aid for self-built homes or group housing.
IE THINC, आपली शहरे: ‘दिल्लीला कमी उंचीच्या, उच्च घनतेच्या घरांची गरज आहे’
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Forest Minister Ganesh Naik Navi Mumbai MIDC
नवी मुंबई एमआयडीसीतील सेवा रस्ता लगतचे भूखंड देणे घातक, वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान
India GDP growth rate
भारताचा जीडीपी विकासदर मंदावण्याचा अंदाज चिंताजनक, पण धक्कादायक नाही! असे का?
MIDC plot for old age home for artists thane news
‘एमआयडीसी’चा भूखंड कलावंतांच्या वृद्धाश्रमासाठी;उद्याोगमंत्र्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
recession in grains market recession still hangs over agricultural economy
क कमॉडिटीचा – कडधान्य मंदीच्या विळख्यात

राज्याची राजधानी नसूनही राज्यात आणि देशातील महत्त्वाच्या शहराचा दर्जा पुण्याने मिळवला आहे. एके काळी दिल्लीवर नियंत्रण ठेवण्याचे काम पुण्यातून होत होते. स्वातंत्र्योत्तर काळात पुण्याने वेगवेगळय़ा आघाडय़ांवर दमदार कामगिरी करत जगाच्या नकाशावर स्वत:चे स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण केले आहे. भौगोलिक क्षेत्रफळाचा विचार केल्यास पुणे आता मुंबईपेक्षाही मोठे शहर झाले आहे. मेट्रो शहराचा दर्जा मिळालेले पुणे आर्थिक आघाडीवरही महत्त्वाचे योगदान देत आहे. ‘लोकसत्ता’ पुणे आवृत्तीच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्याकडे आर्थिक आणि संपत्ती निर्मितीच्या दृष्टिकोनातून पाहून एक वेगळे चित्र मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आरोग्य, उत्पादन, शिक्षण, नवउद्यमी, माहिती तंत्रज्ञान, मनोरंजन, वाहन उद्योग, जैवतंत्रज्ञान अशा वेगवेगळय़ा क्षेत्राचा संपत्ती निर्मिती आणि आर्थिक बाजूने झालेला विकास, रोजगार निर्मिती, आर्थिक उलाढाल याचा आढावा या विशेष पुरवण्यांमध्ये घेतला आहे.

भारतात तयार होणाऱ्या वस्तूंसाठी व भारतीय सेवाक्षेत्रासाठी भारत हीच एक मोठी बाजारपेठ आहे. मात्र भारताबाहेरील बाजारपेठ म्हणजेच संभाव्य निर्यात बाजारपेठ ही आंतरदेशीय बाजारपेठेपेक्षाही मोठी आहे. यामुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढीसाठी निर्यातीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे भारतासह सर्व देशांच्या बाबतीत एक त्रिवार सत्य आहे. जर्मनी, जपान ,अमेरिका, ब्रिटन, इतकेच काय तर दक्षिण कोरिया, तैवान अशी अनेक उदाहरणे हेच अधोरेखित करतात. अलीकडे व्हिएतनाम आणि बांगलादेश या आकाराने छोटय़ा व अर्थकारणाने लहान शेजारी देशांनीही निर्यातीत उल्लेखनीय प्रगती केली आहे. निर्यातीच्या बळावर या देशांनी टप्प्याटप्प्याने दरडोई उत्पन्न वाढवीत भारताच्या दरडोई उत्पन्नाच्या पुढे मजल मारली आहे.

भारताच्या बाबतीतच बोलायचं झालं,तर १९९१ च्या आर्थिक सुधारणांमुळे, रेंगाळणाऱ्या निर्यातीला व समग्र अर्थव्यवस्थेला मोठी चालना दिली. १९९१ च्या अगोदर वास्तविक निर्यातवाढ ही सरासरी ४.५% होती. १९९१ नंतर ती वाढत ११ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. याचा प्रभाव आपल्याला जवळपास दुप्पट झालेल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात दिसून येतो. १९९१ पूर्वी सकल राष्ट्रीय उत्पन्नाची सरासरी वार्षिक वाढ ही ३.५% इतकीच असायची, मात्र १९९१ नंतर ती सरासरी ६ टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे.

चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या आठ-नऊ महिन्यातील निर्यातीचा दाखला देत, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री पीयूष गोयल यांनी मार्च २०२२ पर्यंत एकूण वार्षिक निर्यात ५० लक्ष कोटींची विक्रमी पातळी ओलांडेल असं आपल्या अनेक भाषणात नमूद केलं आहे. यात माल, उत्पादन क्षेत्राचा वाटा जवळपास ३० लक्ष कोटी, तर इतर साधारणत:  २० लक्ष कोटींची निर्यात ही सेवा क्षेत्राकडून अपेक्षित आहे. अर्थातच सेवा क्षेत्राच्या निर्यातीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा वाटा सर्वात मोठा आहे. यावर्षीची एकूण निर्यात ही मागच्या आर्थिक वर्षांतील निर्यातीपेक्षा  ३० टक्के जास्त असेल. करोनापूर्वीच्या आर्थिक वर्षांशी (२०१९-२०) तुलना केली तरी यावर्षीची एकूण निर्यात २३ टक्के जास्त असेल. हे सर्व आकडे स्पष्टपणे दर्शवतात,की २०१२ ते २०१९ पर्यंत स्थिरावलेली निर्यात, मागच्या दोन वर्षांत मोठी वाढ नोंदवीत आहे. या निर्यातवाढीने चालू वर्षांतील (आर्थिक वर्ष २०२१-२२) ९.२ टक्के सकल राष्ट्रीय उत्पन्नवाढीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे.   

महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा

भारताच्या निर्यातीत उद्योगप्रधान महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाटा आहे, हे फक्त ऐतिहासिक आकडेवारीच नव्हे, तर भारत सरकारने प्रसिद्ध केलेली चालू वर्षांतली आकडेवारीदेखील अधोरेखित करते.  देशाच्या निर्यातीत एकटय़ा महाराष्ट्राचं योगदान १८-२०% आहे आणि महाराष्ट्राच्या निर्यातीत एकटय़ा पुणे जिल्ह्याचं योगदान १४-१५ टक्के आहे. चालू आर्थिक वर्षांत एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात पुणे जिल्ह्यातून तब्बल ५३००० कोटींची निर्यात झाली आहे. निर्यातीच्या तक्तेवारीत अलीकडेच प्रसिद्ध झालेली यादी पाहिली तर जामनगर, सुरत ,मुंबई व मुंबई उपनगर यानंतर पुणे जिल्ह्याचा देशात पाचवा क्रमांक लागतो.  जामनगरमधून पेट्रोलियम उत्पादनांसाठी, तर सुरत व मुंबई उपनगरे येथून सर्वाधिक निर्यात ही हिरे- दागिन्यांची होते. त्यामुळे वस्तूउत्पादन क्षेत्रातील निर्यातीचा विचार करता अनुक्रमे पुणे व मुंबई हेच देशात अग्रगण्य. 

पुणे देशात सर्वात पुढे : अभियांत्रिकी निर्यात

पुण्यातील सर्वात मोठे वस्तूउत्पादन हे वाहनउद्योगांचे.  इथे टाटा, बजाज, मिहद्रा, फोर्स मोटर्स, कायनेटिक असे अनेक भारतीय वाहनउद्योजक आहेत. हे उद्योगसमूह फक्त भारतासाठीच नव्हे, तर निर्यातीसाठीसुद्धा वाहने बनवतात. यांसोबतच मर्सीडीज, फोक्सवॅगन व जॉन डियर असे अनेक विदेशी उद्योगसमूहसुद्धा फक्त भारतासाठीच नव्हे तर निर्यातीसाठीसुद्धा वाहने बनवतात. या सर्व मोठय़ा उद्योगांची पुरवठा साखळी असते. वाहनांचे वेगवेगळे सुटे भाग बनवून मोठय़ा उद्योगांना पुरवठा करणारे ५००० हून जास्त लहान-मोठे उद्योग पुण्यात (पुणे जिल्ह्यात) आहेत.  या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक निर्यात ही वाहनउद्योग क्षेत्राची हे साहजिकच.

पुणे जिल्ह्यातील १६०० पेक्षा         जास्त उद्योगांच्या निर्यातीच्या आकडेवारीचा अभ्यास करता असे निदर्शनास येते, की वाहनउद्योग क्षेत्राची निर्यात ही संपूर्ण वस्तूउत्पादन निर्यातीच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.  सरकारी दस्ताऐवजात, या निर्यातीला ‘अभियांत्रिकी’ क्षेत्रातील निर्यात असेही संबोधले जाते. वाहनउद्योगाशिवाय थरमॅक्स, प्राज, पारी असे  अनेक उद्योग अवजड यंत्रसामग्री व आधारभूत सांगडे बनवितात. ही सर्व निर्यातसुद्धा ‘अभियांत्रिकी’ क्षेत्रात मोडते. या वाहनउद्योगाशिवाय अभियांत्रिकी क्षेत्राची निर्यात संपूर्ण वस्तूउत्पादन निर्यातीच्या १५ टक्के आहे.  

एकंदरीत अभियांत्रिकी क्षेत्राचे पुण्याच्या एकूण वस्तूउत्पादन निर्यातीत ६५ टक्क्यांपेक्षा जास्त योगदान आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण ३० टक्के तर भारतात २७ टक्के इतके आहे. तुलनात्मकरीत्या पुण्यात अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यातीचे प्रमाण हे सरासरीपेक्षा दुपटीहूनही जास्त आहे.  

भारताच्या एकूण अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यातीपैकी ६ ते ७ टक्के वाटा (७५० जिल्ह्यांपैकी) फक्त एका पुणे जिल्ह्याचा आहे. महाराष्ट्रातील अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यातीचा ३३ टक्के वाटा एकटय़ा पुण्याने उचलला आहे. या योगदानामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यातीत पुणे जिल्हा भारतात सर्वप्रथम आहे. ही बाब पुणे जिल्ह्यासाठी अभिमानाची आहे. पुण्याचे अभियांत्रिकी निर्यातीचे वर्चस्व आहे.    

भारतासाठी निर्यातीचा प्रत्येक रुपाया महत्त्वाचा आहे, मग तो कुठल्याही वैध क्षेत्रातून असो. मात्र एक नोंद घेण्याचा मुद्दा म्हणजे वस्तूउत्पादन क्षेत्र व त्यातल्या त्यात अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यात ही इतर क्षेत्रांपेक्षा अधिक रोजगार निर्मिती करते. पुणे जिल्ह्यामध्ये रोजगारनिर्मितीला या निर्यातीचा मोठा फायदा झालाय. या निर्यातवाढीकढे विशेष लक्ष दिल्यास रोजगारनिर्मितीवाढीस मोठा हातभार लागेल.

पुण्याच्या यशाचे उघड गुपित

देशाचा एखादा भाग उद्योगनगरी व निर्यातकेंद्र बनण्यात संस्थात्मक कार्यक्षमतेचा मोठा वाटा असतो. जर्मनीसारख्या निर्यातप्रधान देशात ‘फ्राउनहॉफर’सारख्या संस्था हे काम करतात. पुण्यात हे काम एआरएआय,  ऑटोक्लस्टर, इलेक्ट्रॉनिक क्लस्टर व पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयसारख्या संस्था करतात. पुण्याच्या एकूण निर्यातीत अभियांत्रिकी क्षेत्राचा ७५ टक्क्यांपेक्षा जास्त वाटा असण्यात या संस्थांचेही मोलाचे योगदान आहे.

देशभरातील वाहनउद्योग पुणेस्थित ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ (एआरएआय) येथे वाहनाच्या व सुटय़ा भागांच्या विविध चाचण्या करून प्रमाणपत्र घेण्यासाठी इथे येतात.  यासोबतच, वाहनउद्योग क्षेत्रातील लघु-मध्यम उद्योगांसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार (पिंपरी चिंचवड मनपा) व एमसीसीआयए ने एकत्र येऊन उभारलेले ऑटोक्लस्टर आज दरवर्षी ३००-४०० उद्योगांना चाचण्या, प्रमाणपत्र व मूळ नमुना विकास (प्रोटोटाईप डेव्हलपमेंट) अशा सेवा पुरवीत आहे. मोठय़ा उद्योगांना परवडणारी, मात्र लघु-मध्यम उद्योगांना न परवडणारी यंत्रसामग्री येथे उपलब्ध असल्याने लघु-मध्यम उद्योग ही यंत्रसामग्री काही दिवसांसाठी किंवा काही तासांसाठी वाजवी दरात वापरू शकतात. याचा आंतरदेशीय विक्रीसोबतच निर्यातीलाही फायदा होतो. ऑटोक्लस्टरच्या यशाने प्रेरित होत, परत एकदा केंद्र  सरकार, राज्य  सरकार (एमआयडीसी) व एमसीसीआयए एकत्र आले आहेत. ऑटोक्लस्टर सारखेच आता एमसीसीआय भोसरी येथे ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’ उभारले जात आहे. इलेक्ट्रॉनिक उद्योगांसोबतच यामुळे ई-वाहन उद्योगाला मोठा आधार मिळेल.

निर्यात क्षेत्राला अधिकाधिक चालना मिळावी म्हणून एमसीसीआयएची ‘आंतरराष्ट्रीय उद्योग’ ही समिती बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहे. या समितीमार्फत निर्यातदारांना भेडसावणारे प्रश्न संबंधित अधिकारी व सरकार दरबारी मांडले जातात. ही समिती दरवर्षी निर्यात कशी, कुठे करावी याविषयी एक अभ्यासक्रम चालवते. यात सध्याचे  निर्यातदार निर्यात कशी वाढवावी यासाठी, तर सध्या निर्यात न करत असलेले उद्योजक निर्यातीचा श्रीगणेशा करण्यासाठी हा अभ्यासक्रम निवडतात. यात मोठे निर्यातदार त्यांच्या अनुभवाचे मार्गदर्शन करतात. वर्षभरात पुण्यात २०-२५ वेगवेगळय़ा देशांचे राजदूत,परराष्ट्र अधिकारी येतात. या सर्वाची ओळख व्हावी, लघु-मध्यम व मोठय़ा उद्योजकांशी चर्चा व्हावी म्हणून एमसीसीआयए विनामूल्य कार्यक्रम आयोजित करत असते.

पाऊले चालावी प्रगतीची वाट

हे प्रयत्न कसे वाढत राहतील यावर  एमसीसीआयएचा नेहमीच भर असेल, मात्र निर्यातीची, त्यातल्या त्यात अभियांत्रिकी निर्यातीची  आघाडी टिकवून ठेवत प्रगतिपथावरील पुढचे पल्ले गाठण्यासाठी, आणखी बरीच पावलं उचलली जाऊ शकतात. यात सर्वाचा सहभाग हवाय.

१. केंद्र व राज्य सरकार

कालपर्यंत रस्त्यावर एकही हिरवी वाहन क्रमांक पट्टी दिसायची नाही,मात्र आज तुरळक हिरव्या पट्टय़ा दिसत आहेत. उद्या, म्हणजे येत्या ४-५ वर्षांत वर्षांनुवर्षे वाढत्या हिरव्या वाहन क्रमांक पट्टया दिसतील, कारण ई-वाहनांचं युग अवतरणार यात तिळमात्र शंका नाही. इलेक्ट्रॉनिक बॅटरी, हायड्रोजन इंधन व जैव इंधन याचा जगभर , भारतभर प्रचार आणि प्रसार होतोय. यामुळे वाहनउद्योग व्यवसायात बरेच बदल घडत आहेत. या बदलांना तोंड देत नवीन युगात मजल दर मजल प्रगती करण्यासाठी लघु-मध्यम उद्योगांना बळ म्हणून ऑटोक्लस्टर सारख्या संस्थांना केंद्र व राज्य सरकारने विशेष साहाय्य द्यायला हवं जेणेकरून ही संस्था  किंवा अशा संस्थां नव युगासाठी आवश्यक अशा अद्ययावत यंत्रसामग्रीने सज्ज असतील. यामुळे, पुणे जिल्ह्यातील व आसपासचे शेकडो उद्योग हे निर्मितीची आणि निर्यातीची चक्रे संथ न होऊ देता सद्य:स्थितीपेक्षा अधिक वेगवान चालू ठेवतील. 

२. स्थानिक प्रशासन

आज मुंबई, ठाण्यापाठोपाठ पुण्याचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. भारतात ते सर्वाधिक दरडोई  उत्पन्न असणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. जिल्ह्यातला  उद्योगव्यवसाय हे त्याचे मुख्य कारण आहे. अधिक दरडोई उत्पन्न म्हणजेच अधिक कर व विकासात्मक कामे करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे अधिक निधी, याची जाणीव ठेवत मनपा उद्योगाभिमुख व्हायला हव्यात. कल्पना करा, दरमहा पुणे, पिंपरी चिंचवड अशा मनपाचे महापौर व आयुक्त गुंतवणूकदारांची बैठक बोलवीत आहेत व त्यांना भेडसावणारे प्रश्न जागच्या जागी सोडवत आहेत, जेणेकरून गुंतवणूक वाढ-उद्योगवाढ-निर्यातवाढ-रोजगार वाढ-कर संकलन वाढ-विकासनिधी वाढ हे चक्र गतिमान होईल. अमेरिका, जर्मनी, जपान, चीन या आर्थिक प्रगत देशांमध्ये हे काही नवीन नाही. तसेच काहीसे आपल्याकडेही व्हायला हवे. अशा उपक्रमांना एमसीसीआयए नेहमीच आधार देत आहे आणि देत राहील.           

३. उद्योजक

शासन, प्रशासन यांच्याकडील अपेक्षा रास्त आहेत, मात्र शेवटी उद्योजकांनी मोठी पावलं उचलायला हवीत. वाहनउद्योगांच्या व तंत्रज्ञानाच्या गरुडझेपेने आकारलेल्या नव युगासाठी सज्ज राहायला हवं. यासाठी फक्त उत्पादनच नव्हे तर उत्पादकता वाढीवर भर द्यायला हवा. निर्यातीत आपला हिस्सा वाढविण्यासाठी गुणवत्तेवर भर द्यायला हवा. निर्यातीच्या जागतिक मूल्य साखळीत आपला सहभाग वाढविण्यासाठी एमसीसीआयए, एआरएआय, ऑटोक्लस्टर , एमईसीएफ अशा पुण्यातील संस्थांशी संपर्क वाढवून त्यांच्या सुविधांचा व उपक्रमांचा फायदा घ्यायला हवा.  वाहनउद्योग क्षेत्रातील इंधनांचं नवयुग हे आधीच अवतरलंय. बॅटरी वर,हायड्रोजन इंधनावर व जैव इंधनावर चालणारी वाहनं हेच भविष्य आहे.  बॅटरीवर चालणारी हिरव्या पट्टीची ई-वाहने आज प्रत्येक शहरात दिसत आहेत. इंधनामध्ये जैविक इंधनाचे (उ.दा. इथेनॉल) चे प्रमाण वाढत आहे. भारत सरकारने हल्लीच हायड्रोजन इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन धोरणाची घोषणा केली आहे. असेच , किंबहुना अधिक गतीने नवयुगाचे , नव-इंधनाचे वारे परदेशी (निर्याती बाजारपेठेत) वाहत आहे. नवीन इंधनाच्या वाहनांमध्ये लागणारे सुटे भाग हे काही प्रमाणात वेगळे असतील, त्यामुळे मोठय़ा व लघु-मध्यम उद्योगांनी या नवयुगात आपले नेतृत्व टिकवत अधिक प्रगती करण्यासाठी या बदलांची जाणीव ठेवत, चांगलीच कंबर कसायला हवी.          

आज पुणे जिल्हा निर्यातीत देशभरात पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आहे. अभियांत्रिकी वस्तू निर्यातीततर पुणे जिल्हा संपूर्ण देशात अव्वल आहे. ही आघाडी टिकवून ठेवत प्रगतिपथावर घोडदौड कायम रहावी यासाठीच ही लक्षवेधी मांडणी व मागणी.

(लेखक मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरचे (एमसीसीआयए) महासंचालक आहेत.)

Story img Loader