– अतुल सुलाखे jayjagat24@gmail.com

‘तो त्या, तेजस्वी देह-रहित अतएव व्रणादि देह-देह दोषांपासून, आणि स्नाय्वादि देह-गुणांपासून, सर्वथा अलिप्त आणि पाप-वेध-मुक्त, अशा आत्मतत्त्वाला चारी बाजूंनी वेढून बसला. तो कवी म्हणजे क्रांतदर्शी वशी, व्यापक स्वतंत्र झाला. त्याने शाश्वत कालपर्यंत टिकणारे, सर्व अर्थ यथावत् साधले. – ईशावास्य-वृत्ति, विनोबा.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

वाचा सत्यत्वे सोवळी । येर कविता ओवळी ।।

– संत एकनाथ

गीताई, गीता प्रवचने यांचे निर्माते विनोबा रूढ अर्थाने साहित्यिक होते का? या प्रश्नाचे थेट उत्तर देणे अवघड आहे. कारण ते दोन्ही प्रकारचे आहे. यातील नकारामागची परंपरा विनोबांच्या दृष्टीने आता पाहू.

ती वेद आणि उपनिषदांपासून सुरू होते. वेदातील मंत्रद्रष्टय़ा ऋषींची आपल्याला केवळ नावेच माहीत आहेत. ईशोपनिषदात त्या परमपुरुषाचे वर्णन करताना ऋषीने‘‘कवी’ शब्द वापरला आहे. पुढे आणखी तीन विशेषणे सांगितली आहेत ‘मनीषी’, ‘परिभू’ आणि ‘स्वयंभू’. कवी म्हणजे सूक्ष्म दृष्टी असणारा. मनीषी म्हणजे ज्ञानी. परिभू म्हणजे सर्वाना आच्छादित करणारा किंवा सर्वव्यापी आणि स्वयंभू म्हणजे स्वयंसिद्ध. कुणाच्याही आधाराची गरज नसणारा. कवीचे विशेष सांगताना विनोबा ही तिन्ही विशेषणे वापरत. याशिवाय ते साहित्याची ‘सहित चालते ते’ अशी व्युत्पत्ती सांगत. आता कुणाच्या सोबत या प्रश्नाचे उत्तर आपल्या मनाशी दिले की साहित्याची व्याख्या समजते. आणि साहित्यकारांचीही.

विनोबांनी समकालीन साहित्यिकांशी नेहमीच संवाद साधला आणि साहित्यिकही त्यांचे विचार मोठय़ा श्रद्धेने ऐकून घेत. भूदान यज्ञावर, विनोबांच्यावर अनेकांनी कविता रचल्या. भूदान यज्ञावर एक नाटकही लिहिले गेले. विनोबांचे ‘साहित्य-विचार’ हे पुस्तक त्यांच्या शिक्षणविचाराइतकेच महत्त्वाचे आहे. तरीही साहित्य, साहित्यिक, कवी आदींविषयी त्यांची मते आपल्यासाठी थोडी चक्रावून टाकणारी पण परंपरेला साजेशी दिसतात.

याचा आरंभ वेद आणि उपनिषदांपासून होतो. त्या ऋषींची केवळ नावेच आपण जाणतो. त्यावरही मतभेद असतात. तथापि चार महावाक्ये ज्यांनी दिली ते ऋषी कोण असावेत? ‘मी ब्रह्म आहे’ अशी त्या ‘साहित्यिकांनी’ सुरुवात केली. नाते कुणाशी आणि रचना कुणासोबत चालते तर त्या ब्रह्मतत्त्वासोबत.

महाकवी व्यासांना तर विनोबांनी ‘कृष्ण’ म्हणूनच पाहिले. परंपराही त्यांना ‘कृष्ण द्वैपायन’ म्हणतेच. यानंतर गोरक्षनाथ, निवृत्तीनाथ अशी परंपरा येते. गोरक्षनाथांना ते ‘कमालीचा गुप्त पुरुष’ म्हणत. जिथे जाल तिथे गोरक्षाचे नाव ऐकायला मिळते. अगदी नेपाळपर्यंत. गोरखा हे एका समाजाचे नाव असावे हे पुरेसे सूचक आहे. गोरक्षनाथ असोत की निवृत्तिनाथ यांचे जीवनकार्य धर्मप्रेरकाचे होते. गांधीजी याच गटात येतात. शंकराचार्य, ज्ञानदेव, हे विनोबांच्या लेखी धर्मसंस्थापकच होते. परंपरेला त्यांनी दिशाही दिली आणि उजळाही. विनोबांच्या लेखी संत ज्ञानेश्वर म्हणजे ‘धर्मसंस्थापक’ व ‘प्रेषित’. नामदेवरायांच्या जीवनातही प्रेम आणि ज्ञानदीपाची पेटवणी महत्त्वाची होती म्हणून त्यांच्या रचना इतक्या भिडतात.

ज्यांच्या साहित्यकर्तृत्वावर कोणत्याही अंगाने शंका घेता येत नाही त्यांनी सत्यापेक्षा काव्य दुय्यम मानले. तुकोबा या परंपरेचा कळस. ईश्वरदर्शन त्यांना कवी म्हणवून घेण्यापेक्षा मोलाचे वाटत होते.  जनसामान्यांमध्ये मंडळींच्या साहित्याला सर्वोच्च स्थान आहे. त्यांच्या दृष्टीने ते संत वाङ्मय आहे. गीताईचा शोध घेताना ही परंपरा ठाऊक असायला हवी.

Story img Loader