– अतुल सुलाखे jayjagat24@gmail.com

मधमाश्यांच्या पोळय़ाची एक अनोखी रचना असते. मुख्य पोळय़ात छोटे छोटे कोशही असतात. म्हणजे पोळय़ाशी जोडल्यानंतर या छोटय़ा कोशांमुळे स्वतंत्र अस्तित्वही राहते. आणखी विशेष म्हणजे पोळे बांधणाऱ्या माश्यांना नांग्या नसतात. थोडक्यात हे अहिंसा, साहचर्य आणि समूहातील स्वातंत्र्याचे उदाहरण आहे. गीताईच्या प्रस्थान त्रयीला म्हणजे साम्ययोगाला हे उदाहरण नेमकेपणाने लागू होते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

विनोबांच्या गीतेविषयीच्या साहित्याची दुहेरी रचना दिसते. सर्वप्रथम ते सामान्य माणसांसाठी आहे आणि त्यानंतर अभ्यासकांसाठी आहे.

सामान्य माणसांनी गीतेशी संबंधित सर्व साहित्यकृती अभ्यासण्याची गरज नसते, परंतु अभ्यासूंना ती मुभा नाही. उदा. एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर नुसती गीता प्रवचने वाचली तरी चालेल तथापि साम्ययोगाचे अध्ययन आणि साधना करायची तर ‘स्थितप्रज्ञ दर्शन’ आणि ‘गीताई चिंतनिका विवरणासह’ यांना टाळून पुढे जाताच येत नाही. शिवाय आचरण हा मुख्य भाग आहेच.

विनोबांनी या मधुकोशांची उभारणी बालके, स्त्रिया, गुन्हेगार यांच्या उपस्थितीत केली. विनोबा त्यांना संत, महंत आणि सेवक म्हणत. ही साहित्यसेवा, तुरुंग, आश्रम आणि पदयात्रा अशी झाली. त्यामुळे त्यांना शरीर परिश्रम, अहिंसा आणि सहजता यांची जोड आपातत: मिळाली.

यातील मुख्य ग्रंथ गीताई. तिच्या पाठीशी विनोबांच्या आईची प्रेरणा होतीच तथापि अगदी तशीच अपेक्षा एका आश्रमवासीयानेही व्यक्त केली.

‘आम्हाला संस्कृत समजत नाही. आमच्यासाठी मराठी गीता असेल तर किती चांगले होईल.’

गीताईच्या निर्मितीमागे केवळ आईचीच नव्हे तर अशा असंख्य आणि अनाम जनांची प्रेरणा होती. ती अप्रत्यक्ष असली तरी बळकट होती. याशिवाय खुद्द विनोबांचा गीतेशी परिचय झाला तो ज्ञानेश्वरीच्या गद्य भाषांतरामुळे. म्हणजे सुलभ रूपामुळे गीताई रचताना विनोबांना हे सर्व भान होते. त्यामुळे ‘‘हें भाषांतर मीं विद्वानांसाठीं केलेंलें नाहीं. मी स्वत:हि विद्वान नाहीं. हल्लीं एकाग्रतेनें अभ्यास असा फार थोडा होतो. त्या मानानें मीं कांहीं अभ्यास केला आहे हें खरें पण हें भाषांतर विद्वत्तेच्या दृष्टीनें मीं लिहिलेंलें नाहीं. व विद्वानांपुढें तें ठेवण्याचा हेतु नाहीं. तें खेडय़ांतींल लोकांसाठीं मीं लिहिलें आहे. पण कोणत्या हि विद्वानाकडे मीं हें भाषांतर पाठविलें नाहीं. कोणाहि विद्वानाला तें दिलें नाहीं. सहजासहजीं कोणा विद्वानाच्या हातीं हें भाषांतर पडलें नाहीं असें नाहीं. मला असें दिसतें आहे कीं, कदाचित कांहीं विद्वानांना या भाषांतरानें आनंद वाटेल. कांहींचीं मला पत्रें हि आलीं आहेत. पण जेव्हां माझ्या कानावर असें येतें कीं, अमुक खेडय़ांतल्या माणसाला यापासून आधार मिळतो तेव्हां मला जें समाधान होतें त्याला उपमा नाहीं.’’ (सं. विनोबा जीवन दर्शन – शिवाजीराव भावे. लेखन जुन्या व्याकरणानुसार आणि मुळाबरहुकूम).

गीताईच्या मधुकोशांची उभारणी काहीशी अशी झाली. सत्यनिष्ठा आणि श्रद्धा  हे गुण असतील तर कुणीही त्यांचा आनंद घेता येईल. कारण ते जनसामान्यांसाठीच आहे.

Story img Loader