अतुल सुलाखे – jayjagat24 @gmail.com

जी इंद्रियें मन प्राण ह्यंचे व्यापार च़ालवी

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

समत्वें स्थिर राहूनि धृति सात्त्विक जाण ती

गीताई – १८-३३

सहावी शक्ती धृती म्हणजे धीर. गीते व्यतिरिक्त अन्य धर्मग्रंथांमधेही तिचा उल्लेख आढळतो. मनुस्मृतीमध्ये ‘दशांग धर्म’ सांगितला आहे. तिथे पहिला गुण धृति आणि दुसरा क्षमा आहे. गीतेमधे धृती आणि क्षमा अशीच जोडी येते. जैन धर्मातही दशांग धर्म आला आहे. जुन्या करारामधील ‘टेन कमांडमेंट्स’ हा त्या धर्माचा अभिन्न भाग आहे. कुराणामधे तर सात्त्विक भक्ताचे लक्षण सांगताना त्याच्या दहा गुणांचे वर्णन आले आहे. प्रत्येक ठिकाणी ‘धीर’ महत्त्वाचा आहे.

धृतीचे दोन अर्थ आहेत. धीर आणि उत्साह. गीतेने सात्त्विक कर्त्यांची लक्षणे सांगताना या गुणांचा उल्लेख केला आहे. उत्साह आणि धीर हे दोन्ही गुण आपोआप एकत्र वसत नाहीत. उदाहरणार्थ तरुणांमध्ये अफाट कर्मप्रेरणा असते पण धीर अत्यंत कमी असतो. हेच चित्र वृद्धांमध्ये उलट दिसते.

धृती नावाची शक्ती आहे याची आपल्याला जाणीव नाही. आपण उत्साहाच्या भरात चार कामे जास्त करतो आणि नंतर सैलावतो. असा अस्थिर उत्साह काय कामाचा? यासाठी धृतीची गरज असते. उत्साह कायम ठेवणारी शक्ती असाही धृतीचा अर्थ आहे. बुद्धीने बोध आणि धृतीने नियमन अशी मानवी जीवनाची वाटचाल असावी.

भारतीय परंपरा धृतीला एक इंद्रिय मानते. गीतेतही हा उल्लेख आला आहे. मन, प्राण, इंद्रिये यांच्या सर्व शक्ती धारण करणारी शक्ती म्हणजे धृती. बुद्धीही असेच महत्त्वाचे साधन आहे.

धृतीला बळकट बनवणे ही एक साधना आहे आणि ती फार कठीण नाही. अगदी छोटे आणि शुभ संकल्प निश्चित करायचे आणि ठरवलेल्या वेळेत ते पूर्ण करायचे. पुढे थोडे मोठे आणि कठीण संकल्प करायचे आणि ते फलद्रूप करायचे. यातून या शक्तीचा विकास होतो.

ज्यांच्याजवळ धृती नाही त्यांच्याजवळचे कितीही ज्ञान ठार निरुपयोगी असते. अशा व्यक्ती कोणताही पराक्रम करू शकत नाहीत. आपण सांगतो पण समाज आपले ऐकत नाही अशी एक तक्रार वारंवार ऐकू येते. हे होते कारण सांगणारा त्या दिशेने थोडेही आचरण करत नाही. केवळ बुद्धीच्या जोरावर आपण काहीतरी बोलतो. त्यानुसार एकतर आचरण नसते आणि बरेचदा तर उलटही असते. समाजावर अशा वाचाळतेचा परिणाम होत नाही. खरेतर बुद्धी आणि धृती अशा शक्तींचे शिक्षण अगदी लहानपणी मिळायला हवे. तथापि आपण धृतीला हद्दपार केले आहे आणि बुद्धीचे शिक्षण विपरीत पातळीवर सुरू आहे. परिणामी काय घडते? तेही पाहू.

Story img Loader