‘व्यक्तातल्या ज्ञानी सोबत्यापेक्षा अव्यक्तातला श्रद्धाळू सोबती श्रेष्ठ. धर्मराजाबरोबर कुत्रा गेला, पण अर्जुन पडला.’ – विचारपोथी.

गीता आणि गीताईची विनोबांनी जी सेवा केली तिच्या पाठीशी असणाऱ्या व्यक्ती आणि प्रेरणा साधारणपणे माहीत असतात. तथापि ही सेवा घडावी यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या असंख्य व्यक्ती (वस्तुत: गुप्त शक्ती) आपण जाणत नाही. परंतु विनोबांनी या सर्वाचे पुरेपूर स्मरण ठेवल्याचे दिसते. विचारपोथीतील वरील वचन त्याची साक्ष देते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

धर्मराजा म्हणजे सत्संग आणि श्वान म्हणजे निष्ठावान सेवक असा अर्थ घेतला तर विनोबा स्वत:ला दुसऱ्या गटात ठेवतात. याच विचारपोथीत विनोबांचे आणखी एक वचन आहे. ‘तत्त्वनिष्ठा आणि सत्संगी यात भेद उत्पन्न झालाच तर विनोबा सत्संगतीला झुकते माप देतात.’ गीता प्रवचनांमध्ये तर आणखी स्पष्ट उल्लेख आहे.

‘‘एका बाजूस पुण्यमय पण अहंकारी जीवन व दुसऱ्या बाजूस पापमय पण नम्र जीवन, यातून एक पसंत करा असे जर कोणी म्हणेल तर मी जरी तोंडाने बोलू शकलो नाही तरी अंत:करणात म्हणेन, ज्या पापाने परमेश्वराचे स्मरण मला राहील, ते पापच मला मिळू दे.’’

पुण्यमय जीवनामुळे परमेश्वराची विस्मृती होणार असेल तर ज्या पापमय जीवनाने तो आठवेल तेच जीवन घे, असे माझे मन म्हणेल. स्वावलंबी पुण्यवान होणे मला नको. परमेश्वरावलंबी पापी असणे हेच मला प्रिय आहे. परमात्म्याचे पावित्र्य माझ्या पापाला पुरून उरण्यासारखे आहे. आपण पापे टाळण्याचा प्रयत्न करावा. ती टाळता नाही आली तर हृदय रडेल, मन तडफडेल, मग परमेश्वराची आठवण होईल. तो कौतुक पाहत उभा आहे.

त्याला म्हणा, ‘‘मी पापी आहे व म्हणून तुझ्या दारी आलो आहे.’’ पुण्यवानाला ईश्वर-स्मरणाचा अधिकार आहे, कारण तो पुण्यवान आहे. पाप्याला ईश्वर-स्मरणाचा अधिकार आहे, कारण तो पापी आहे.

राजकीय जीवनात तर ‘‘मी बापूंच्या आज्ञेत राहतो’’ ही त्यांची भूमिका होती.

हे थोडे विस्ताराने सांगितले कारण विनोबांच्या गीता अध्ययनातील अशा सश्रद्ध लोकांचा सहभाग आपण जाणत नाही कारण तो अव्यक्त आहे. अगदी साधे उदाहरण घ्यायचे तर फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांनी विनोबांना दक्षिणा देत गीताईची प्रत विकत घेतली ते कोण होते? ते ना राजकीय कैदी होते, ना गीतेचे अभ्यासक. समोर काही तरी चांगले चालले आहे तर आपल्या परीने काही तरी करावे इतकी त्यांची साधी भावना असणार.

गीता प्रवचने ऐकायला मिळावीत यासाठी तुरुंगाचे नियम बदलायला लावणाऱ्या महिला कैदीही याच वर्गात येतील. आज नाहीशी होत असली तरी गीताई पदयात्रेमुळे गीताई आणि गीता प्रवचने विकत घेऊन त्या ज्ञानेश्वरी सोबत ठेवणारी पिढीही आहे.

विनोबांनी गीताई शिकवली ती लहान मुलामुलींना तेही गीताईचे अप्रत्यक्ष निर्माते होते. त्यातल्या काहींनी गीताईची प्रत लिहून घेतली. गीताईसाठी थोडे पैसे मोजावे लागत. ज्यांना शक्य नव्हते त्यांनी गीताई विकत घेण्यासाठी मेहनत केली. म्हणजे किमान एक दिवसाच्या मजुरीचे पैसे गीताईसाठी दिले. भूदान यात्रेत तर गीताई आणि तदनुषंगिक साहित्याचे असे किती अव्यक्त सोबती असतील याला पार नाही.

या सोबत्यांची विनोबांना जाणीव होती. त्यांच्याविषयी ते अपार आदराने बोलत.

Story img Loader