– अतुल सुलाखे jayjagat24 @gmail.com

‘साहित्य-शक्ती उभयान्वयी आणि अ-व्यय आहे. ती विज्ञान आणि आत्मज्ञान या दोन टोकांना जोडते आणि अव्यय, म्हणजे अखंड राहते’

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

– ‘साहित्य-विचार’मधून

‘ गीताईला माझी प्रस्तावना नाही.. वास्तविक भगवंताच्या वाणीला प्रस्तावनेची गरजच नाही.. खरे म्हणजे गीतेच्या पुस्तकावर माझे नाव दूषणरूपच आहे, परंतु ग्रंथावर माझे नाव नसणे या युगात चालणार नसल्याने मी नाइलाजाने ते मान्य केले’ – ‘गीताईची कथा’मधून

विनोबांना लोकव्यवहार पाळण्याची मुभा नसती तर त्यांनी गीताई कदाचितच छापली असती. आईच्या इच्छेसाठी गीताई लिहिली. आश्रमातील लोकांना शिकवली. एवढय़ावर काम झाले असते. लोक संपर्कात आले असते किंवा विनोबा लोकांच्या संपर्कात आले असते की गीताई प्रकाशित झाली असती. हाच निकष गीता प्रवचनांनाही लागू आहे. विनोबांची गीतेवर असंख्य प्रवचने झाली. ती सगळी संकलित झाली नाहीत. सुदैवाने धुळे जेलमधील वाक्-यज्ञ ग्रथित झाला. त्यासाठी साने गुरुजींना अक्षरश: ‘तपश्चर्या’ करावी लागली. पुढे वेल्लोर तुरुंगात सलग तीन महिने त्यांनी गीतेवर प्रवचने दिली. परंतु विनोबांच्या नंतर त्यांचे पुस्तक झाले.

गीता प्रवचनांमध्ये ‘स्थितप्रज्ञ-लक्षणां’ची उकल करताना, ‘‘प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात ती पोचविता आली तर किती आनंद होईल! पण आधी ती आपल्या हृदयात ठसतील तेव्हा बाहेर सहजच पोचतील,’’ असे त्यांनी म्हटले.

गीताई शब्दार्थ कोश निव्वळ अभ्यासकांसाठी आहे असे लक्षात आले म्हणून तो सुलभ रूपात ‘गीताई चिंतनिका’ या नावाने आला. तरीही त्यात म्हणावी तितकी सुलभता आली नाही. शेवटी ‘गीताई-चिंतनिका’ विवरणासह आली. ही चिंतनिका म्हणजे विनोबांनी भूदान यज्ञात आपल्या सहकाऱ्यांची घेतलेली गीतेची शिकवणी आहे. सुदैवाने ही मांडणी पुस्तकरूपात आली. ‘साम्ययोगा’साठी हे विवरण अत्यंत महत्त्वाचे आहे.

गीताईच्या सखोल अभ्यासासाठी असणाऱ्या गीता प्रवचने, स्थितप्रज्ञ दर्शन आणि गीताई चिंतनिका (विवरणासह) या ग्रंथांच्या निर्मितीची पर्यायाने ‘साम्ययोग दर्शना’ची कहाणी अशी आहे.

वस्तुत: ही ग्रंथत्रयी म्हणजे साम्ययोगाचा आत्मा आहे. तथापि त्यांचा प्रवास अनोखा दिसतो. असे घडले याचे मूळ विनोबांच्या ‘साहित्य’विषयक दृष्टीमध्ये आहे.

तपश्चर्या, स्वाध्याय, निरंतर कर्म ( यज्ञ ) आणि प्रवचन अशी विनोबांच्या साहित्याची पृष्ठभूमी आहे. त्यांचे या वैशिष्टय़ां-‘सहित’ समोर येतात. आपल्या श्रोत्यांनीही या पातळीवर यावे ही त्यांची अपेक्षा असे. त्यांना साहित्याचा ‘प्रचार’ हा शब्दही मान्य नव्हता. प्रचाराऐवजी ‘प्रकाशन’ व्हावे आणि तेही प्रथम अंतरंगात झाले पाहिजे ही त्यांची भूमिका होती. यामुळे नुसती पुस्तके वाचून विनोबा समजत नाहीत. त्यांचे साहित्य वाचताना ते अवघड वाटते कारण आपण तसे आचरण करण्याचा प्रयत्न करत नाही. साम्ययोग दर्शनामध्ये ग्रंथांपेक्षा विनोबांच्या कृतिशील जीवनाचे महत्त्व अधिक आहे. आत्मज्ञान आणि विज्ञान यांना जोडणारे हे दर्शन, भौतिक आणि आध्यात्मिक विकासाला समान महत्त्व देते. ही त्याची विशेषता आहे.

Story img Loader