अतुल सुलाखे jayjagat24 @gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आईचा मृत्यू झाला त्याच दिवशी विनोबांनी वेदांच्या अध्ययनाला आरंभ केला. वेदांना त्यांनी ‘वेद माउली’ असे संबोधले. त्यांच्या मनातील वेदांचे स्थान यावरून ध्यानी येते. या वेद माउलीचे सार त्यांनी ‘ऋग्वेद सार’ या नावाने काढले. अगोदर एक हजार ऋचा आणि नंतर फक्त ८३ ऋचा (वेदामृत) असे या सारांशाचे रूप आहे.
जवळपास ५० वर्षे त्यांचे वेदाध्ययन सुरू होते (१९१८- १९६८). यात सर्व वेदांचा समावेश असला तरी भर ऋग्वेदावर होता. गीतेचा अधिकाधिक अभ्यास करणे हा यामागचा प्रमुख हेतू. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना गीताई विवरणासह सांगितली ती १९६८ मध्ये. या चौरस अभ्यासामुळे गीताई चिंतनिका सखोल झाली आहे.
वेदातील जवळपास चार ते साडेचार हजार मंत्र त्यांना मुखोद्गत होते. ऋग्वेदात एकूण १०,५५२ मंत्र आहेत. त्याचा एक अष्टमांश म्हणजे १३१९ मंत्र त्यांनी सार म्हणून निवडले. आयुर्वेद आणि गणित या दोहोंच्या आधारे ही निवड करण्यात आली. पठणाला सोपे जावे हेदेखील उद्दिष्ट होतेच. पुढे आणखी लघुरूप म्हणून फक्त ८३ ऋचा निवडल्या.
या सारांशाचे विनोबांनी भाषांतर केले नाही. कारण वेद अक्षरप्रधान आहेत शब्दप्रधान नाहीत, अशी त्यांची भूमिका होती. वेदातील मंत्रांचे भिन्न भिन्न अर्थ होतात आणि ते आपापल्या ठिकाणी योग्य आहेत. वेदांचा अर्थ लावताना अभिमान सोडायला हवा. असे प्रतिपादन करून ‘नम्रतेशिवाय वेदार्थ कळत नाही’ अशी अचूक भूमिका त्यांनी घेतली. एरवीच्या त्यांच्या व्यापक भूमिकेस साजेसे असे हे प्रतिपादन आहे.
पुढे या दोन्ही सारांशांचा मराठी अनुवाद झाल्यामुळे विनोबांना अभिप्रेत असणाऱ्या वेदार्थाची कल्पना येते. ऋग्वेद सार (त्यातही आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर निवडलेले ८३ मंत्र) आणि गीताई यांचे पठण करा, हा त्यांचा अंतिम संदेश होता. ऋग्वेदातील ‘विश्वमानुष’ या शब्दाने त्यांना प्रभावित केले होते. भारताची ही खरी दौलत असून ती जगासाठी लुटवली पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते.
या ८३ मंत्रांचा आरंभ ‘हरि: ॐ’ आणि ‘तद् विष्णो: परमं पदं सदा पश्यन्ति सूर्य: दिविव चक्षुराततम्’ असा आहे. यातील हरी आणि ॐ हे दोन्ही शब्द वेदातील नाहीत. हरी म्हणजे भूतमात्री, हरी ही भावना आणि ॐ म्हणजे अनुकूल असणे. सर्व हरीमय आहे हे जाणवणे म्हणजे साम्य आणि ही साम्यावस्था प्राप्त व्हावी म्हणून सभोवतीच्या सृष्टीशी अनुकूल असणे म्हणजे ॐ.
विष्णूचे पाय म्हणजे ब्राह्मी स्थिती म्हणजेच गीतेतील ‘माझे परम धाम’ ही संकल्पना. तिचा अर्थ पुन्हा भूतमात्री हरी ही अवस्था गाठणे असा आहे. या पायावर तर साम्ययोग उभा आहे.
पवनारला गेल्यावर ‘परमधाम’ आणि ‘हरि’ हे दोन्ही शब्द दिसतात. एक त्या स्थानाचे नाव आहे तर दुसरा शब्द विनोबांच्या समाधीवर आहे. ‘गीताई राम हरि’. या सर्वाची जोडणी करण्याचे काम वेद माउलीने मोठय़ा खुबीने आणि अनाम राहून केले आहे