मातब्बरांच्या उपस्थितीत ‘लोकसत्ता’चा वर्धापन दिन रंगला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राष्ट्रीय नेत्याच्या विचारांचा केलेला जागर आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेला दिलखुलास संवाद असा सुवर्णक्षण ‘लोकसत्ता’च्या ७४व्या वर्धापनदिनी जुळून आला. नरिमन पॉइंट येथील एक्स्प्रेस टॉवरच्या प्रांगणात शुक्रवारी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ही तारांकित संध्या रंगली. 

लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेत ‘लोकसत्ता’ने देशासह जगातील घडामोडींचा पारदर्शी वृत्तान्त वाचकांपर्यंत पोहोचवला. वार्ताकनाच्या पलीकडे जाऊन कला, साहित्य, विज्ञान, क्रीडा आणि विविध विषयांवरील लेखांची विचार मालिका ‘लोकसत्ता’ने अविरत सुरू ठेवली. या अभिजात परंपरेला १४ जानेवारी २०२२ रोजी ७४ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असून त्यांची मुलाखत ही या कार्यक्रमाची विशेष ओळख. करोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्याच खासगी कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिल्याने श्रोतेगणही त्यांना ऐकण्यास उत्सुक होते.

 यंदा देशाचा अमृत महोत्सव आणि ‘लोकसत्ता’चे अमृतमहोत्सवी वर्षांतील हा अमृतयोग साधण्यासाठी ‘राष्ट्रीय नेत्यांचे स्वातंत्र्याविषयीच्या विचारांचे अभिवाचन उपस्थितांसामोर करण्यात आले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यव्यवस्थेच्या अनुषंगाने मांडलेल्या विचारांचे अभिवाचन या वेळी करण्यात आले. या वैचारिक जागराने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

 ‘अभिनव भारत’च्या सांगता समारंभात, ११ मे १९५२ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या भाषणाचे अभिवाचन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केले. सशस्त्र क्रांतिकारकांबद्दल समाजमनातील प्रतिमा कशा चुकीच्या आहेत, याचे  विवेचन सावरकरांनी आपल्या भाषणात केले होते, तर महात्मा गांधींच्या ‘लोकशाहीचे अधिष्ठान’ या लेखाचे अभिवाचन दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले. सावरकर, गांधी, आंबेडकर आणि नेहरू या चारही नेत्यांबद्दल कायम उलटसुलट चर्चा होत राहिली असली तरी या चौघांचा लोकशाही देशाबद्दलचा मूलभूत विचार एकच होता, असे सांगून चंद्रकांत कुलकर्णी यांनी या लेखांचे अभिवाचन केले. भाषण, वृत्तपत्र आणि सभास्वातंत्र्य अबाधित ठेवणे म्हणजे खरे स्वातंत्र्य म्हणता येईल, असे गांधीजींनी या लेखातून म्हटले आहे. तसेच अिहसा, हिंसा, प्रांतवाद, लष्करी हस्तक्षेप आणि त्यांच्या परिणामांचा उहापोह या लेखात करण्यात आला आहे.  हजारो जातींमध्ये विभागला गेलेला आपला समाज एक राष्ट्र कसा होईल, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचे अभिवाचन अविनाश नारकर यांनी केले. ५ नोव्हेंबर १९४८ रोजी घटना समितीवरील चर्चेला उत्तर देताना बाबासाहेबांनी हे भाषण केले होते. समता आणि बंधुत्वाची भावनाच नाकारणे हा राष्ट्रनिर्मितीतील मोठा अडथळा आहे. लोकांचे लोकांनी बनवलेले लोकांसाठीचे राष्ट्र निर्माण करण्यासाठी हे अडथळे दूर केले पाहिजेत, हे सांगतानाच इतर कोणत्याही देशापेक्षा आपल्या देशाच्या राजकारणात भक्ती किंवा विभूती पूजेचे स्तोम प्रचंड असल्याने त्याच्या परिणामी देशाचे अध:पतन वा हुकूमशाही राष्ट्रात परिवर्तन होऊ शकते हेही बाबासाहेबांनी परखडपणे मांडले होते.

ज्येष्ठ दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंनी १४ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री केलेल्या भाषणाचे अभिवाचन केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कुणाल रेगे यांनी लोकमान्य टिळकांच्या ‘सरकारी हमालखाने’ या अग्रलेखाचे अभिवाचन केले. चारही मान्यवर कलाकारांनी अभ्यासपूर्ण आणि विषयाची व्याप्ती लक्षात घेऊन या लेखांचे अभिवाचन केल्याने स्वातंत्र्य संग्रामाचा तो काळ श्रोत्यांच्या डोळय़ांपुढे मूर्तिमंत उभा राहिला. चैतन्य घेऊन आसमंतात पसरलेली लाली, समुद्राकडून येणारा वारा आणि त्यात मिसळलेल्या स्वातंत्र्याचा सूर यांमुळे संपूर्ण वातावरण भारावले होते.

 यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह गप्पांची मैफल रंगली. राज्यातील प्रश्न, केंद्र-राज्य संघर्ष, शिवसेनेची बदलती भूमिका असे महत्त्वाचे प्रश्न अधोरेखित करत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ही मुलाखत घेतली. दिलखुलास रंगलेल्या या संवादानंतर ‘लोकसत्ता वर्षवेध’चे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

या वर्धापन सोहळय़ाला राजकीय मतभेद बाजूला सारून विविध पक्षांतील नेते एकत्र आले होते. नाना क्षेत्रातील मान्यवर, चित्रपट, नाटय़ क्षेत्रातील कलाकार एकत्र आल्याने भेटीगाठी, गप्पागोष्टी यांना उधाण आले होते. गेली दोन वर्षे सर्वत्र सुरू असलेल्या ऑनलाइन कार्यक्रमांनंतर प्रत्यक्ष भेटीचा आनंद उपस्थितांनी घेतला. शासकीय नियमांचे पालन करून हा सोहळा रंगला. प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, शिक्षण, आरोग्य, उद्योग क्षेत्रांतील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. ‘लोकसत्ता’चे योगदान, पत्रकरितेतील महत्त्व यावर लक्ष वेधून अनेकांनी कौतुकाचे उद्गार काढले.