|| योगेश बाबर

Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
500 kg of banned plastic bags seized
कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त
A major fire broke out at a plastic factory in Bhosari
पिंपरी : भोसरी एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनीला भीषण आग
New Car Launch Tata launches Tiago and Tigor in 2025
५ लाखांत टाटाने लाँच केली नवी कार! अपडेटेड Tiago आणि Tigor चे फीचर्स एकदा बघाच; थेट Marutiला देत आहे टक्कर
plastic banned
खबरदार प्लास्टिकचा वापर कराल तर… कर्जत नगरपंचायतची धाडसी कारवाई…
Ballarpur paper industry in crisis 347 out of 900 paper mills closed
बल्लारपूर पेपर उद्योग संकटात, ९०० पैकी ३४७ पेपर मिल बंद
Action against use of banned plastic and plastic bags
प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई, एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांचे सुतोवाच

पेन, टूथब्रशसारख्या दैनंदिन वापराच्या किंवा गरजेच्या वस्तूंबरोबरच प्लास्टिकचा वापर औद्योगिक, वाहन उद्योग, कृषी आणि वैद्यकीय क्षेत्रातही वाढला आहे. या उद्योगांना पूरक प्लास्टिकचे सुटे भाग, तसेच जोडणी केलेल्या उपकरणांच्या निर्मितीमध्ये शहरातील प्लास्टिक उद्योगाचे भरीव योगदान आहे. गेल्या चाळीस वर्षांत प्लास्टिक उद्योगाने गरूडझेप घेत शहर विकासात मोठा हातभार लावला आहे. प्लास्टिक उद्योगातील पुण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख.

औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात चाळीस वर्षांपूर्वी टाटा मोटर्स, मिहद्रा अ‍ॅण्ड मिहद्रा अशा कंपन्या आल्या. वाहन उद्योगाबरोबरच अन्य उद्योगही पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्थिरावल्यानंतर प्लास्टिक उद्योगाला चालना मिळाली. विशेषत: प्रारंभी वाहन उद्योगांसाठी लागणारे प्लास्टिकचे सुट्टे भाग बनविण्यासाठी लहान-लहान कारखाने या परिसरात उभे राहिले. मात्र वाहन उद्योगाबरोबरच अन्य उद्योगही परिसरात आल्यानंतर केवळ सुट्टे भाग पुरविणारा या उद्योगाने आता उत्पादन जोडणी उद्योगापर्यंत झेप घेतली आहे. लहान-मध्यम-मोठे असे पाच हजार कारखाने या परिसरात असून पंधरा हजाराहून अधिक अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने होत असलेली उत्पादन निर्मिती हे येथील प्लास्टिक उद्योगाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले आहे. प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग, ब्लो मोल्डिंग, कच्चा माल पुरविणारे उद्योगाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्मिती करत शहर विकासालाही उद्योगाने हातभार लावला आहे. या उद्योगातून वार्षिक किमान दहा हजार कोटींहून अधिक उलाढाल होत असून एक लाखाहून अधिक कामगार येथे सध्या कार्यरत आहेत.

वाहन उद्योगाची प्लास्टिकच्या सुट्टय़ा भागांची गरज ओळखून प्लास्टिकचे सुट्टे भाग निर्मितीचा व्यवसाय प्रारंभी सुरू झाला. हा व्यवसाय तेवढय़ावरच न थांबता आता सुट्टय़ा भागांची जोडणी करून औद्योगिक, वाहन, कृषी, वैद्यकीय, संरक्षण क्षेत्राला हवे ते भाग तयार करण्यापर्यंतच्या व्यवसायांनी आता उभारी घेतली आहे. पिंपरी-चिंचवड, चाकण पट्टय़ात औद्योगिक कंपन्या, वाहन उद्योग, रांजणगांव आणि तळेगांवमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यां, पिरंगुट परिसरात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), भारत इलेक्ट्रॉनिक्स, रेल्वे अशा शासकीय कंपन्या आहेत. याशिवाय वाहनक्षेत्राशी संबंधित नामांकित कंपन्यांकडून वाहनांचे उत्पादनही या भागात आजमितीस होत आहे. त्यामुळे या सर्वाना आवश्यक असलेले भाग प्लास्टिक उद्योगाकडून पुरविले जात आहेत. त्यामुळे दरवर्षी या क्षेत्राच्या उत्पादनात पंधरा टक्क्यांनी वाढ होत असल्याचे चित्र आहे.

उत्पादन निर्मितीचा, उपकरणे तसेच सुट्टय़ा भागांचा दर्जा, जागतिक मानकानुसार तयार केला जात आहे. त्यातूनच पर्यावरणीय मानकांचे पालन व्यावसायिकांकडून केले जात आहे. यामध्ये सुधारणा करण्याकडेही व्यवासायिकांचा कल आहे. आयएसओ प्रमाणपत्रे प्राप्त झाल्याने दर्जाच्या गुणवत्तेवरही शिक्कामोतर्ब झाले आहे. त्यातूनच दक्षिण भारत, उत्तर भारतातील अनेक शहरांकडूनही पुण्यातून सुट्टे भाग आणि जोडणी केलेल्या भागांची मागणी वाढत असून त्यांनाही ते तातडीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

जागतिक  पातळीवरही उत्पादनांनी दर्जा राखल्याने जर्मनी, युरोप, अमेरिका या सारख्या राष्ट्रांतही प्लास्टिकच्या सुट्टय़ा भागांची निर्यात सध्या होत आहे, हीच बाब प्लास्टिक उद्योग विकासात किती महत्त्वपूर्ण योगदान देत आहे, हे अधोरेखीत करत आहे. प्लास्टिक उद्योगाची वार्षिक उलाढाला किमान दहा हजार कोटींहून अधिक आहे. त्यापैकी किमान एक टक्का याप्रमाणे दरवर्षी एक हजार कोटींच्या मालाची शहरातून निर्यात केली जाते.

पॅकेजिंग व्यवसायाला लागणाऱ्या वस्तूंबरोबरच सिरिंज, हदयशस्त्रक्रियेसाठी लागणारी प्लास्टिक बारीक आणि किचकट वैद्यकीय उपकरणे, कृषी क्षेत्रासाठी निगडित नेट, क्रेटबरोबरच वाहन उद्योगाशी संबंधित लाइट, डॅश बोर्ड, सिट अशापर्यंत सध्या प्लास्टिकला मागणी असून ती या उद्योगाकडून पूर्ण केली जात आहे. त्यामुळे उत्पादनातही दरवर्षी १५ टक्क्यांनी वाढ होत असल्याची वस्तुस्थिती आहे. बांधकाम व्यवसायाला लागणारा कच्चा मालही प्लास्टिक उद्योगाकडून पुरविला जातो. प्लास्टिकचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्याने त्याच्या पुनर्वापरावरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे पुनप्र्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांतूनही रोजगार निर्मिती होत आहे.  स्कील इंडिया, मेक इन इंडिया यासारख्या विविध उपक्रमांतून लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळेही या उद्योगाला चालना मिळत आहे.

ग्राहकांची मागणी आणि धोरणानुसार इंधन बचतीसाठी वाहनांचे वजन हलके करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडय़ांमध्ये इलेक्ट्रॉनिकचा वापरही मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे वाहनांच्या निर्मितीमध्येही प्लास्टिकचा वापरही वाढला आहे. वाहनाच्या वजनानुसार यापूर्वी दोन ते तीन टक्के प्लास्टिकचा वापर होत होता. तो आता दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्येही प्लास्टिक उद्योगाने हातभार लावला आहे. एक लाखाहून अधिक कामगार येथे काम करत आहेत. प्रामुख्याने सुट्टे भाग निर्मिती आणि सुट्टे भाग जोडणी व्यवसायामुळे कुशल कामगारांची गरज वाढतच आहे. तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, अभियंता, सुट्टे भाग जुळणी करणारे कामगारांना या क्षेत्रात कामाची मोठी संधी मिळत आहे. गेल्या चाळीस वर्षांत केवळ उत्पादन क्षमतेमध्ये वाढ झाली नसून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्तम यंत्रसामुग्री या व्यवसायाचा महत्त्वाचा घटक ठरला आहे. त्यामुळे देशात शहरातील प्लास्टिक उद्योग प्रथम क्रमांकावर आहे. देश परदेशातील अनेक नामांकित मोठय़ा कंपन्यांकडून गुणवत्तापूर्ण प्लास्टिकच्या सुट्टय़ा भागांना वाढती मागणी राहिली आहे. सुट्टय़ा भागासाठी कच्चा माल पुरविणारे कारखान्यांनाही त्यामुळे बळ मिळत आहे. सध्या प्लास्टिक उद्योग क्षेत्रात अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. या विस्तारणाऱ्या क्षेत्राला लागणारे कुशल मनुष्यबळ लक्षात घेऊन करिअरच्या संधी येथे निर्माण झाल्या आहेत. विविध अभ्यासक्रम देणाऱ्या अनेक संस्था पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सध्या आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्या जगभरात प्लास्टिकचे उत्पादन आणि संशोधन तसेच विकासात गुंतल्या आहेत. त्यामुळे या उद्योगासाठी मोठय़ा प्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे. प्लास्टिक उद्योग रोजगार निर्मितीच्या दृष्टीने उपयुक्त ठरत असल्याने या उद्योगासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ पुरविणारे विविध अभ्यासक्रमही येथे सुरू झाले आहेत. प्लास्टिक उद्योगातील संधीमुळेच पुणे, पिंपरी-चिंचवड परिसराच्या विकासाला हातभार लागला आहे.

(लेखक पिंपरी-चिंचवड प्लास्टिक असोसिएशनचे  विद्यमान संचालक आणि  माजी अध्यक्ष आहेत.)

Story img Loader