|| डॉ. दीपक शिकारपूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘आय टी म्हणजे इन्कम टॅक्स’ हे तीस वर्षांपूर्वीचे समीकरण. संगणक माहिती तंत्रज्ञान,आय टी करिअर ह्या सर्व गोष्टी तेंव्हा अज्ञात होत्या. तर, पार्क म्हणजे फळ फुलांनी भरलेली बाग हेच लोकांना माहिती होते. नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीस विकसित देशांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय तंत्रज्ञांच्या क्षमतेचे महत्त्व हळूहळू पटायला लागले. २०२२ ला संपलेल्या आर्थिक वर्षांत पुण्याची संगणक प्रणाली निर्यात सुमारे पाच लाख कोटी रुपये असणार आहे, असा अंदाज सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कचा आहे. २०२२-२३ या वर्षांत त्यात किमान १५ टक्के वाढ अपेक्षित आहे. सध्या पाच लाखाहून अधिक व्यावसायिक या क्षेत्रात कार्यरत आहेत. ही वाढ जर अशीच अविरत हवी असेल तर वीज, रस्ते, मेट्रो, शक्तिशाली ५ जी, विमानतळ सारख्या अत्यावश्यक पायाभूत सुविधा वेगाने विकसित व्हायला हव्यात. २०४० पर्यंतची दृष्टी डोळय़ासमोर ठेवून एकत्रित सर्व घटकांना समविष्ट करून पश्चिम महाराष्ट्राचा एक विकास आराखडा करायची वेळ आली आहे. नजीकची सातारा, कोल्हापूर, सोलापूर सारखी शहरे उद्याची आय. टी. हब करण्यासाठी पुणे शहराने वडील भावासारखा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, तरच सह्याद्री व्हॅली ही ‘सिलिकॉन व्हॅली’ म्हणून २०४० मध्ये ओळखली जाईल.

करोना व्हायरसच्या उद्रेकामुळे जगभरातील काम करण्याच्या पद्धतीवर ‘न भूतो न भविष्यति’ असा परिणाम झाला आहे. तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने बदल घडताना आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. त्यामुळे कामकाजाच्या नवनवीन पद्धतींचा अवलंब करण्याकडे सर्वच देशांचा कल दिसून येत आहे आणि तो वाढतच जाणार आहे.‘चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट थिंग’ म्हणजेच ‘बदल हीच सर्वात पायाभूत बाब आहे’ संगणकीय विश्व खरेतर इतक्या झपाटय़ाने बदलत आले आहे,की जुने तंत्रज्ञान किंवा पद्धती कालबाह्य होण्याचा वेग (ह्याला ‘रोलओव्हर पीरिअड’ असे नाव आहे) इथे सर्वाधिक आहे. काही बाबतीत तर अक्षरश: गेल्या महिन्यातल्या प्रणालीची जागा ह्या महिन्यात हाती आलेले नवतंत्रज्ञान घेते आहे. २०२२ नंतरच्या न्यू नॉर्मलमध्ये व्हच्र्युलायझेशन हा प्रवाह वाढतच जाणार आहे . ह्याचा फायदा भारतीय संगणक उद्योगाला होत आहे. अधिक डिजिटल उपकरणे विकली जात आहेत. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. ‘आय टी म्हणजे इन्कम टॅक्’ हे तीस वर्षांपूर्वीचे समीकरण. संगणक माहिती तंत्रज्ञान,आय टी करिअर ह्या सर्व गोष्टी तेंव्हा अज्ञात होत्या. पार्क म्हणजे ”फळ फुलांनी भरलेली बाग हेच लोकांना माहिती होते. नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीस विकसित देशांना भारतीय तंत्रज्ञांच्या क्षमतेचे महत्त्व हळूहळू पटायला लागले.

समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध असलेले पुणे शहर हे महाराष्ट्र राज्यातील, मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. पुण्यात सुमारे ७ दशलक्षाहून अधिक लोक वास्तव्य करीत आहेत आणि पुण्यात शिक्षण घेण्यासाठी व नोकरीसाठी देशभरातून आलेल्या स्थलांतरितांसाठी हे सर्वात मोठे केंद्र आहे. पुणे हे देशातील एक महत्त्वाचे आय.टी.शहर म्हणून उदयास आले आहे. ९१-९२ साली केंद्र सरकारने ‘सॉफ्टवेअर टेक पार्क’ अशी नवीन योजना सुरू केली होती ज्यायोगे अनेक आर्थिक फायदे निर्यातप्रधान संगणक उद्योगांना मिळायला लागले होते . देशातील पहिले टेक पार्क भोसरीमध्ये ९१ साली सुरू झाले. त्याचे पहिले ग्राहक होते पर्सिस्टंट. निवासी प्रभागातील उद्योगांना अनेक सवलती त्याकाळी पुणे महापालिकेने जाहीर केल्या होत्या. त्याचे अनुकरण नंतर इतर शहरांनी केले. स्टार्ट अप उद्योगांना त्याचा खूप खूप फायदा झाला, कारण अनेक उद्योग एक बेड रूम फ्लॅट मध्ये सुरू होऊ शकले . उच्च शिक्षणाचे एक प्रमुख केंद्र म्हणून पुणे नावारूपाला आले व त्यामुळे प्रशिक्षित मनुष्यबळ जी आय. टी. उद्योगाची प्रमुख गरज भागवली गेली. त्याचबरोबर मुंबईला जवळ, सांस्कृतिक व कला, सुरक्षा, मुबलक पाणी, शीतल हवामान या सकारात्मक बाबी उद्योजकांच्या लक्षात आल्या. २००४ मध्ये राज्य सरकारने संगणक उद्योग आकर्षित करण्यासाठी विशेष नीतीचा विकास केला. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सने त्यासाठी विशेष योगदान दिले. खासगी आय. टी. पार्क त्यामुळे जोमाने विकसित झाले. सध्या इतर शहरांच्या तुलनेने संगणक उद्योगवाढीचा सरासरी दर पुण्यात क्रमांक एक आहे व पुढील तीन वर्षे तो तसाच राहील.

२०२२ ला संपलेल्या आर्थिक वर्षांत पुण्याची संगणक प्रणाली निर्यात सुमारे पाच लाख कोटी रुपये असणार आहे, असा अंदाज सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कचा आहे. २०२२-२३ ह्या वर्षांत त्यात किमान १५ टक्के वाढ अपेक्षित आहे. सध्या पाच लाखाहून अधिक व्यावसायिक या क्षेत्रात कार्यरत आहेत. जागतिकीकरण, आउटसोर्सिग या व्यूहरचनांचा पगडा आय. टी. वर प्रामुख्याने पडलेला दिसतो. एकेकाळी पेन्शनरांचे आवडते ठिकाण ही ओळख असणारे पुणे आता व्यावसायिकांचे पुणे म्हणून ओळखले जाते. पुणे म्हणजे बाकरवडी असे एकेकाळी म्हटले जात असे. आता त्याचबरोबर हिंजवडी, खराडी ही आता नवीन ओळख झाली आहे. युवकांच्या आशा आकांक्षाची पायाभरणी पुण्यातच होते. संगणक व माहिती तंत्रज्ञान उद्योग ह्या शहराचा प्रथम क्रमांकाचा रोजगार देणारा म्हणून ओळखला जात आहे. बांधकाम, वाहतूक, रीटेल्, मनोरंजन, उपाहारगृहे, गुंतवणूक अशा अनेक उद्योगांचा अप्रत्यक्ष ग्राहक हा संगणक व्यावसायिक हाच आहे.

एकेकाळी फक्त मराठी भाषकांचे पेठातील पुणे आता इतिहासजमा झाले असून अनेक अमराठी व परदेशी विद्यार्थी व व्यावसायिक गुण्यागोविंदाने पुण्यात नांदत आहेत. आता जरी वर्क फ्रॉम होम प्रामुख्याने असले तरी पुढील वर्षांत परिस्थिती सुरळीत होऊन अनेक आय टी उद्योग वर्क फ्रॉम ऑफिस सुरू करतील व आता ओस पडलेली आयटी पार्क्‍स पुन्हा मनुष्यांच्या उपस्थितीने बहरतील अशी अनेकांना आशा आहे.

जागतिकीकरणातील अर्थ व उद्योग व्यवस्थेमध्ये भारताचा दबदबा निर्माण होत आहे. २०२५ पर्यंत जगातील सर्वात तरुण देश म्हणून आपल्या देशाची ओळख लवकरच होत आहे. पुणे ह्या प्रक्रियेमध्ये अग्रेसर आहे. इथे असणारी अनेक विद्यापीठे, संगणक प्रशिक्षण म्हणजे संगणक उद्योगाला लागणारे मनुष्यबळ पुरवते . त्यामुळे अनेक बहुराष्ट्रीय उद्योग (अगदी मायक्रोसॉफ्ट, गुगल सकट ) व्यवसाय विस्तारासाठी पुण्याचा विचार प्राधान्याने करतात . त्याचबरोबर पुण्यात सुरू झालेले भारतीय संगणक उद्योग इन्फोसिस, पर्सिस्टंट, केपीआयटी आता बहुराष्ट्रीय झाले आहेत. पुण्याचे नाव त्यामुळे जगाच्या नकाशावर एक प्रमुख केंद्र म्हणून झाले आहे. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे अनेक संशोधन संस्था पुण्यात आहेत. पुणे विद्यापीठाव्यतिरिक्त पुण्यात अनेक सुप्रसिद्ध व महत्त्वाच्या संशोधन संस्था आहेत. विद्यापीठाजवळ राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे, तर विद्यापीठाच्या आवारात आयुका, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ स्ट्रोफिजिक्स व नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, राष्ट्रीय विमा अकादमी, केंद्रीय जल शक्ती संशोधन संस्था,उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, आघारकर संशोधन संस्था, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया व राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था या संस्थाही पुण्यात आहेत.

एनसीएल,आयसरसारख्या नावाजलेल्या संस्था पुण्याची ओळख एक ‘इनोव्हेशन हब’ म्हणून करून देत आहेत. ‘क्विक हिल’सारखे प्रोडक्ट पुण्यातच बनले. बजाज, टाटासारखे अनेक वाहन उद्योग व त्यावर अवलंबून असणारे सुटे भाग उत्पादक पिंपरी चिंचवड, चाकण भागात आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी व उत्पादन क्षेत्रातील विशेष ज्ञानावर व कौशल्यावर आधारित इआरपी , कॅड कॅम सारखे अंमलबजावणी उद्योग पुण्यात आले व वाढले . पॅरामॅट्रिक टेक,ओरॅकल, सीमेन्ससारख्या बहुराष्ट्रीय उद्योगांनी याच कारणासाठी पुण्याची निवड आपली संशोधन व अंमलबजावणी केंद्रे उभारण्यासाठी केली. अनेक अभियांत्रिकी संस्थांनी या प्रणालीचे शिक्षण आपल्या अभ्यासक्रमात अंतर्भूत करून प्रशिक्षित मनुष्यबळ त्यांना उपलब्ध करून दिले. ह्याचबरोबर संलग्न तंत्रज्ञान म्हणजे हार्डवेअर , इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स, ड्रोनसंबंधी अनेक उद्योग पुण्यात कार्यरत आहेत. अनेक उद्योगांनी (उदा. जाबिल) रांजणगावला उत्पादन केंद्रे सुरू केली आहेत . सध्या सर्व उद्योगांनाच इलेक्ट्रॉनिक भाग व चिप्स उत्पादनासाठी लागत असल्याने तसे उद्योगही पुण्यात भरभराटीला येत आहेत. अजून एक उद्योग जो आता मेकॅट्रॉनिक्सशी संबंधित आहे तो म्हणजे बॅटरी तंत्रज्ञानाचा. ई वाहन नीतीमुळे पुण्यातील वाहन उद्योग आता अपारंपरिक ऊर्जेमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यामधील शिखर संस्था ‘एआरआय’ ही पुण्यातच आहे.

आता पुढचा टप्पा गाठला तो स्टार्ट अप उद्योगांनी. पुण्यात किमान ३ हजार स्टार्टअप आहेत व त्यातले अनेक आगामी काळात नावारूपास येतील. गेल्या वर्षभरात पुण्यात स्टार्टअप, नवोपक्रम, कृत्रिम बुद्धिमत्ता आदी विषयांशी संबंधित अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. इनोव्हेशन पार्क, आयआयटी खरगपूर, आयआयटी मुंबई, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, व्हेंचर सेंटर अशा अनेक संस्थांसोबत पुणे विद्यापीठाने संयुक्त उपक्रम राबवले. अनेक छोटय़ा व मोठय़ा कालावधीचे अभ्यासक्रमही सुरू केले. सातत्याने प्राध्यापकांना प्रशिक्षित केले. विद्यापीठात सात एक्सलन्स सेंटर आहेत. विद्यापीठात नवोपक्रम व उद्योग या विषयातील तज्ज्ञ प्राध्यापक आहेत. मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठ उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी जोडले गेले आहे. सध्या विद्यापीठात ४० स्टार्टअप सुरू असून, ३४० संलग्न महाविद्यालयांत ‘इनोव्हेशन सेल’ स्थापन करण्यात आले आहेत.

ही वाढ जर अशीच अविरत हवी असेल तर वीज, रस्ते, मेट्रो, शक्तिशाली ५ जी, विमानतळ सारख्या अत्यावश्यक पायाभूत सुविधा वेगाने विकसित व्हायला हव्यात. २०४० पर्यंतची दृष्टी डोळय़ासमोर ठेवून एकत्रित सर्व घटकांना समविष्ट करून पश्चिम महाराष्ट्राचा एक विकास आराखडा करायची वेळ आली आहे. नजीकची सातारा, कोल्हापूर, सोलापूर सारखी शहरे उद्याची आय.टी. हब करण्यासाठी पुणे शहराने वडील भावासारखा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, तरच सह्याद्री व्हॅली ही ‘सिलिकॉन व्हॅली’ म्हणून २०४० मध्ये ओळखली जाईल.

(लेखक ज्येष्ठ संगणकतज्ञ आहेत.)