महाराष्ट्रीय परंपरेत (आणि म्हणून भाषेतही) न आढळणाऱ्या प्रथा वा संकल्पना यांना सुटसुटीत अर्थवाही शब्द वापरून त्यांना आपलंसं करणं सहज शक्य आहे. ड्रीमगर्लसाठी स्वप्नपरी, बॉयफ्रेंडसाठी ‘प्रियसखा’ , गर्लफ्रेंडसाठी ‘प्रियसखी’, डेटिंगसाठी ‘भेटीगाठी’, एकत्र भेटल्यावर ‘वेलकम ड्रिंक’साठी ‘स्वागतपेय’ हा पर्याय चांगला आहे.  रिसेप्शनसाठी ‘स्वागत समारंभ’, हनिमूनला ‘मधुचंद्र’, मॅरेज अ‍ॅनिव्हर्सरीसाठी ‘लग्नाचा वाढदिवस’ हे शब्द वापरून त्याला देशी करताच येते. ‘हेअर अ‍ॅण्ड मेकअप’साठी ‘तयारी’ हा शब्द सहज मराठी घराघरांत वापरतोच आपण. ‘चल, मी तयार होतो वा होते’, इथली तयारी समाहार द्वंद्व समासासारखी आहे… गालावर लाली लावता येते. ओठांवर ओष्ठशलाका लावता येते. केशरचनेत तºहेतºहेचे खोपे करता येतात. वस्त्रप्रावरणे नीट लेवून तयार होता येऊ शकते. ड्रेसकोडऐवजी ‘पेहराव संकेत’ पाळता येऊ शकतो. गिफ्टऐवजी भेटवस्तू देता येतात. ‘रिटर्न गिफ्ट’ ही संकल्पना चिमणपाखरांच्या वाढदिवसांना वा विवाह समारंभात बरीच वापरली जाताना दिसते. परतफेड करून ताबडतोब ऋणमुक्त होणं, हे कदाचित नव्या पिढीला बरं वाटत असेल, कदाचित असलेल्या सुबत्तेचे दर्शन महत्त्वाचं वाटत असेल, पण भेटवस्तूपेक्षा ही परतीची भेटवस्तू महाग असली तर घेणाऱ्यास कानकोंडं (ऑकवर्ड) करू शकते. ‘अब्द’ शब्द तर फक्त षष्ट्यब्दीत वा शताब्दीत आढळतो. अब्द म्हणजे वर्ष. ‘ज्युबिली’ प्रकरणासाठी २५ वर्षपूर्तीला रौप्य महोत्सव, ५० वर्षपूर्तीसाठी सुवर्ण महोत्सव, ६० वर्षपूर्तीसाठी हीरक महोत्सव, ७५ वर्षपूर्तीसाठी अमृत महोत्सव आणि १०० वर्षं पूर्ण झाली की शताब्दी समारंभ हे शब्द आपण स्वीकारलेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक सांस्कृतिक संकल्पना अभाषांतरीय असतात, पण जशा त्या आपल्या मातीत रुळतात तसं त्यांचं अनुसर्जन शक्य असतं!

– डॉ. निधी पटवर्धन 

nidheepatwardhan@gmail.com  

अनेक सांस्कृतिक संकल्पना अभाषांतरीय असतात, पण जशा त्या आपल्या मातीत रुळतात तसं त्यांचं अनुसर्जन शक्य असतं!

– डॉ. निधी पटवर्धन 

nidheepatwardhan@gmail.com