न्यूझीलंडच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान जसिंडा आर्डर्न यांच्या उदारमतवादी मजूर पक्षाला एकहाती बहुमत मिळाले. करोनास्थिती नीट हाताळल्यामुळे मतदारांनी जसिंडा यांच्या पक्षाच्या पारडय़ात भरभरून मते टाकल्याचे मानले जाते. मात्र, फक्त करोनास्थितीच नव्हे, तर गेल्या तीन वर्षांतील सर्व संकटांना धीरोदात्तपणे सामोरे गेलेल्या जसिंडा यांच्या कर्तृत्वावर मतदारांनी उमटवलेली ही मोहोर आहे, असे विश्लेषण माध्यमांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘मुळात ही निवडणूक अटीतटीची नव्हतीच. जसिंडा दुसऱ्यांदा पंतप्रधान बनतील, असे अंदाज जनमत चाचण्यांनी वर्तवले होते. फक्त हा विजय किती मोठा असेल, याची उत्सुकता होती. सर्वच निकषांवर हा विजय मोठा ठरतो,’ असे ‘बीबीसी’च्या वृत्तलेखात म्हटले आहे.
‘करोनाविरोधातील लढय़ातील यशाबरोबरच उदारमतवादी, लोकशाही मूल्यांच्या संवर्धनासाठी मतदान करण्याचे आवाहन जसिंडा यांच्या पक्षाने केले होते. त्यास मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, प्रतिस्पर्धी नॅशनल पार्टीचे अनेक बालेकिल्ले या निवडणुकीत उद्ध्वस्त झाले,’ अशी टिप्पणी ‘अल् जझिरा’च्या एका वृत्तलेखात करण्यात आली आहे. ‘हा ऐतिहासिक परिवर्तनवादी विजय आहे. न्यूझीलंडच्या गेल्या ८० वर्षांच्या राजकीय इतिहासात हे मोठे वळण आहे,’ अशी प्रतिक्रिया वेलिंग्टनच्या व्हिक्टोरिया विद्यापीठातील राजकीय अभ्यासक ब्रायसी एडवर्ड यांनी व्यक्त केली. जवळपास सर्वच माध्यमांनी एडवर्ड यांच्या प्रतिक्रियेस ठळक स्थान दिल्याचे दिसते.
स्त्री राजकारण्यांसाठीचा ‘जेसिंडा पॅटर्न’!
गेल्या वर्षी ख्राइस्टचर्च येथील मशिदींवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५० हून अधिक ठार झाले होते. ती परिस्थिती हाताळताना जसिंडा यांनी कणखरता व कनवाळूपणाचे दर्शन घडवले होते. या घटनेनंतर काही दिवसांतच त्यांनी बंदूक परवान्यांवर निर्बंध आणले. त्याचबरोबर महिलांचे हक्क, सामाजिक न्याय आदी मूल्यांची संरक्षक म्हणूनही त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली प्रतिमा बनली. जगभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी जसिंडा यांच्या विजयाबद्दल व्यक्त केलेला आनंद ही त्यांच्या लोकप्रियतेची पोचपावती आहे, असा सूर माध्यमांमध्ये आहे.
जसिंडा यांच्या महाविजयाबद्दल तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्यासह जगभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या, त्याचे सविस्तर वृत्त ‘द गार्डियन’मध्ये आहे. मात्र, ‘केवळ जसिंडा यांच्या लोकप्रियतेवर विसंबून राहण्याची उदारमतवादी मजूर पक्षाची रणनीती धोकादायक होती,’ असे विश्लेषण ‘द गार्डियन’च्याच दुसऱ्या एका लेखात करण्यात आले आहे. दीर्घकालीन विचार करता पक्षाला ही रणनीती मारक ठरू शकेल. तसेच पक्षाचे आर्थिक विषमता निर्मूलनाबाबतचे काम लक्षणीय नाही. अल्प उत्पन्न गटाच्या अर्थस्थितीत सुधारणा जरूर आहे, पण ती फार मोठी नाही. दारिद्रय़ निर्मूलनाचे लक्ष्य गाठणेही अवघड आहे, असे भाकीत या लेखात वर्तविण्यात आले आहे.
करोना संकट स्त्री नेतृत्वाचं फलदायी कर्तृत्व
न्यूझीलंडमध्ये करोनास्थिती आटोक्यात आणून व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. दहशतवादी हल्ला, नैसर्गिक आपत्ती आणि करोनास्थिती जसिंडा यांनी उत्तमपणे हाताळल्यामुळे जगभरातील उदारमतवाद्यांमध्ये त्यांची लोकप्रियता मोठी आहे, अशी मांडणी करणारा तपशीलवार लेख ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये आहे. गेल्या वर्षी ‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्याच एका लेखात अमेरिकेला जसिंडा यांच्यासारख्या नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे म्हटले होते! महिला नेतृत्व लाभलेल्या देशांनी करोनाचा सामना उत्तमपणे केल्याचे निरीक्षण न्यूझीलंडबरोबरच जर्मनी आणि तैवानच्या उदाहरणांवरून काही माध्यमांनी नोंदवले आहे.
आता जसिंडा यांच्यापुढे काय आव्हाने असतील, याचाही वेध माध्यमांनी घेतला आहे. करोनामुळे न्यूझीलंडला गेल्या दशकभरात पहिल्यांदाच आर्थिक मंदीला सामोरे जावे लागत आहे. सर्वाना लाभदायक ठरणारी अर्थव्यवस्था उभारण्याचे लक्ष्य असल्याचे जसिंडा यांनी विजयानंतरच्या पहिल्याच भाषणात जाहीर केले असले, तरी रोजगारनिर्मिती आणि दारिद्रय़ निर्मूलन ही त्यांच्यापुढची महत्त्वाची आव्हाने असतील. तसेच उदारमतवादी मजूर पक्षात नवख्या लोकप्रतिनिधींची संख्या मोठी आहे. त्यामुळे महत्त्वाची खाती सांभाळण्यासाठी निवडक ज्येष्ठ लोकप्रतिनिधींवर मदार आहे, असे निरीक्षण ‘द गार्डियन’मधील एका लेखात नोंदवण्यात आले आहे.
पंतप्रधानांच्या चिमुकल्या मुलीनं रचला इतिहास
या निवडणुकीत प्रतिस्पर्धी नॅशनल पार्टी दिशाहीन होती. ही बाब उदारमतवादी मजूर पक्षाच्या पथ्यावर पडली. नॅशनल पार्टीत २०१८ पासून तीनदा नेतृत्वबदल झाला, याकडेही माध्यमांनी लक्ष वेधले. नॅशनल पार्टीतील मरगळ मतमोजणीनंतरच्या पक्षाच्या कार्यक्रमात दिसून आली. त्याचे नेमके वृत्तांकन ‘द न्यूझीलंड हेराल्ड’मध्ये आहे. याच वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर निवडून आलेल्या ४० नव्या चेहऱ्यांची ओळख करून देण्यात आली आहे. या नव्या चेहऱ्यांत मूळच्या आफ्रिकी, लॅटिन अमेरिकी आणि श्रीलंकन नागरिकांचा समावेश आहे. विविधतेतील एकता हीच असावी! अशा देशाचे नेतृत्व कर्तृत्ववान महिलेकडे असावे, हा दुग्धशर्करा योगच!
(संकलन : सुनील कांबळी)