‘मी चित्रे काढणारा चांद्रवीर होतो असे म्हटले, तर तो माझ्यावर अन्याय आहे, त्यापेक्षा तुम्ही मला एके काळी चंद्रावर जाऊन आलेला चित्रकार म्हणा,’ असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, किंबहुना नौदलातून ते नासात गेले त्या वेळीच त्यांना चित्रकलेचा छंद होता, तेव्हापासून ते चित्रे काढत होते. एक मनस्वी कलावंत व चांद्रवीर अशी फार वेगळी गुंफण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती, ती व्यक्ती म्हणजे चंद्रावर पाऊल ठेवणारे अमेरिकेचे चौथे चांद्रवीर अॅलन बीन. नुकतेच त्यांचे निधन झाले. ते दोनदा मिळून ७ तास ४५ मिनिटे चंद्रावर चालले. तेथे त्यांनी चंद्राच्या भूगर्भशास्त्राच्या अभ्यासासाठी काही उपकरणे लावली, पुढील मोहिमांना ऊर्जा मिळावी यासाठी एक अणुभट्टी बसवली, चंद्रावरचे खडक गोळा केले. ते चंद्रावर जाण्यापूर्वी सव्र्हेयर यान तेथे पाठवण्यात आले होते त्या यानाचे काय झाले हेही त्यांनी पाहिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा