बालगोपाळांपासून सगळ्यांनाच खिळवून ठेवणारे अॅनिमेशनपट (सचेतपट) हे आजच्या काळात नावीन्याचा विषय राहिलेले नाहीत. त्यांची संकल्पना प्रथम प्रत्यक्षात आणली ती वयाच्या १११ व्या वर्षी नुकत्याच निवर्तलेल्या रुथी थॉमसन यांनी. जगण्यावर प्रेम करणाऱ्या रुथी त्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळेच दीर्घायुषी ठरल्या. इलस्ट्रेटर व स्टोरीबोर्ड टेलर यासाठी त्या प्रसिद्ध होत्या. त्यांनी ४० वर्षे दी वॉल्ट डिस्ने कंपनीत काम केले. त्या काळात डिस्नेचा दरारा होतात. या कंपनीने केलेल्या अनेक नावीन्यपूर्ण प्रयोगांमध्ये रुथी यांचा सहभाग होता. १९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दी रेस्क्यूअर्स’चे काम पूर्ण करून १९७५ मध्ये त्या निवृत्त झाल्या. इंटरनॅशनल फोटोग्राफर्स युनियनने निमंत्रित केलेल्या पहिल्या तीन महिलांमध्ये त्यांचा समावेश होता. दी वॉल्ट डिस्ने कंपनीने त्यांचा डिस्ने लिजंड हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरव केला होता. पोर्टलॅण्डमधील माइने येथे २२ जुलै १९१० रोजी जन्मलेल्या रुथी बोस्टनमध्ये लहानाच्या मोठय़ा झाल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा