कीथ गीसन या अमेरिकी लेखकाच्या ‘ऑल द सॅड यंग लिटररी मेन’ आणि इतर लेखनतुकडय़ांमध्ये १९९० च्या दशकाखेरीस अमेरिकेत लेखन उमेदवारी करताना प्रतिभा नशेवर जगणाऱ्या आर्थिक कफल्लक लेखकांचा जथ्था सापडतो. त्यात एका बाजूला सर्जनशील जगणे शिकविणाऱ्या विद्यापीठातील लेखक स्नातक, लेखन कार्यशाळा आणि लेखन निवासाच्या सुविधेतून घडणारे हुशार लेखक होते आणि भाडय़ासह एकमेकांचे कपडे वाटून घेत प्रकाशकांचे, मासिकांचे उंबरठे झिजविणारे लेखनेच्छुक दुसऱ्या बाजूला. नुकतेच ‘लेस’ या कादंबरीसाठी पुलित्झर मिळालेले अॅण्ड्रय़ू सीआन ग्रीअर दोन हजारोत्तर काळात झळकलेल्या लेखकांच्या जथ्थ्यातल्या पहिल्या गटात मोडतात. त्यांना स्वत:ला लेखनामध्ये सिद्ध करण्यासाठी मात्र दुसऱ्या गटासारखा संघर्ष करावा लागला. सत्तरच्या दशकातील हीपस्टर्स पिढीसोबत वैज्ञानिकांच्या घरात जन्मलेल्या ग्रीअर यांनी ब्राऊन विद्यापीठातून लेखनात पदवी मिळविली. पदवी मिळाल्यानंतर नोकरीच्या बाजारात शिक्षण आणि स्वत:बद्दलचे भ्रम वेगाने संपुष्टात येतात. तसेच काहीसे या लेखकोच्छुक तरुणाचे झाले आणि भ्रमनिरास झालेल्या अवस्थेत चित्रपटांमध्ये किडुकमिडुक भूमिका, शोफरगिरी आणि वाटेल त्या नोकऱ्या असा प्रवास करीत त्यांनी कम्युनिटी कॉलेजमध्ये शिकविण्यास सुरुवात केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा