डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिथे ‘बॅरिस्टर’ झाले, त्या लिंकन्स इन (लंडन) येथेच अशोक देसाईदेखील शिकले होते. त्यापूर्वी देसाईंनी मुंबईत कायद्याचे शिक्षण पूर्ण करून, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला होता. इंग्रजी साहित्य व कायदा हे आवडीचे विषय; त्यास आर्थिक-राजकीय अभ्यासपद्धतीची जोड आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील सुखवस्तू आधुनिकतावादी घरातले मोकळेपणाचे संस्कार या चतुर्गुणांचा मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसे. एच. एम. सीरवाई, मोतीलाल सेटलवाड, नानी पालखीवाला अशा विधिज्ञांच्या परंपरेत शोभणारे अशोक देसाई सोमवारी (१३ एप्रिल) पहाटे निवर्तले. कायदेपंडितांची ती परंपराही आता सोली सोराबजी, फली नरिमन अशा एका हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतकीच उरली. सॉलिसिटर जनरल (डिसेंबर १९८९-डिसेंबर १९९०) आणि अॅटर्नी जनरल (जुलै १९९६ ते मे १९९८) ही पदे त्यांनी स्वीकारली नसती, तरीही त्यांनी लढविलेल्या अनेक खटल्यांसाठी ते नावाजले गेलेच असते.
अशोक देसाई
विजय तेंडुलकरांच्या ‘घाशीराम कोतवाल’ची बाजू मांडून देसाईंनी, ‘ही साहित्यकृती आहे’ असा निकाल न्यायालयाकडून मिळवला होता
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-04-2020 at 00:00 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok desai profile abn