भारतात जगदीशचंद्र बोस यांच्यासारखे काही मोजके वनस्पतिशास्त्रज्ञ उदयास आले, त्या परंपरेतील डॉ. होलेनरसिपूर योगनरसिंहम मोहन राम हे एक होते, त्यांचे नुकतेच निधन झाले. पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, लेखक, सनदी अधिकारी एच. वाय. शारदाप्रसाद हे त्यांचे मोठे बंधू होते. डॉ. राम यांनी वनस्पतिशास्त्राची दुर्मीळ वाट निवडून फुलझाडांचे जीवशास्त्र, वनस्पतींचे रचनाशास्त्र यात संशोधन केले. अ‍ॅमेझॉनपासून ते केरळच्या मलबारमधील वनस्पतींबाबत त्यांना विशेष ओढ होती. त्यांनी फुलांचे रंग, फुलझाडांचे लैंगिक प्रकटीकरण, बांबूची संकरित पद्धतीने निर्मिती यातही मोठी कामगिरी केली होती. ‘एचवायएम’ या नावाने ते ओळखले जात होते. एकूण दोनशे शोधनिबंध त्यांच्या नावावर असून अनेक पीएचडी विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभले. उती संवर्धनात अधिकारी व्यक्तिमत्त्व मानले जाणारे एचवायएम यांनी ल्युपिन, ग्लॅडिओलस, क्रीसॅनथमम, कँलेंडय़ुला, झेंडू व इतर वनस्पतींच्या वेगळ्या गुणधर्माचा अभ्यास केला. त्यातील काही गुण त्यांनी केळी, कडधान्ये व बांबू या वनस्पतींत आणून आर्थिक किफायत वाढवली. केळीच्या उती संकरात त्यांनी अनेक वैज्ञानिक प्रयोग करून त्यात यश मिळवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एचवायएम यांचा जन्म कर्नाटकात १९३० मध्ये झाला. त्यांच्या मातोश्री एच.वाय. सरस्वती या सामाजिक सुधारणा व स्वातंत्र्यलढय़ाशी संबंधित होत्या, तर वडील म्हैसूर व बंगळूरु येथे संस्कृत कॉलेजचे प्राचार्य होते. सुरुवातीपासूनच त्यांचा ओढा विज्ञानाकडे होता, म्हैसूरमध्ये कॉलेजला असतानापासून त्यांनी विज्ञानप्रसाराचे काम केले. सेंट फिलोमेना कॉलेजमधून त्यांनी बीएस्सी केले, जवळच्या रानवनस्पतींसह ते रमत असत. कॉलेजमध्ये असताना त्यांनी नॅचरल सायन्स सोसायटीची स्थापना करून तेथे व्याख्यान देण्यासाठी नोबेल विजेते वैज्ञानिक सर सी.व्ही. रामन यांना बोलावले. त्या वेळी रामन यांनी व्याख्यानाचा विषय ठरवलेला नव्हता. रामन यांनी त्या वेळी निसर्गातील सममिती व त्याचे जैविक महत्त्व यावर विचार मांडले. विज्ञान लोकांना समजेल अशा पद्धतीने कसे मांडावे याचा धडा रामन यांच्या भाषणातून त्यांना मिळाला.

पदव्युत्तर पदवीनंतर आग्रा येथे एमएस्सी केले, त्या वेळी त्यांना ५० रुपये शिष्यवृत्ती मिळत होती व बाकीचे पैसे शारदाप्रसाद देत असत. तेथे त्यांना प्रा. बहादूर सिंह यांच्यासारखे शिक्षक लाभले. पुढे ख्यातनाम वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. माहेश्वरी यांनी एचवायएम यांची दिल्ली विद्यापीठात अध्यापक म्हणून निवड केली. नंतर ते फुलब्राइट शिष्यवृत्ती घेऊन वनस्पतिशास्त्र शिकण्यासाठी कार्नेल विद्यापीठात गेले. तेथे त्यांनी उती संस्करणाचे तंत्र आत्मसात केले व त्याचा वापर भारतात केला.