मराठी उद्योजकांमध्ये सहकाराची रुजवणूक करण्याचे आव्हान एका व्यक्तीने लीलया पेलले आणि तेही ‘अवघे होऊ श्रीमंत’ अशा सनातन मराठी मानसिकतेला आव्हान देणारे ब्रीद घेऊन! माधवराव भिडे हे एक व्यक्ती नव्हे तर संस्थाच होते, हे त्यांचा कार्यपट पाहता निश्चितच म्हणता येईल. संघटनकौशल्य, माणसे जोडणारा जिव्हाळा, लोकसंपर्काची आस, एकदा ठरविलेला संकल्प तडीस नेणारा कामाचा उत्साह आणि ऊर्जा, पटकन कोणालाही मदतीसाठी तत्परता अशा साऱ्या गुणांचा समुच्चय म्हणजे माधवराव. ब्रिज इंजिनीअर असलेल्या माधवरावांनी मराठी उद्योजकतेत मैत्रीचा मजबूत पूल बांधला! ‘मी व्यावसायिक होईनच’ असे स्वप्न मराठी तरुणांनी पाहावे, उद्योग वाढवावा, संपत्ती निर्माण करावी आणि स्वत:बरोबरीने इतरांनाही मदतीचा हात देत मोठे करावे, अशा भूमिकेतून त्यांनी २००० सालात सॅटर्डे क्लबची स्थापना केली. या संस्थेच्या आज ४५हून अधिक शाखा आणि १,७०० उद्योजक सदस्यांनी त्याला मूर्तरूप देत खऱ्या अर्थाने मराठी उद्योजकतेचा स्वयंसाहाय्य गट कार्यान्वित केल्याचे दिसून येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा